AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hasan Mushrif  : खासदार गजानन कीर्तीकर आरोपांत काही तथ्य नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ

राज्यातील शिक्षकांच्या बदल्या कधी होणार असा प्रश्न विचारला जात होता. तर गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या बदल्यांना आता मुहुर्त लागला असून त्या 4 ते 5 दिवसात सुरू होतील असेही सुतोवाच पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.

Hasan Mushrif  : खासदार गजानन कीर्तीकर आरोपांत काही तथ्य नाही : पालकमंत्री हसन मुश्रीफ
पालकमंत्री हसन मुश्रीफ Image Credit source: tv9
| Updated on: May 30, 2022 | 7:15 PM
Share

अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) बिघाडी व्हावी म्हणून भाजपकडून सतत प्रयत्न होत असतात. तसेच वेगवेगळे विषय समोर करून महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत कसे मतभेद आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. तर रत्नागिरीतील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर (Shiv Sena MP Gajanan Kirtikar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निधी वाटपाच्या वाक्याचा उच्चार केल्याचे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कीर्तीकर म्हणाले की, विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात आहे. ग्रामविकास मंत्रालयाच्या 25/15 योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहावयास मिळत आहे. आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार मात्र, प्रत्यक्ष लाभ पवार सरकार घेते, अशा शब्दात कीर्तीकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला टोला हाणला होता. कीर्तीकर यांच्या आरोपांचे खंडण अहमदनगर येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hasan Mushrif) यांनी पत्रकार परिषदेत केलं आहे. तसेच खासदार कीर्तीकर यांनी केलेले आरोपांत काही तथ्य नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

फडणवीस यांनी शिवसेनेचा चिमटा काढला

दरम्यान निधी वाटपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली असून शिवसेनेला अतिशय कमी निधी मिळाल्याचे सांगत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा चिमटा काढला होता. त्यावरून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी हा आरोप फेटाळत फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले होते. मात्र, शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तीकर यांनी महाविकास आघाडीला एक प्रकारे घरचा अहेरच दिला. आणि आघाडीत सारे काही अलबेल नाही हे स्पष्ट केले होते. तसेच आपल्याला निधी मिळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मागे लागावे लागत असल्याचेही त्यांनी म्हटलं होतं. तर निधीची पळवापळवी केली जात असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. तर राज्यात ठाकरे सरकार असल्याचे म्हटले जाते मात्र प्रत्यक्ष लाभ पवार सरकारच निर्णय घेते, असे म्हणाले होते. त्यावर पलटवार करताना मुश्रीफ यांनी हा निधी पक्षीय नाही. त्यामुळे त्याच्या निर्णय हा सरकार घेत असते असे म्हटले आहे.

शिक्षकांच्या बदल्या 4 ते 5 दिवसात

तसेच पालकमंत्री मुश्रीफ यांनी राज्यातील रखलेल्या शिक्षकांच्या बदल्या या येत्या काही दिवसांत होतील असे म्हटले आहे. कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या या रखडल्या होत्या. त्यामुळे राज्यातील शिक्षकांच्या बदल्या कधी होणार असा प्रश्न विचारला जात होता. तर गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या बदल्यांना आता मुहुर्त लागला असून त्या 4 ते 5 दिवसात सुरू होतील असेही सुतोवाच पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.

तो प्रश्न शिवसेनेचा होता

राज्यसभेच्या निवडणूकीवरून राज्यात केंद्रस्थानी राहीलेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या विषयी प्रश्न विचारले असता तो प्रश्न शिवसेनेचा होता. त्यात आपण काही बोलणार नाही असे मुश्रीफ यांनी म्हटले आहे. तर संभाजीराजे छत्रपती यांच्या जागेबाबत शिवसेनेने निर्णय घ्यायचा होता. असेही त्यांनी म्हटले आहे.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.