BMC मुख्यालयाच्या दुरुस्तीसाठी तब्बल 120 कोटी रुपये खर्च

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By:

Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

मुंबई : देशातील श्रीमंत अशी नावाजलेल्या मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे गडगंज पैसा आहे आणि तो खर्च केलाही जाणार, यात शंका नाही. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणावर तब्बल 120 कोटी खर्च झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. 4 वेगवेगळे कंत्राट बहाल करत मुंबई महानगरपालिकेने पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. मुंबई […]

BMC मुख्यालयाच्या दुरुस्तीसाठी तब्बल 120 कोटी रुपये खर्च

मुंबई : देशातील श्रीमंत अशी नावाजलेल्या मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे गडगंज पैसा आहे आणि तो खर्च केलाही जाणार, यात शंका नाही. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणावर तब्बल 120 कोटी खर्च झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिली आहे. 4 वेगवेगळे कंत्राट बहाल करत मुंबई महानगरपालिकेने पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे.

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात नेहमीच दुरुस्ती आणि नूतनीकरण होत राहिले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडे विविध विकास कामाची माहिती मागितली असता इमारत बांधकाम खात्याने कळविले की वर्ष 2008 पासून वर्ष 2012 या 5 वर्षाच्या कालावधीत महापालिकेच्या मुख्यालयाच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणावर 120 कोटी 61 लाख 41 हजार 932 रुपये खर्च करण्यात आले आहे. यापैकी 111 कोटी 73 लाख 82 हजार 561 रुपये हे मेसर्स कॅन्स्ट्कॅशन टेक्निक, मेसर्स ग्लास सेन्सेशन, मेसर्स स्कायवे इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि मेसर्स शानदार इंटिरिअर प्रायव्हेट लिमिटेड या 4 कंत्राटदारांना अदा करण्यात आले असून 8 कोटी 87 लाख 59 हजार 370 रुपये हे अजून देण्यात आले नाही.

मुख्य इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी मेसर्स आभा नारायण लांबा असोसिएटस, मेसर्स एस जे के आर्किटेक्टस आणि मेसर्स शशी प्रभू एड असोसिएटस यांच्या संयुक्त उपक्रमातर्फे तयार करण्यात आलेल्या कामांच्या यादीमध्ये दगडी भिंतीची पुनर्स्थापना, व्हरांडा व जिन्यातील लाकडी सांध्यांचे संरचनात्मक जतन व मजबुतीकरण, छताची दुरुस्ती याचा समावेश होता. सदर काम हे मेसर्स कॅन्स्ट्कॅशन टेक्निक या कंत्राटदारास 7 कोटी 31 लाख 17 हजार 805 रुपये इतक्या रक्कमेस मे 2008 रोजी देण्यात आले.

मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथील मुख्य इमारतीच्या रंगीत काचांची पुनर्स्थापना करण्याचे काम ऑगस्ट 2010 मध्ये मंजूर करत मेसर्स ग्लास सेन्सेशन या कंत्राटदार कंपनीला 82 लाख 52 हजार 909 रुपयांत देण्यात आले. ऑक्टोबर 2011 रोजी मेसर्स शानदार इंटिरिअर प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदारास 68.77 कोटी रुपयांस देण्यात आले. मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथील विस्तारित इमारतीच्या नूतनीकरण कामाचा यात समावेश आहे. तर मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथील मुख्य इमारतीच्या नूतनीकरण कामावर 43 कोटी 70 लाख 71 हजार 218 रुपयांचे कंत्रात मेसर्स स्कायवे इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राटदारास जून 2012 रोजी देण्यात आले. या व्यतिरिक्त सल्लागार आणि आर्किटेक्टला दिलेल्या पैश्याचा अजून पर्यंत माहिती सार्वजनिक करण्यात आली नाही.

अनिल गलगली यांच्या मते नूतनीकरण आणि दुरुस्ती आवश्यक होती पण एकूण दुरुस्ती आणि नूतनीकरणावर 120 कोटी ज्याअर्थी खर्च करण्यात आला आहे तो अधिक असून या पेक्षा ही कमी किंमतीत दुरुस्ती आणि नूतनीकरण केले जाऊ शकले असते. अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस पत्र पाठवून 120 कोटींचा आकडा दाखवित जी कामे करण्यात आली आहे त्या कामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे कारण आकडे फुगविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI