AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत एकनाथ शिंदे किती स्ट्रॉंग? आतापर्यंत किती नगरसेवकांची साथ? आकडे काय सांगतात ?

तीन वर्षांपूर्वीच्या शिवसेना फुटी आणि एकनाथ शिंदे यांच्या उदयानंतर, त्यांच्या शिवसेनेचे मुंबईतील वर्चस्व वाढत आहे. 2017पासून 60 पेक्षा जास्त नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे, यात ठाकरे गटाचे 45 नगरसेवक समाविष्ट आहेत.

मुंबईत एकनाथ शिंदे किती स्ट्रॉंग? आतापर्यंत किती नगरसेवकांची साथ? आकडे काय सांगतात ?
मुंबईत एकनाथ शिंदे किती स्ट्रॉंग?Image Credit source: social media
| Updated on: Aug 04, 2025 | 8:41 AM
Share

तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि शिवसेना फुटून दोन भाग झाले. ठाकरे गट आणि शिंदे गट अशा दोन गटांत सातत्याने आरोप-प्रत्यारोप, वर्चस्वाचे राजकारण सुरू असतं. 40 पेक्षा जास्त आमदार घेऊन शिंदे बाहेर पडले, आणि भाजपच्या साथीला जाऊन त्यांनी सरकार स्थापन केलं.  त्यानंतर ते जवळपास अडीच वर्षं, राज्याचे मुख्यमंत्री देखील होते. तेव्हापासूनच शिंदेंची पॉवर हळूहळू वाढू लागली असून दिवसेंदिवस ते स्ट्राँग होत आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष झडझडून कामाला लागले असून प्रत्येक जण आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आता मुंबईत शिवसेना शिंदे गट, एकनाथ शिंदे किती स्ट्राँग झालेत ते समोर येत आहे. 2017 ते 2022 या 5 वर्षांच्या काळात विविध पक्षाच्या 60 नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे , यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सर्वाधिक, म्हणजे 45 नगरसेवक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस 5, काँग्रेस 6, एमआयएम 2, समाजवादी पक्ष 1, मनसे 1 या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

काय सांगते आकडेवारी ?

मुंबई महापालिकेतील सध्याचे राजकीय बलाबल पाहूया.

मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे 84 नगरसेवक निवडून आले. निकालानंतर 4 अपक्ष नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या एकूण नगरसेवकांची संख्या 88 झाली होती. पुढे मनसेचे 6 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यानंतर शिवसेनेकडील नगरसेवकांची संख्या 94 झाली. त्यानंतर 2022 पर्यंत शिवसेनेचे आणखी 5 नगरसेवक वाढले. शिवसेनेकडे एकूण 99 नगरसेवक होते.

2017 च्या निवडणुकीत मुंबई महापालिकेत शिवसेनेचे सर्वाधिक 84 नगरसेवक निवडून आले होते. त्याखालोखाल भाजपचे 82 नगरसेवक जिंकले होते. काँग्रेसचे 31 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 नगरसेवक आणि मनसेचे 7 नगरसेवक, समाजवादी पक्षाचा 1 नगरसेवक व 14 अपक्ष नगरसेवक झाले होते.

वर्ष 2012-2017 मधील 33 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे 15, काँग्रेस 8, मनसे 5, अपक्ष 2, समाजवादी पक्ष 1, राष्ट्रवादी काँग्रेस 1, अखिल भारतीय सेनेच्या एका माजी नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केला.

तर वर्ष 2007-2012 मधील 14 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8 नगरसेवक आणि काँग्रेसच्या 6 नगरसेवकांचा समावेश आहे. वर्ष 2002-2007 मधील 5 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 नगरसेवक आणि काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचा समावेश आहे. 2002 सालापूर्वीच्या 12 माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 नगरसेवक, भाजप 2, राष्ट्रावादी काँग्रेस 1, काँग्रेस 2, मनसे 1 या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे समोर आले आहे.

Follow Us
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच...
महायुतीत बिनसलं? शिंदेंचे नेते अभिजीत दीपकेला भेटताच... भाजपच्या बड्या नेत्याने सांगितली खदखद
सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
Sada Sarvankar On Raj Thackeray | 18 कोटींच्या चोरीचा दावा चुकीचा?; सिद्धिविनायक दानपेटी वादात सरवणकरांनी ठाकरेंना दिलं सडेतोड उत्तर
अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
Abhijeet Dipake | अभिजीत दीपकेच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर, डॉक्टर म्हणाले...
आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही...
Sonam Wangchuk | आश्वासनं पूर्ण करा, आंदोलनाच्या मागण्या विसरलो नाही; सरकारला सोनम वांगचुक यांचा थेट इशारा