AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणवासियांचा 14 वर्षांचा वनवास संपणार? मुंबई-गोवा महामार्गासाठी फायनल डेडलाईन निश्चित, नितीन गडकरींकडून ठेकेदारांना दम

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वर्षानुवर्षे रखडले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कामात विशेष विलंब होत असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदारांना कडक शब्दात कानउघडणी केली आहे.

कोकणवासियांचा 14 वर्षांचा वनवास संपणार? मुंबई-गोवा महामार्गासाठी फायनल डेडलाईन निश्चित, नितीन गडकरींकडून ठेकेदारांना दम
Mumbai-Goa Highway update
| Updated on: Jul 14, 2025 | 1:59 PM
Share

गेली तब्बल 14 वर्षे रखडलेल्या बहुचर्चित मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जातो. आता याच मुंबई-गोवा महामार्गाबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम आता वेळेत पूर्ण करण्यावर केंद्र सरकारने भर दिला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदारांची कडक शब्दात कानउघडणी केली आहे. तसेच या महामार्गासाठी नवी डेडलाईनही नितीन गडकरींनी दिली आहे.

नेमकं कुठे रखडलंय काम?

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम गेली अनेक वर्ष रखडलं आहे. यातील सर्वाधिक काम रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यातील आहे. आरवली ते कांटे या ३९ किमीच्या टप्प्यासाठी सुमारे ६९२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. पण हे काम अजूनही अपूर्ण आहे. तर कांटे ते वाकेड हा ४९ किमीचा दुसरा टप्पा असून याचं अंदाजपत्रक ८०० कोटी रुपयांचे आहे पण याचंही काम पूर्ण झालेलं नाही. या कामात प्रचंड विलंब होत आहे. या विलंबामुळे मूळ अंदाजपत्रकापेक्षा सुमारे ३० टक्के कामात वाढ होणार आहे. त्यामुळे या दोन्ही टप्प्यांना प्रत्येकी २५० ते ३०० कोटी रुपये वाढीव निधी लागण्याची शक्यता आहे.

त्यातच आता रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या दोन टप्प्यांचे काम सर्वाधिक रखडले आहे. त्या कामासाठी आता कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने दिली आहे. आरवली ते कांटे (३९ किमी) आणि कांटे ते वाकेड (४९ किमी) या टप्प्यांसाठी ठेकेदारांनी सरकारकडे मुदतवाढ मागितली होती. मात्र ही मुदतवाढ अखेर नाकारली आहे. त्यामुळे, आता हे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

गडकरींकडून ठेकेदारांची चांगलीच कानउघडणी

मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून केंद्र सरकारला आणि विशेषतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मोठ्या प्रमाणात विरोधक आणि जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. अनेक मंत्र्यांनी महामार्गाची वारंवार पाहणी केली, पण काम काही पूर्ण होत नसल्याचे पाहायला मिळाले. नुकतंच दिल्लीत गडकरींनी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम करणाऱ्या ठेकेदारांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत गडकरींनी ठेकेदारांची चांगलीच कानउघडणी केली. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करण्याकडे आपलं अधिक लक्ष असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ठेकेदारांनी पुन्हा मुदतवाढ मागितली असता, गडकरींनी त्यांची मागणी फेटाळून लावली. त्याच मुदतीत म्हणजे मार्च २०२६ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे सक्त आदेश नितीन गडकरींनी दिले आहेत.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.