AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Money Laundering Case: नंदकिशोर चतुर्वेदी कोण आहे?; मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याशी कनेक्शन काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (shridhar patankar) यांच्या मालमत्तांवर ईडीने (ED) टाच आणल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Money Laundering Case: नंदकिशोर चतुर्वेदी कोण आहे?; मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याशी कनेक्शन काय?
नंदकिशोर चतुर्वेदी कोण आहे?; मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याशी कनेक्शन काय?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 23, 2022 | 7:07 PM
Share

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (shridhar patankar) यांच्या मालमत्तांवर ईडीने (ED) टाच आणल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे या कारवाईवरून राजकीय आरोपप्रत्यारोपांचा धुरळा उडालेला असतानाच ईडीच्या या कारवाईत आणखी एक नाव पुढे आलं आहे. ते म्हणजे नंदकुमार चतुर्वेदी. हा नंदकुमार चतुर्वेदी हा भारतातील मोठ्या हवाला ऑपरेटर्सपैकी एक असल्याचं सांगितलं जातं. मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला चतुर्वेदी सीए आहे. सुरुवातीला लघु उद्योजकांना सल्ला देण्याचं काम सुरू केल्यानंतर त्याने थेट हवालाच्या कारभारात उडी घेतली. त्यानंतर राजकीय नेत्यांशी साटेलोटे केले. मात्र, 2017नंतर तो पहिल्यांदा ईडीच्या रडारवर आला. नोटाबंदीनंतर त्याचं नाव हवाला रॅकेटमध्ये समोर आलं आणि ईडीची त्याच्यावर वक्रदृष्टी पडली.

निलांबरी गृहप्रकल्पाची स्थापना पुष्पक बुलियन कंपनीने केली होती. पुष्पक बुलियनवर 2017मध्ये एक गुन्हा दाखल होता. ईडीने या कंपनीची 22 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. या कंपनीचे काही फंड वेगवेगळ्या फर्ममध्ये पाठवण्यात आलेले आहेत. ईडीच्या चौकशीत डीलर नंदकुमार चतुर्वेदीने स्वत: अनेक शेल कंपन्यांमध्ये पैसा वळता केल्याचं उघड झालं आहे. नंदकिशोर चतुर्वेदी याच्या खात्यातून पुष्पक ग्रुपच्या पुष्पक रिअल्टी फर्मला पैसे पाठवण्यात आले होते. चतुर्वेदी हा मोठा हवाला डीलर आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणातही त्याचा सहभाग आहे. हमसफर डिलर्स नावाची बनावट कंपनी तो चालवत असून या फर्मद्वारेच श्रीधर पाटणकर यांच्या फर्मला लोन मिळाल्याचं उघड झालं आहे.

मथुरा ते मुंबई, सीए ते हवाला डिलर

नंदकिशोर चतुर्वेदी हा उत्तर प्रदेशातील मथुरेचा रहिवाशी आहे. तो व्यवसायाने चार्टड अकाऊंटंट आहे. सुरुवातीला त्याने लघु उद्योजकांना आर्थिक सल्ला देण्याचं काम केलं. त्यानंतर त्याने हळूहळू हवाला ऑपरेशनमध्ये हातपाय मारण्यास सुरुवात केली. हवालाचे तंत्रमंत्र शिकल्यानंतर त्याने बनावट कंपन्या बनविण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याचे ग्राहकही वाढत गेले. 2000नंतर तर त्याने राजकारणातील लोकांना हवालाशी जोडण्यास सुरुवात केली. नोटाबंदी नंतर सर्वात आधी या प्रकरणात त्यांचं नाव आलं होतं. त्यामुळे 2017पासून तो ईडीच्या रडारवर आला होता.

चतुर्वेदी आहे कुठे?

सध्या नंदकिशोर चतुर्वेदी ईडीच्या निशाण्यावर आहे. मात्र, तो गेल्या दहा महिन्यांपासून फरार असल्याचं समजतं. चतुर्वेदीच्या प्रकरणांची ईडी आणि आयकरकडून चौकशी केली जात आहे. श्रीधर पाटणकर आणि चतुर्वेदीचे व्यावसायिक संबंध असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. चतुर्वेदी भारतातून पळून गेला होता असंही सूत्रं सांगतात.

150 बनावट कंपन्या

चतुर्वेदीने तब्बल 150 बनावट कंपन्या उघडलेल्या आहेत. बहुतेक कागदत्रांवर या कंपन्यांचं ऑफिस कोलकातामध्ये दाखवण्यात आलं आहे. याच कंपन्यांच्या माध्यमातून तो ब्लॅकमनीचा व्यवहार करत असतो. या व्यवहारातून आलेल्या नफ्याचा त्याने उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर, मुंबई-पुणे आणि देशातील काही शहरात मालमत्ता घेतली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

चतुर्वेदीचे काळे धंदे

  1. नंदकिशोर चतुर्वेदी हा भारतातल्या मोठया हवाला ऑपरेटर्सपैकी एक आहे.
  2. नंदकिशोर चतुर्वेदी हा मूळचा मथुरा उत्तरप्रदेशचा रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
  3. 2016 ला नोटबंदीचा निर्णय झाल्यानंतर अनेकदा त्याच नाव तपास यंत्रणांच्या रडारवर आलं.
  4. चतुर्वेदी बोगस शेल कंपन्यांच्या माध्यमातून पैशांची उलाढाल करण्यात अग्रेसर आहे.
  5. चतुर्वेदीने अनेक व्यावसायिक तसेच राजकीय व्यक्तीसोबत शेल्स कंपन्यांच्या माध्यमातून व्यवहार केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
  6. 150 हून अधिक शेल्स कंपन्या चालवण्यात चतुर्वेदीचा सहभाग असून यातील सर्वाधिक कंपन्या कोलकातामधून ऑपरेट केल्या जातात, अशी सूत्रांची माहिती आहे.
  7. 2017 साली पुष्पक बुलियन केसमध्ये त्याच नाव समोर आल्यानंतर ईडीने त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र तो हाती लागला नाही.
  8. ईडीने त्याला अनेकदा समन्स बजावलं होतं. मात्र तो ईडीसमोर हजर झाला नाही किंवा त्याच्या लीगल टीमनेही कधी उत्तर दिलं नाही.
  9. पुष्पक बुलियन ग्रुपमध्ये घोटाळा झाला. त्यात चतुर्वेदीचा रोल मोठा असल्याचं तपास यंत्रणांच म्हणणं आहे.
  10. ईडीबरोबरच इन्कम टॅक्स आणि इतर तपासयंत्रणा त्याचा शोध घेत आहेत.
  11. ईडीची टीम उत्तरप्रदेश मथुरा परिसरात त्याच्या शोधासाठी गेली होती. मात्र तो हाती लागला नाही.

संबंधित बातम्या:

TOP 9 Headlines | 23 March 2022 | टीव्ही 9 मराठी Alert | एका मिनिटात 9 बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील ईडीच्या कारवाईनंतर Fadnavis पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, मोदींच्या राज्यात…

Sanjay Raut On Modi: एक पुतीन दिल्लीत बसलेत, ते रोज आमच्यावर मिसाईल सोडताहेत; राऊतांची फटकेबाजी

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.