AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणुकीत कुणासोबत राहणार, मनसे की महाविकास आघाडी?; संजय राऊत यांनी थेटच सांगितलं

संजय राऊत यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि महाविकास आघाडीपैकी कोणासोबत युती करायची याबाबतचा प्रश्न उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाईल असेही सूचित केले. राऊत यांनी भाजपवर प्रभाग रचनेबाबत आरोप केले आहेत आणि निवडणूक आयोगाला जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे.

महापालिका निवडणुकीत कुणासोबत राहणार, मनसे की महाविकास आघाडी?; संजय राऊत यांनी थेटच सांगितलं
संजय राऊत
| Updated on: Jun 12, 2025 | 11:14 AM
Share

राज्यात महापालिका निवडणुकांचे पडघम वाजले आहेत. महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. खास करून मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे गट आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर मुंबई महापालिकेत आपलंही वजन वाढवण्याचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे. या चर्चा सुरू असतानाच मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्याही जोरदार चर्चा सुरू आहेत. महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती करणार की महाविकास विकास आघाडीसोबत युती करणार? असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी नेमकं उत्तर दिलं आहे.

खासदार संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. मात्र, मीडियाच्या प्रश्नाला उत्तर देताना काही सूचक विधानं करून चर्चेचं रान मोकळं करून दिलं आहे. मनसे सोबत महापालिकेत जायचं की महाविकास आघाडीसोबत जायचं याचं उत्तर उद्धव ठाकरे लवकरच देतील. ते तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे देतील. उद्धव ठाकरेंकडे तुमचा प्रश्न गेला आहे. त्यांनी या उत्तराची तयारी केली असून तुम्हाला या संदर्भात ते लवकरच माहिती देतील, असं संजय राऊत म्हणाले.

राऊतांचं सूचक विधान

राज्यात सध्या महाविकास आघाडी एकत्रित काम करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय वेगळा आहे. कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत हे आम्ही तपासणार आहोत. कार्यकर्त्यांना कुणासोबत जावं वाटतं, कुठे काँग्रेस सोबत जायचं, कुठे राष्ट्रवादीसोबत जायचं आणि मुंबईत काय करायचं हे आम्ही नंतर ठरवू, असं सूचक विधान राऊत यांनी केलं आहे.

भाजपवर आरोप

यावेळी प्रभाग रचनेवरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी वॉर्ड फोडले जाऊ शकतात. आपल्या सोयीची वॉर्ड रचना केली जाऊ शकते. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने कुणाचाही दबाव झेलू नये. त्यांनी जागल्याच्या भूमिकेत राहावं. कारण समोरच्या लोक दहशत निर्माण करू शकतात. त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

देऊ द्या शुभेच्छा

ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. शुभेच्छा बॅनरवर राज ठाकरे यांचाही फोटो आहे. याकडे राऊत यांचं लक्ष वेधलं असता, देऊ द्या शुभेच्छा. शुभेच्छा देणं ही आपली परंपरा आहे. कुटुंबातील व्यक्तीला शुभेच्छा देण्यात गैर काय? त्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही, असंही ते म्हणाले.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी