Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटीत मद्यधुंद चालकांवर संक्रांत, महामंडळाने सुरु केली झाडाझडती, पाहा काय झाला निर्णय?

या तपासणीसाठी सुरक्षा खात्यातील पर्यवेक्षक, मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षक, प्रशिक्षण पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी महामंडळाकडे उपलब्ध असलेल्या अल्कोहोल टेस्ट वा ब्रेथ एनालायझरचा वापर करण्यात येणार आहे.

एसटीत मद्यधुंद चालकांवर संक्रांत, महामंडळाने सुरु केली झाडाझडती, पाहा काय झाला निर्णय?
MSRTC to conduct breath analyzer test of suspected drivers and conductors
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 1:19 PM

एसटी महामंडळाच्या वाहन चालकांना अत्यंत खडतर प्रशिक्षण दिलेले असते. तसेच वाहतूक क्षेत्रातील इतर वाहनांपेक्षा एसटीचा अपघाताची संख्या अत्यंत कमी आहे. तरीही एसटी महामंडळाने अलिकडे सोशल मीडियावर आलेल्या तक्रारींची दखल घेऊन एसटी महामंडळातील सर्व वाहक आणि चालकांची ब्रेथ एनालायझर टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या ब्रेथ एनालायझर चाचणीत शरीरातील अल्कोहोलचे प्रमाण नेमके किती आहे याची इत्यंभूत माहिती मिळत असते. त्यामुळे एसटी चालक आणि वाहकांवर जणू संक्रातच आलेली आहे.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची संख्या ८० हजाराच्या आसपास आहे. यात सर्वाधिक संख्या अर्थात वाहक आणि चालकांचीच आहे. या एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या चालक आणि वाहकांना आता ब्रेथ एनालायझरच्या चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. एसटीच्या ताफ्यात सध्या १६ हजार गाड्या असून त्यावर चालक आणि वाहकांची कामगिरी असते. या सर्व वाहक आणि चालकांची ब्रेथ एनालायझर टेस्ट घेण्यासाठी महामंडळाने खास पथकच नेमले आहे. या तपासणी पथकात सुरक्षा खात्यातील पर्यवेक्षक, मार्ग तपासणी पथकातील पर्यवेक्षक, प्रशिक्षण पर्यवेक्षक याचा समावेश करण्यात आला आहे.

एसटी महामंडळाने एक परिपत्रक जारी केले आहे. १६ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत विभागातील मद्यप्राशन करणाऱ्या संशयित चालक आणि वाहक यांच्या यादीप्रमाणे सर्व चालक आणि वाहकांची तपासणी विशेष पथके नेमुन करण्यात यावी असे एसटी महामंडळाने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. रजेवर असलेल्या किंवा गैरहजर असलेल्या चालक आणि वाहक यांना वगळता इतर सर्व संशयित चालक आणि वाहकांची तपासणी करण्यात यावी असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. तपासणी न झालेल्या चालक आणि वाहकांची तपासणी न होण्याची कारणे देखील नमुद करण्यात यावी असेही या परिपत्रकात म्हटले आहे. या व्यतिरिक्त बसस्थानक, कंट्रोल पॉईंटवरील वाहतूक नियंत्रकांमार्फत लॉग शिट नोंद करताना इतर सर्व चालक वाहकांची तपासणी करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

वसतीच्या गाड्यांचे चालक निशाण्यावर

विशेषतः मुक्कामी असणारे चालक आणि वाहक यांची प्राधान्याने ब्रेथ एनालायझर तपासणी करण्यात यावी. तसेच या मोहीमेदरम्यान तपासलेल्या सर्व चालक आणि वाहकांच्या नोंदी करण्यात याव्यात. याबाबत एकत्रित अहवाल विभाग नियंत्रक यांच्यामार्फत mctaccident@gmail.com या कार्यालयीन ईमेलवर दि. २२ जानेवारी २०२५ पर्यंत पाठविण्यात याव्यात असे आदेश महामंडळाचे महाव्यवस्थापक ( वाहतूक ) यांच्या नावाने प्रसिद्ध झालेल्या पत्रकात दिले आहेत.

खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.