दिव्यांश बेपत्ताच, आई-वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास गोरेगावमध्ये राहणारा दिव्यांश मॅनहोलमध्ये पडला, तेव्हापासून त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापपर्यंत दिव्यांश बेपत्ताच असल्याने कुटुंबीयांचा आक्रोश वाढत चाललाय.

दिव्यांश बेपत्ताच, आई-वडिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश


मुंबई : उघड्या मॅनहोलमध्ये अडीच वर्षांचा चिमुकला पडून दोन दिवस उलटले आहेत. पण अजूनही त्याचा शोध लागलेला नाही. बुधवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास गोरेगावमध्ये राहणारा दिव्यांश मॅनहोलमध्ये पडला, तेव्हापासून त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापपर्यंत दिव्यांश बेपत्ताच असल्याने कुटुंबीयांचा आक्रोश वाढत चाललाय. आपला अडीच वर्षांचा चिमुकला अजूनही मिळत नसल्याचं पाहून आईचा आक्रोश हृदय हेलावणारा आहे.

आईसोबत दुकानात आलेल्या दीड वर्षांचा दिव्यांश अचानक उघड्या मॅनहोलमध्ये पडून वाहून गेला. तेव्हापासून हा आक्रोश सुरू आहे. आता तर रडून रडून दिव्यांशच्या कुटुंबीयांचे अश्रूही संपलेत. अश्रूंच्या जागी आता संताप डोळ्यात आलाय. हा संताप महापालिकांच्या निष्काळजीपणाविरोधात, मुंबईतील मॅनहोल उघडे ठेवणाऱ्यांविरोधात हा संताप आहे.

बुधवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास गोरेगावच्या आंबेडकर नगर भागातील उघड्या मॅनहोलमध्ये पडून दिव्यांश वाहून गेला. या घटनेला दोन दिवस उलटले आहेत. तेव्हापासून दिव्यांशचा शोध घेतला जातोय. शोध मोहिमेदरम्यान गेल्या दोन दिवसात बचाव पथकाने तब्बल दहा किमी लांबीची ड्रेनेज लाईन तपासली. पण अद्यापही दिव्यांशचा शोध लागू शकला नाही.

आता दोन दिवस उटल्यानंतरही त्याचा शोध लागत नसल्याने दिव्यांशच्या कुटुंबीयांचा संयम सुटू लागलाय. आपल्या मुलाचा चेहरा दिसावा म्हणून दिव्यांशचे वडील शुक्रवारी वारंवार आंदोलन करत होते. पोलीस त्यांना ताब्यात घेत होते. त्याचवेळी दिव्यांशचे नातेवाईक महापौरांच्या राजीनाम्याची मागणी करताना दिसले.

बराच वेळ उलटल्यानंतरही दिव्यांशचा शोध लागत नसल्याने अखेर दिव्यांशच्या वडिलांनी पत्रकार परिषद घेतली आणि पालिका प्रशासन आणि पोलिसांवर हलगर्जीपणाचा आरोप केला. विशेष म्हणजे, जसा जसा वेळ जात होता, तसे सामाजिक कार्यकर्तेही कुटुंबीयांच्या मदतीला येत होते. अनेक सामाजिक संस्थाही शोधकार्यात सहभागी झाल्या. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दिव्यांशच्या कुटुंबीयांवर ही वेळ आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्रीवण तिवारी यांनी केला. तर काँग्रेसनेही मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभारावर टीका केली.

बुधवारी रात्री सव्वा दहा वाजता उघड्या मॅनेहोलमध्ये पडलेला दिव्यांशचा शुक्रवारी रात्रीपर्यंत शोध लागलेला नाही. बचाव पथकांना तब्बल 10 किलोमीटरच्या गटारात उतरून दिव्यांशचा शोध घेतला. पण, तरीही दिव्यांशचा पत्ता नाही. त्यामुळे दिव्यांश आहे तरी कुठे? दिव्यांशचा शोध कधी लागणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण, या सर्वांमुळे दिव्यांशच्या कुटुंबीयांचा आक्रोश मात्र वाढत आहे.

VIDEO :

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI