मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे सरकारवर (Shinde Government) गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नवं सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण होईल, अशी घोषणा केली होती. त्यासाठी शिंदे सरकारकडून 5 हजार कोटींचं टेंडरही जाहीर करण्यात आलं होतं. पण त्याला कुणी प्रतिसाद न दिल्याने आता शिंदे सरकारने 6 हजार 80 कोटी रुपयांचं टेंडर जाहीर केलंय. या कोट्यवधींच्या टेंडरमध्ये कोट्यवधींचा घोटाळा असल्याचा आरोपच आदित्य ठाकरे यांनी केलाय. रस्त्यांच्या कंत्राटामध्ये जीएसटीचे वेगळे पैसे लावण्यात आले आहेत. याशिवाय कंत्राटाच्या माध्यमातून कंत्राटदारांना तब्बल 48 टक्क्यांचा फायदा करुन देण्याचा हा शिंदे सरकाचा गेम असल्याचा धक्कादायक दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय.