AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धो धो धो…पावसामुळे धरणं भरणार, नद्यांना पूर, पाऊस बरसणार; पंजाबराव डख यांचा तातडीचा हवामान अंदाज!

मुंबई, पुणे, अकोले, अहिल्यानगर, संगमनेर, ओझर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागातील शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात काळजी घ्यावी. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस असेल. अतिवृष्टी होऊ शकते.

धो धो धो...पावसामुळे धरणं भरणार, नद्यांना पूर, पाऊस बरसणार; पंजाबराव डख यांचा तातडीचा हवामान अंदाज!
panjabrao dakh and weather updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 28, 2026 | 8:37 PM
Share

Monsoon Update : राज्यात येत्या काही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानाची माहिती देणारे पंजाब डख यांनी हवामानाचा नवा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मतानुसार जुलै महिन्यात 8 तारखेपर्यंत राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.

1 जुलैपासून पाऊस धुमाकूळ घालणार

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर, सांगली जिल्हा, लातूर, धाराशीव या जिल्ह्यातील लोकांसाठी खुशखबर आहे. आगामी तीन दिवसांत या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस दोन ते तीन दिवस पडेल. त्यानंतर या भागात रिमझिम स्वरुपाचा पाऊस असेल. तसेच राज्यात मात्र 1 जुलैपासून पाऊस धुमाकूळ घालणार, जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात राज्यात पाऊस होणार आहे, असेही डख यांनी सांगितले.

मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस

मुंबई, पुणे, अकोले, अहिल्यानगर, संगमनेर, ओझर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या भागातील शेतकऱ्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात काळजी घ्यावी. मुंबईत जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस असेल. अतिवृष्टी होऊ शकते. पुण्यातही अतिवृष्टी होऊ शकते. शिर्डी, राहता, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, फुलंब्री या पट्ट्यातही जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.

मराठवाड्यात पासवाची कशी स्थिती?

नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रात पावसाचे उशिराने आगमन होईल. या भागातही जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठा पाऊस होईल. पहिल्याच पावसात ओढे, नाले दुथडी भरून वाहणार. बंधारे भरून वाहतील. गुजरातच्या सीमेकडील भागात उशिरा पाऊस येईल. पण शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही. मराठवाड्यात परभणी, हिंगोली, लातूर, बीड, नांदेड, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यांत आठ जुलैपर्यंत रोज पाऊस पडेल. वेगवेगळ्या भागात हा पाऊस असेल. जमिनीत ओल असेल तर पेरणी करून घ्यावी अन्यथा 10 जुलैपर्यंत थांबावे लागेल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले आहे.

अहिल्यानगरातील धरणं भरून जातील

विदर्भातही आठ जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस होईल. वर्धा, नागपूर, वाशीम, भंडारा, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, अमरावती या भागातील शेतकऱ्यांनी जमिनीत ओल झाली की पेरणी करून टाकावी. अहिल्यानगरातील धरणं भरून जातील. ज्या भागात अजूनही पाऊस आलेला नसेल तर एक आणि आठ जुलै या काळात त्या भागात पाऊस पडू शकतो, असे डख यांनी सांगितले आहे.

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी