Deepali Chavan Suicide | संतापलेल्या नवनीत राणांकडून महिला वन अधिकाऱ्यांची खरडपट्टी; वाचा संवाद जसाच्या तसा

Deepali Chavan Suicide | संतापलेल्या नवनीत राणांकडून महिला वन अधिकाऱ्यांची खरडपट्टी; वाचा संवाद जसाच्या तसा

नवनीत राणा यांनी या महिलांना खडे बोल सुनावत त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. राणा यांच्या रौद्र रुपाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. (navneet rana deepali chavan suicide)

prajwal dhage

| Edited By: Akshay Adhav

Mar 28, 2021 | 11:40 AM

अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वनपरिक्षेत्र महिला अधिकारी दीपाली चव्हाण (RFO Deepali Chavan Suicide) यांनी आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावरसुद्धा कारवाईची मागणी झाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ मेळघाटातील महिला वन कर्मचारी आणि अधिकारी खासदार नवनीत राणा यांच्या भेटीला आल्या होत्या. मात्र, यावेळी नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी या महिलांना खडे बोल सुनावत त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. राणा यांच्या रौद्र रुपाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. (MP Navneet Rana slams women forest workers and officers on Deepali Chavan suicide issue)

नेमकं प्रकरण काय?

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणात दीपाली यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये DFO विनोद शिवकुमार या वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव लिहिलं होतं. शिवकुमार यांच्या त्रासामुळेच मी आत्महत्या करत असल्याचं दीपाली यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं होतं. दीपाली यांनी ही सुसाईड नोट मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्या नावे लिहिली होती. त्यानंतर शिवकुमार आणि रेड्डी या दोन्ही अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जाऊ लागली. याच मागणीला घेऊन नवनीत राणा यांनी अमरावती पोलीस महानिरीक्षक यांची भेट घेऊन रेड्डी हेसुद्धा शिवकुमार यांच्याईतकेच दोषी असून त्यांच्यावरसुद्धा कारवाई व्हावी, अशी मागणी केली.

मात्र, त्यानंतर मेळघाटातील काही महिला वन कर्मचारी आणि अधिकारी श्रीनिवास रेड्डींच्या समर्थनार्थ खासदार नवनीत राणा यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. यावेळी राणा यांनी आक्रमक पवित्रा धारण करुन या महिलांना चांगलंच झापलं. तो संवाद जसाच्या तसा…

वाचा नवनीत राणा नेमकं काय म्हणाल्या?

माणसाने सही केली वेगळी गोष्ट आहे

महिलांनी कशी केली ?

बाकीचे कर्मचारी येऊन भेटून गेले

असं कुणी गोळी मारेल स्वत: ला

माझ्या नवऱ्यानं फोन लावले रेड्डीला

आणि तुम्ही त्याच्या बाजूने पत्र आणता रेड्डीच्या

थोडी तरी जाण ठेवा, बायका म्हणून

तुम्ही कश्या सह्या केल्या ?

तो आज या जिल्ह्यात आहे, उद्या कुठे जाईल

आपल्याला याच जिल्ह्यात रहायचे आहे

आमच्या सारखे लोकच तुमच्या मागे उभे राहणार

वेळ नाही लागत दिपालीताई दुसरी व्हायला

तुम्ही सगळे सोबत नाही राहिले तर आणखी दुसरे प्रकरण व्हायला वेळ लागणार नाही

रवी राणांनी देखील फोन केले

तुम्ही तर फाशी मागायला पाहिजे

पालकमंत्र्याचं पत्र असताना चौकशी का नाही केली ?

त्याचं उत्तर मागा त्यांना, मग त्याच्या बाजूनं उभा रहा

काही लोकं येऊन भेटून गेले

मी नागपूरला फोन लावला

त्याची बदली करुन टाकणार

रेड्डीच्या बाजूनं आल्या,चौकशी का नाही केली ?, त्याचं उत्तर द्या

मी तुमचं पत्र घेत नाही, उचला तुमचे पत्र

रेड्डीच्या सपोर्टचे पत्र पाहिजेचं नाही मला, उचला तुमचे पत्र

तुम्हाला काही प्राँब्लेम आला तर कुणाकडे जाणार

नवणीत राणा आणि महिला अधिकाऱ्यांच्या संभाषणाचा व्हिडीओ :

दरम्यान, दीपाली चव्हाण आत्महत्येनंतर माजी वनमंत्री संजय राठोड यांचे नव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. दीपाली चव्हाण यांनी आपले वरिष्ठ अधिकारी शिवकुमार आपला छळ करत असल्याची तक्रार आमदार रवी राणा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली होती. यानंतर याबाबत राणा यांनी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यासोबत पत्र व्यवहार करत दीपालीच्या बदलीची शिफारस केली होती. मात्र, राठोड यांनी या बदलीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप राठोड यांच्यावर होतोय.

इतर बातम्या :

Deepali Chavan Suicide | दीपाली चव्हाणवर अंत्यसंस्कार, शिवकुमारला फाशी द्या, आईला संताप अनावर

Deepali Chavan Audio Clip : ना भान, ना बोलण्याची तमा, कथित अधिकाऱ्यासोबत दीपाली चव्हाण यांचं संभाषण

(MP Navneet Rana slams women forest workers and officers on Deepali Chavan suicide issue)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें