LIVE : मनसेची विदर्भात चाचपणी, राज ठाकरेंची प्रचारसभाही होणार?

LIVE : मनसेची विदर्भात चाचपणी, राज ठाकरेंची प्रचारसभाही होणार?
Picture

काँग्रेस आज 50 उमेदवारांची यादी जाहीर करणार

काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होणार, 50 उमेदवारांची पहिली यादी आज येणार, ‘सिटिंग गेटिंग’ या तत्त्वानुसार सर्व आमदारांना काँग्रेस तिकीट देणार, 26 तारखेला काॅंग्रेसची दुसरी यादी,- छाननी समितीचे सदस्य विजय वडेट्टीवार यांची माहिती

21/09/2019,10:41AM
Picture

मनसेकडून विदर्भातील जागांची चाचपणी

नागपूर : मनसे विदर्भात वणी, हिंगणघाट, अकोला जिल्ह्यातील एक आणि बुलडाणा जिल्ह्यातील जागा लढणार, उद्या विदर्भातील नेत्यांची राज ठाकरे यांनी बैठक बोलावली. राज ठाकरे विदर्भात घेणार प्रचार सभा. मनसे आघाडीत निवडणूक लढवण्याचीही चर्चा सुरु, सूत्रांची माहिती.

21/09/2019,9:28AM
Picture

काँग्रेसची यादी लांबणीवर

काँग्रेसची विधानसभा निवडणुकी संदर्भात येणारी पाहिली यादी लांबणीवर. निवडणूक आयोग जोपर्यंत निवडणुका घोषित करत नाही तोपर्यंत यादी नाही. काँग्रेसची यादी मात्र तयार, सूत्रांची माहिती

21/09/2019,9:27AM
Picture

मनसेकडून अधिकाऱ्याला खड्डे राईड

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील मूल महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्याचा मनसेचा अनोखा प्रयत्न. महामार्ग प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला दुचाकीवर करवली खड्डे राईड.मनसेचे नगरसेवक सचिन भोयर यांचा अफलातून प्रयत्न. फजितीनंतर अधिकाऱ्याने तातडीने काम सुरु करण्याचे ठेकेदाराला आदेश. चंद्रपूर शहरातून जाणारा मूल रोड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९३१ म्हणून घोषित झाला आहे. सावरकर चौक ते MEL पर्यंत रस्त्यावर खड्डे आणि उडणारी धूळ यामुळे दुरावस्था झाली आहे. अशोक मत्ते हे उपविभागीय अधिकारी आहेत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे ज्यांना ही मनसेतर्फे खड्डे राईड घडविण्यात आली.

21/09/2019,9:27AM
Picture

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरात तयारीला वेग

कोल्हापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरात तयारीला वेग. बुधवारी मुख्य गाभाऱ्याची स्वच्छता होणार. बुधवारी दिवसभर अंबाबाईचे दर्शन राहणार बंद. भाविकांना उत्सवमूर्तीचे दर्शन घेता येणार

21/09/2019,9:26AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *