AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! जरांगेंचा मोठा विजय, कोर्टाचा आला आदेश, आता सरकारला…

जरांगे यांचे उपोषण थांबवावे अशीही मागणी करण्यात आली होती. सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा आंदोलकांना एका प्रकारे दिलासाच मिळाल्याचे म्हणाले लागेल.

सर्वात मोठी बातमी! जरांगेंचा मोठा विजय, कोर्टाचा आला आदेश, आता सरकारला...
manoj jarange patil
| Updated on: Sep 01, 2025 | 4:58 PM
Share

Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगे यांच्या आंदोलनादम्यान नियमांचे उल्लंघन करण्यात आले. जरांगे यांनी मुंबई वेठीस धरली आहे, असा आरोप सातत्याने होत आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते तसेच अन्य लोकांनी जरांगेंच्या या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच जरांगे यांचे उपोषण थांबवावे अशीही मागणी करण्यात आली होती. सर्वांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आता राज्य सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा आंदोलकांना एका प्रकारे दिलासाच मिळाल्याचे म्हणाले लागेल.

जरांगे यांच्या आंदोलनाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर न्यायालयाने आज सुनावणी घेतली. न्यायालयाच्या निर्देशानुसार 2 सप्टेंबर रोजीदेखील याच प्रकरणावर आता सुनावणी होणार आहे. तत्पुर्वी न्यायालयाने राज्य सरकारला काही निर्देश दिले आहेत.

30 आणि 31 ऑगस्ट रोजी आंदोलनाची परवानगी नाही

आजची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला काही निर्देश दिले आहेत. हे निर्देश देण्याअगोदर राज्याच्या महाधिवक्त्यांनी सरकारची बाजू मांडली. जरांगे यांच्या आंदोलनात सर्व नियम मोडण्यात आले आहेत. 30 आणि 31 ऑगस्ट रोजी सरकारने आंदोलनाला परवानगी दिलेली नव्हती, असेही सरकारने न्यायालयात स्पष्ट केले. तसेच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनीदेखील जरांगे यांचे उपोषण लवकरात लवकर थांबवावे अशी मागणी केली. तर जरांगे यांनी आतापर्यंत कोर्टाच्या सर्व आदेशांचे पालन केलेले आहे, असा दावा जरांगेंची बाजू मांडताना करण्यात आला. दरम्यान, या सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

न्यायालयाने नेमके काय निर्देश दिले?

या प्रकरणावर 2 सप्टेंबर रोजी पुन्हा सुनावणी होईल, असे न्यायालयाने सांगितले. आंदोलकांना जेवण आणि पाण्याचे साहित्य आणण्यास तात्पुरती परवानगी असेल असे न्यायालयाने सांगितले. उपोषणादरम्यान जरांगे यांची प्रकृती बिघडल्यास त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करावे, असेही यावेळी न्यायालयाने म्हटले आहे.

नियम आणि अटींचे पालन करावेच लागेल

सर्वात महत्त्वाचे म्हणजे 5 हजार लोकांना अटी शर्तींच्या आधारे राहून सरकार पुन्हा परवानगी द्यायची असल्यास देऊ शकते अशीही सूचना न्यायालयाने सरकारला दिली. पण ही परावनगी दिल्यानंतर नियम आणि अटींचे पालन करावेच लागेल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे न्यायालयाचा हा आदेश म्हणजे मराठा आंदोलकांसाठी एका प्रकारचा दिलासा असल्याचे म्हटले जात आहे.

जरांगेंचा आंदोलनाचा अधिकार ठेवला कायम

कोर्टाने जरांगे यांच्या आंदोलनाच्या विरोधात आदेश द्यावेत म्हणून राज्य सरकारकडून पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. मात्र न्यायालयाने या प्रकरणी आपले जुनेच आदेश जैसे थे ठेवले असून जरांगे यांचा आंदोलनाचा अधिकार कायम ठेवला आहे. त्यामुळे राज्य सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे.

Follow Us
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान