AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांच्या घरात आयाबहिणी नाहीत का? मुंबईच्या महापाैर रितू तावडे संतापल्या, थेट, म्हणाल्या…

मुंबईच्या महापाैर रितू तावडे सतत ट्रोल होत आहेत. नुकताच त्यांनी केलेल्या एका विधानानंतर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यादरम्यान रितू तावडे यांनी नक्की काय घडले हे सांगितले. यासोबतच त्यांनी थेट संताप व्यक्त केला.

त्यांच्या घरात आयाबहिणी नाहीत का? मुंबईच्या महापाैर रितू तावडे संतापल्या, थेट, म्हणाल्या...
Ritu Tawde
| Updated on: Apr 01, 2026 | 1:42 PM
Share

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी एक विधान केले आहे. गुरुदेवजींच्या आशीर्वादाने माझ्या घशाची समस्या नाहीशी झाली. हा तर चमत्कार झाला, असे रितू तावडे म्हणाल्या होत्या. रितू तावडे यांनी केलेल्या विधानानंतर अनेकांनी भुवया उंचावल्या. अशोक खरात प्रकरण ताजे असताना रितू तावडे यांनी हे विधान केल्याने खळबळ उडाली. सतत टीका होत असल्याने आता रितू तावडे यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. रितू तावडे यांनी म्हटले की, संजय राऊत यांच्या जिभेला हाड नसल्याचेही त्यांनी म्हटले. अंधश्रद्धेचा हा विषय नाही तर श्रद्धेचा विषय असल्याचेही त्यांनी म्हटले. रितू तावडे यांनी म्हटले की, जैनमुखींच्या त्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते.

गुरूदेव नम्रमुनी महाराज यांना मी भेटले मला गळ्याचा त्रास होत होता. त्यावेळी त्यांनी मला ओमचा उच्चार करण्यास सांगितले. ज्यावेळी आपण ओमचा उच्चार करतो, त्यावेळी आपल्या गळ्याचा एक व्यायाम होतो आणि गळ्याला आराम मिळतो. घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह, नगरसेविका राखी जाधव, धर्मेश गिरी आम्ही त्यावेळी गुजरातमध्ये त्यांचा आर्शिवाद घेण्याकरिता गेलो होतो.

त्यावेळी त्यांनी आमच्याकडून ओमचा उच्चार करून घेतला होता. मी सातत्याने रोज उठून सतत ओमचा उच्चार करत आहे. त्याचा परिणाम असा झाला की, आज माझा गळा चांगला झाला. मी ती माझी भावना व्यक्त केली. याच्यामध्ये कुठेही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचे काम नव्हते. स्वामी समर्थ महाराज, साईबाबा आम्ही सर्व भक्त आहोत. आदरनीय नम्रमुनीजी यांना आम्ही फॉलो करतो.

मी घरी पोहोचले नाही, त्यापूर्वीच अशाप्रकारच्या न्यूज लावल्या गेल्या. अतिशय घाणेरडे, किळस वाटते मला या गोष्टींची.. तुम्ही कोणाबरोबर कोणाला जोडताय? मला खरोखर वाईट वाटतंय, असेही रितू तावडे यांनी म्हटले. पुढे बोलताना रितू तावडे यांनी म्हटले की, काल ते जे बोलले ते कुठेच आले नाही. त्या कार्यक्रमाबद्दल कुठेच आले नाही. जे ट्रोल करतात.. त्यांच्या घरी काही आयाबहिणी आहेत की नाही? असाही सवाल रितू तावडे यांनी केला. कशा पद्धतीने तुम्ही ट्रोल करतात? खालच्या पातळीवर जाऊन ट्रोल करता..

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...