
मुसळधार पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर वसई विरारसह पालघर जिल्ह्यात आज दिवसभर हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. अतिवृष्टी मुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज दिवसभर शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. जिल्ह्यातील मोडकसार, मध्यवैतारणा, तानसा या तिन्ही धरणाचा पाण्याचा विसर्ग सुरू केला असून जिल्ह्यातील नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. येत्या 28 जुलै रोजी वर्धा येथे भाजपची विदर्भस्तरीय संघटनात्मक बैठक होणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मंथन होणार आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. आगामी नगर परिषद, महा नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकीतील रणनीती या निवडणुकीत ठरणार असल्याने ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे. यासह देश-विदेश, महाराष्ट्र, क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.
परभणीत दुपार पासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे परभणीच्या पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा ते पूर्णा रस्ता बंद झाला आहे. माटेगाव जवळील नवीन पुलाच्या बांधकाम निमित्त तयार केलेल्या वळण रस्त्यावरून आणि जून्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला आहे.
हिंदू सेनेचे संत युवराज यांनी शिर्डीतील मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवण्याची मागणी केली होती. आता त्यांनी साई मूर्ती गटारात फेकण्याचे विधान मागे घेतले आहे, मात्र सनातन हिंदू मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवणारच असं त्यांनी म्हटलं आहे.
बुलढाणा: लोणार तालुक्यात आज झालेल्या जोरदार पावसामुळे सावरगाव तेली येथील नारळी नदीला पूर आला. या नदीच्या पुलावरून पाणी वाहत असून शेतातून यशोदा चव्हाण ही महिला घरी परतत होती, मात्र नदी ओलांडत असताना ती पाय घसरून नदीत पडली व वाहून जाऊ लागली. यानंतर गावातील युवकांनी नदीमध्ये उडी मारली आणि त्या महिलेला वाचवले.
गणेशोत्सवात दरवर्षी लाखो चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळे कोकण रेल्वे, एसटीचे आरक्षण फुल्ल होते. तसेच रस्ते मार्गांवरही मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे औचित्य साधून कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने यंदा एक खास भेट आणली आहे. खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यातील प्रवासाची दगदग यामुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि अनोखी ‘रोल-ऑन रोल-ऑफ’ सेवा दिली जाणार आहे. 23 ऑगस्टपासून ही सेवा सुरू होणार आहे.
पुण्याच्या राजगुरुनगर मध्ये कारगिल विजय दिनी शहीदांना मानवंदना करण्यात आली यावेळी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावून आलेले माजी सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते ,खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांच्या उपस्थितीत माजी सैनिकांनि जोरदार घोषणाबाजी केली.
मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर उतारावर ब्रेक फेल झालेल्या एका कंटेनर ने या सर्व गाड्यांना उडवले आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.जवळपास पंधरा ते वीस गाड्यांचे नुकसान झाले आहे.
–
नंदुरबार येथील शहादा येथे माणिकराव कोकाटे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. मी कुणाकडे आतापर्यंत झुकलेला नाही आणि आणि झुकणार पण नाही असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
बीडच्या मांजरसुंबा-नेकनूर दरम्यान महामंडळाच्या एसटी बसचे दोन चाकं पडले निखळुन पडल्याची घटना घडली आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे 70 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
मुसळधार पावसामुळे गोंदिया शहरातील मुख्य चौक असलेला अवंती चौक पुराच्या पाण्याखाली आला आहे. यामुळे चारही बाजूवरील रस्त्यांवर तीन ते चार फूट पाणी साचलं आहे. मात्र या पाण्यातून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वर्दळीचं ठिकाण असल्यामुळे या चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आ
कृषिमंत्री कोकाटेंची शिवसेना आमदार बोंढारकरांनी पाठराखण केली आहे. रम्मी खेळावरून म्हणजे एवढ्या छोट्या कारणावरून त्यांचा राजीनामा घेणे योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं. ते म्हणाले “कृषिमंत्री म्हणून ते चांगलं काम करतात, विरोधकांना विरोध करायचा असतो.छोट्या विषयावरून राजीनामा घेणे हे काही बरोबर नाही” असं म्हणत कोकाटेंची बाजू घेतली.
सोमवारी कोकाटे देणार राजीनामा देणार असल्याचं माहिती समोर आली आहे. विधानपरिषदेत रमी खेळल्याच्या आरोपामुळे त्यांच्या अनेक अडचणी वाढल्या असून. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे आता सोमवारी कोकाटे राजीनामा देणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यात वॉचमन मारहाण प्रकरणातील दाखल असलेल्या गुन्ह्यात गोकुळ याला ताब्यात घेत न्यायालय केले हजर… शनिवारी तरुणी मारहाण प्रकरणी न्यायालयाने गोकुळला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली होती त्यानंतर मानपाडा पोलिसांनी दुसऱ्या जुन्या गुन्ह्यात आरोपीला ताब्यात घेत सुरू केला होता तपास…
नाशिकच्या देवळाली गाव परिसरातील कपालेश्वर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर ची जीएसटी गुप्तचर यंत्रणेकडून चौकशी सुरू… श्रीकांत परे असे संशयिताचे नाव… संशयीताकडून एक पिस्तूल आणि सहा जिवंत राऊंड करण्यात आले जप्त… पुण्याची जीएसटीची गुप्तचर यंत्रणा नाशिकमध्ये करत आहे कारवाई… संशयित बनावट सॉफ्टवेअर बनवून शासनाची फसवणूक करत असल्या प्रकरणी कारवाई केल्याची सूत्रांची माहिती
सोलापूर शहरासह जिल्ह्यात पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा… जिल्ह्यात 3 लाख 15 हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्यात… दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बळीराजा चांगलाच सुखवलाय… जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या… मात्र महिनाभर पाऊस न आल्याने शेतकरी चांगलाच धास्तावलेला पाहायला मिळाला
जे गुंडगिरीची भाषा चालली आहे ना मल्टिप्लेक्स वर दगड मारणार. गुंडागर्दी की भाषा बंबई में नाही चाले. फिल्म एन्टरटेन्मेंट है पब्लिक डिमांड वर चालत असते. ज्यामध्ये लोकांना इंटरेस्ट नाही ते चित्रपट का बघतील, असा खोचक टोला गुणरत्न सदावर्ते यांनी ये रे ये रे पैसा सिनेमावर केली आहे.
जळगावात शिवसेना ठाकरे गटाचे 13 महापालिकेच्या नगरसेवकांचा भाजपमध्ये लवकरच प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. यात विधानसभेत भाजपमध्ये कारवाई झालेल्या काही नगरसेवक सुद्धा पुन्हा भाजपमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीची चर्चा आहे. संबंधित सर्व नगरसेवकांच्या भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशाच्या चर्चेनेच भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले असून भाजप नगरसेवकांनी या प्रवेशाला आतापासूनच विरोध दर्शवला आहे
धनंजय मुंडे यांना क्लीन चीट देण्याचा काम कोण करत आहे मला माहित नाही सरकार कोणाचं ज्या प्रकरणात त्यांना जावं लागलं तो विषय गंभीर आहे घाई घाईने एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेणे अद्याप खटल्याचा संपूर्ण निकाल लागायचा आहे बीडचा देशमुख प्रकरणात एवढी घाई का झाली आहे अजित पवार यांना, असा सवाल त्यांनी अजितदादांना केला. तर माणिकराव कोकाटे यांना पदावरून काढायला तयार नाहीत रमी खेळत आहेत कृषी मंत्री याला काढायचं त्याला घ्यायचं त्याला काढायचं संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते री शफल करणं गरजेचं आहे, असे ते म्हणाले.
आम्हाला विकास करायचाय, त्यामुळे कोण काय बोलते, यामध्ये आम्हाला पडायचं नाही. आम्ही या राजकारणात पडणार नाही. नो कमेंट्स असे अजितदादांनी प्रतिक्रिया दिली.
विकास कामांना अडथळे ठरणारी अनधिकृत बांधकामे पाडा आणि जो आडवा येईल त्याला आडवा करा, अशा कडक शब्दात दादांनी प्रशासनाला सूचनाही दिल्यायत, मात्र,ग्रामस्थांना विचारात न घेता प्रशासनाकडून केला जात असलेला हिंजवडी आणि परिसरातील विकास, हा एकतर्फी असल्याचं सांगत , ग्रामस्थानी आपला संताप व्यक्त केलाय ,हिंजवडी आय.टी.पार्क उभारण्यासाठी हजारो एकर जमिनी आम्ही दिल्या, मात्र आता पुन्हा रस्ते रुंदीकरणाच्या नावाखाली आमच्या घरांवर वरवंटा फिरणार असेल तर आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही असा इशाराही ग्रामस्थानी यावेळी दिलाय
इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथील चिमुकले आणि ग्रामस्थांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रस्ता नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना ओहळातून व चिखलातून वाट काढावी लागत आहे. तर नागरिकांना शहरात येण्यासाठी चार नदीपात्र पार करावी लागतात. काही दिवसांपूर्वी याच नदीपात्रातून आजारी महिलेला डोलीतून उपचारासाठी नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता
फडणवीस सरकारने त्यांच्या कानाचे पडदे साफ केले पाहिजे. विरोधी पक्ष जे काही बोलतोय ते गांभीर्याने घ्या. नाहीतर झारखंडचे पोलीस येतील आणि तुमच्या मंत्र्याला, खासदाराला अटक करुन घेऊन जातील, असा घणाघात संजय राऊतांनी घातला.
जळगावात शिवसेना ठाकरे गटाच्या 13 महापालिकेच्या नगरसेवकांचा भाजपमध्ये लवकरच प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. यात विधानसभेत भाजपमध्ये कारवाई झालेल्या काही नगरसेवक सुद्धा पुन्हा भाजपमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. संबंधित सर्व नगरसेवकांच्या भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशाच्या चर्चेनेच भाजपमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले आहे. भाजप नगरसेवकांनी या प्रवेशाला आतापासूनच विरोध दर्शवला आहे.
राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर. देशातील एकमेव शनी देवाचे साडेसाती मुक्त स्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या शनिमंडळ येथील शनी मंदिरात कोकाटे दर्शन घेऊन करणार पूजा अर्चा.
विरोधकांकडून तुमच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय, त्यावर संजय शिरसाट म्हणाले की, “तुमच्या ज्या बातम्या येत आहेत, त्यात काही तथ्य नाही. प्रत्येक नेत्याच त्या संबंधित मंत्र्याशी बोलण झालेलं असतं. आम्ही त्या आरोपांकडे गांभीर्याने पाहत नाही”
रोहित पवार यांनी सरकारमधील मंत्र्यांचे फोन टॅप होतायत असे आरोप केले, त्यात तथ्य वाटतं का?. “रोहित पवार यांना काय करायचय. आमचे फोन टॅप होतायक की नाही ते आम्ही पाहू. असं करण्याची आवश्यकता काय?. सरकार आमचं आहे. आम्ही सरकारमध्ये आहोत. फोन टॅपिंग का होईल? असा उलटा प्रश्न संजय शिरसाट यांनी विचारला.
भ्रष्ट मंत्र्यांची कॅबिनेटमध्ये गरज काय ? धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळात घेण्यासाठी अजित पवार इतकी घाई का करत आहेत ? संजय राऊतांचे सवाल
नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये रेश्मा कंपनीला आग, पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत जळून खाक.
मुंबईच्या मातोश्री कलानगर परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांकडून जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.
उद्या, 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून, त्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर भविष्यातील मनसुबे जाहीर. मुंबईच्या महापौर हा ठाकरे ब्रँडचा होणार असा बॅनर वर आशय आहे.
दुसरीकडे संविधानाचे रक्षण महाराष्ट्राच्या अस्मितेचे संरक्षण आणि जनतेच्या हक्कांसाठी ना झुकणारा लढवय्या नेता असा उल्लेखही बॅनरवर आहे.
माणिकराव कोकाटे सोमवारी राजीनामा देणार अशी माहिती सूत्रांची दिली आहे. राजीनामा देण्यापूर्वी अजित पवार आणि कोकाटे यांच्यात चर्चा होणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथील चिमुकले आणि ग्रामस्थांचा शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास सुरू आहे. रस्ता नसल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांना ओहळातून व चिखलातून वाट काढावी लागते. तर नागरिकांना शहरात येण्यासाठी चार नदीपात्र पार करावी लागतात.
काही दिवसांपूर्वी याच नदीपात्रातून आजारी महिलेला डोलीतून उपचारासाठी नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
माझा रोष आदिवासी प्रकल्प आधिकारी यांच्यावर नसून, त्या आधिका-यांना पाठीशी घालणा-या मंत्र्यांवर असल्याचा खुलासा आमदार सोनावणे यांनी केला आहे.
पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार शरद सोनवणेंना नोटीस पाठवण्यात आली आहे. ॲड. विजय कुऱ्हाडेंची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार असून शरद सोनावणे यांचं विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आज पासून पूर्वेतील सॅटिस प्रकल्पाच्या मार्गिकेसाठी रेल्वेच्या दोन्ही खांबांवर गर्डर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याने जुना कोपरी पुल आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. 26 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यंत जुन्या पुलावरून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ठाणे वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात अधिसूचना काढली आहे. कोपरीकरांना ८ दिवस वाहतूक कोंडीचे ठरणार असल्याने वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन ठाणे वाहतूक विभागाने केले आहे. तसेच या गर्डरचे काम हाती घेतल्यामुळे रात्री मध्यरात्री मेगाब्लॉक रेल्वे कडून घेतला जाणार आहे..
नागपूर विमानतळावर प्रवाशाकडून देशी पिस्तुल आणि 2 काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. या प्रवाशाकडे पिस्तुल परवाना नसल्याचं CISFच्या तपासात समोर आलं आहे. आरोपी प्रवासी हा भाजपचा माजी पदाधिकारी असल्याची माहिती देखील उघड झाली आहे.