दुःख असून सुद्धा आम्ही पाठीवरून हात फिरून लेकरं पाठवतो, ‘या’ गावातील 100 पेक्षा जास्त जवान सीमेवर
दुःख असून सुद्धा आम्ही पाठीवरून हात फिरून लेकरं पाठवतो..., देशाच्या रक्षणासाठी 'या' गावातील 100 पेक्षा अधिक जवान सीमेवर, पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे असं म्हणत आई-वडिलांचे अश्रू अनावर

Operation sindoor: भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावग्रस्त वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानच्या कुरघोड्या सुरुच आहे. आपले भारतीय जवान देखील पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. : पहलगाम याठिकाणी दहशतवाद्यांनी सामान्य जनतेला लक्ष्य केलं. 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. तर याचाच बदल घेत भारतीय सेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं आणि पाकिस्तान येथे असलेल्या दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केली. यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, भारतीय जवानांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
महाराष्ट्रात असं एक गाव आहे जेथील 100 पेक्षा अधिक जवान सीमेवर राहून, स्वतःचे प्राण संकटात टाकत देशाचं रक्षण करत आहेत. हे गाव दुसरे तिसरं कोणतं नाही तर, नांदेड जिल्ह्यातील वागदरवाडी हे आहे. वागदरवाडी हे गाव सैनिकांचं गाव म्हणून देखील ओळखलं जातं.
नांदेडच्या वागदरवाडी येथील शंभर पेक्षा अधिक सैनिक सीमेवर कर्तव्य पार पडत आहेत. सैनिकांचं गाव म्हणून नांदेड जिल्ह्यात वागदरवाडीची ओळख आहे. सैन्यातूल निवृत्ती झालेले अनेक माजी सैनिक गावात राहतात. यावेळी देखील पाकिस्तानला धडा शिवण्यासाठी वागदरवाडी गावाने 100 पेक्षा अधिक जवान पाठवले आहेत.
एका निवृत्त सैनिकाच्या आई म्हणाल्या, ‘माझा एक मुलगा निवृत्त झाला आहे आणि एक मुलगा सीमेवर आहे. मुलगा देश राखायला गेला आहे. माझ्या जीवाला काहीही झालं तरी चालेल, पण त्यांना काहीही होऊ नये असं वाटतं… लेकरं देश राखत आहेत, त्यांना वनवास आहे…’
गावातील अन्य एक महिला म्हणाल्या, ‘रक्त सळसळत आहे. आम्ही आणखी जवान सीमेवर पाठवण्याच्या तयारीत… कसम खाल्ली आहे दुश्मना संग लढाई केलीच पाहिजे…दुःख असून सुद्धा आम्ही पाठीवरून हात फिरून लेकरं पाठवतो…’
माजी सैनिक आणि दोन सैनिकांच्या आई रेखा केंद्रे म्हणाल्या, ‘मी पंचवीस वर्षे आर्मीत राहिले त्या माणसाला खूप कष्ट आहेत. पंचवीस वर्षे माझ्या पतीने नोकरी केली पण मुलांचा रिझल्ट घ्यायला ते कधीच आले नाही. माझी दोन मुलं आहेत एक जम्मू-काश्मीरला आहे आणि एक राजस्थानला आहे. देशासाठी माझी मुलं गेलेत मला गर्व आहे. माझ्या पतीला जरी आता बोलावलं तर मी वर्दी सहित पाठवायला तयार आहे… असं देखील रेखा केंद्रे म्हणाल्या.
एक माजी सैनिक म्हणाले, ‘मी जम्मू-काश्मीरला साडेतीन वर्षे होतो ज्या हॉस्पिटलवर बॉम्ब हल्ला झाला त्या ठिकाणी माझी ड्युटी होती. असं वाटतंय आता जाव आणि बंदूक घ्यावी, 65 वर्ष वय झालं तरी रक्त सळसळ करत आहे…’
