Corona : कर्तव्यावर स्वरक्षणासाठी वर्धा पोलिसांची शक्कल, सॅनिटाईझ करणारी पोलीस व्हॅन

स्वतःच्या रक्षणासाठी काही पोलीस बांधवांनी शक्कल लढवून या पोलीस व्हॅनला मोबाईल सॅनिटायझरचे (Mobile Sanitize Police Van) रुप दिले आहे.

Corona : कर्तव्यावर स्वरक्षणासाठी वर्धा पोलिसांची शक्कल, सॅनिटाईझ करणारी पोलीस व्हॅन
Follow us
| Updated on: Apr 09, 2020 | 5:21 PM

वर्धा : कर्तव्यावर असताना स्वत:चा कोरोना (Corona Virus) विषाणूपासून बचाव करण्यासाठी (Mobile Sanitize Police Van) पोलिसांनी पोलीस वाहनातच सॅनिटाईझ करण्याची व्यवस्था केली आहे. सॅनिटाईझ करण्यासाठी पोलीस गाडीत सॅनिटाईझ फवारा तयार करण्यात आला आहे. गाडीत चढताच अंगावर त्या फवाऱ्याचे थेंब पडतात आणि कर्तव्यावर चढणारा पोलीस कर्मचारी सॅनिटाईझ होतो. अवघ्या साडेआठ हजार रुपयांत बनलेल्या या व्हॅनमधील मोबाईल सॅनिटाईझरचा प्रयोग अनोखा ठरतो आहे. स्वतःच्या रक्षणासाठी काही पोलीस बांधवांनी शक्कल लढवून या पोलीस व्हॅनला मोबाईल सॅनिटायझरचे (Mobile Sanitize Police Van) रुप दिले आहे.

एखादी मोठी घटना घडली, की घटनास्थळावर पोलीस पथक पोहोचतं. त्यावेळी पोलिसांचा डग्गा आला असं आपण म्हणतो. पण, हाच डग्गा आता पोलिसांसाठी कोरोनापासून संरक्षण करणारी मोबाईल सॅनिटायझर व्हॅन बनला आहे. 24 तास कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर सध्या लॉकडाऊनच्या यश आणि अपयशाची भिस्त आहे. कर्तव्यावर असताना पोलिसांचे देखील संरक्षण तितकेच महत्वाचे आहेत. या संरक्षणासाठी पोलिसांची मोठी गाडी मोबाईल सॅनिटाईझ गाडी म्हणून समोर आली आहे. गाडीमध्ये पाईपच्या माध्यमातून सॅनिटाईझ करणारी यंत्रणा बसविण्यात आली आहे. गाडीत प्रवेश करताच निर्जंतुकीकरण करणारे शॉवर अंगावर पडतात.पोलिसांच्या वाहनात अनोख्या पद्धतीने सॅनिटाईज करण्याचा हा उपक्रम पोलिसांसाठी संरक्षण कवचच ठरणार आहे.

व्हॅनमध्ये एक 14 व्हॅटची डीसी मोटार लावली गेली आहे. ज्याला इलेक्ट्रीटीची गरज नाही. या मोटरवर चार नोझल लावण्यात आले आहेत. ते व्हॅनच्या चार कोपऱ्यात लावले गेले आहेत. साधारणत: एक कर्मचारी आत गेल्यावर त्याला सहा ते सात सेकंदात सॅनिटाईझ होऊन परत यायचं आहेय. आतमध्ये जाताना त्याने तोंडावर मास्क लावणे आणि सॅनिटाईझ प्रोसेस सुरु असताना त्याने डोळे बंद ठेवणे आवश्यक आहे. परत बाहेर आल्यावर व्हॅनच्या बाहेर एक नोजल लावला आहे. त्यात हात धुवून बाहेर पडायचे आहे. पोलीस कर्मचारी बंदोबस्तात आहे (Mobile Sanitize Police Van), त्यांना संसर्ग होऊ नये म्हणून सॅनिटाईझ प्रोसेस करणे अत्यावश्यक आहे.

व्हॅन बनवण्यासाठी फक्त 8,500 रुपये खर्च आला आहे. यात शेतीकरिता वापरणारे ड्रीपचे पाईप आणि नोजलचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये  210 लिटरच्या पाण्यात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडून प्रमाणित करुन घेतलेले 1 % सोडियम हायपोक्लोराईडचे सोल्यूशन वापरता येईल. मात्र, सध्या ट्रायल म्हणून 210 लिटरच्या पाण्यात 500 ग्राम डेटॉल सोल्यूशन वापरत आहे. जेणेकरुन कोणत्या कर्मचाऱ्याला इचिंगचा त्रास किंवा खाज सुटते का, हे लक्षात येईल यानंतर सोडियम हायपोक्लोराईडच वापर केला जाणार आहे.

बंदोबस्तात काम करताना स्वतःला या जीवघेण्या कोरोना विषाणूपासून वाचविणे हे देखील पोलिसांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे ही सॅनिटायझर व्हॅन ही पोलिसांसाठी वरदान (Mobile Sanitize Police Van) ठरणार आहे.

संबंधित बातम्या : 

‘भिकेत मिळालेल्या आमदारकीचा वापर महाराष्ट्रासाठी करा’, निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

पुढील वर्षभर सर्व आमदारांच्या वेतनात 30 टक्के कपात, मंत्रिमंडळाच्या बैठकीत 5 महत्त्वाचे निर्णय

कोरोना संकटकाळात सरकारचा पेचही सुटला, उद्धव ठाकरे राज्यपालांच्या कोट्यातून विधानपरिषदेवर

पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा 200 पार, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.