AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीआधी ‘तो’ पक्ष शरद पवारांपासून दुरावणार?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

NCP Sharad Pawar : विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, अशातच या निवडणुकीआधी एक पक्ष शरद पवारांपासून दुरावणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. राजकीय वर्तुळात याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलं आहे. वाचा सविस्तर...

निवडणुकीआधी 'तो' पक्ष शरद पवारांपासून दुरावणार?; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
शरद पवारImage Credit source: Facebook
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Sep 10, 2024 | 9:39 AM
Share

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार मोर्चे बांधणी करत आहेत. ते महाराष्ट्रभरात दौरा करत आहेत. ठिकठिकाणी ते स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यांनी रणनिती आखल्याचं दिसत आहे. महायुतीतील नेते त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहेत. अशातच शरद पवार यांच्यापासून एक पक्ष दुरावणार असल्याचं बोललं जात आहे. राजकीय वर्तुळात याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडीतील एक पक्ष शरद पवारांपासून दुरावणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्या आहेत. यावर आता जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं आहे.

कोणता पक्ष दुरावणार असल्याचा चर्चा?

समाजवादी पक्ष शरद पवार यांच्यापासून दुरावणार असल्याच्या चर्चा होत आहे. विधानसभा निवडणुकीआधी समाजवादी पक्ष शरद पवारांपासून दुरावू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. यावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या चर्चा निरर्थक असल्यांचं आझमी म्हणाले आहेत.

अबू आझमी यांचं ट्विट काय?

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राजकीय वर्तुळातील चर्चांबाबत एक ट्विट केलं आहे. त्यांनी या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे. आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत, याच कोणतीही शंका नाही. समाजवादी पार्टी कायम महाविकास आघाडीचं नेतृत्व करत असलेले आदरणीय शरद पवार यांच्यासोबत राहिली आहे. यापुढेही समाजवादी पार्टी शरद पवारांसोबतच राहणार आहे. आता महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीला जनादेश द्यायला निघाली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र!, असं ट्विट अबू आझमी यांनी केलं आहे.

जितेंद्र आव्हाडांचं स्पष्टीकरण

राष्ट्र्वादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत ट्विट केलं आहे. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी दुरावणार असल्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला आहे. काही खोडकर लोक राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाबाबत चुकीच्या बातम्या पसरवत आहेत. पण त्यात काहीही तथ्य नाही. समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी कायम सोबत होते. पुढेही आम्ही सोबत राहू. मी हे स्पष्ट करतो की हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीतूनच निवडणूक लढवतील, असं जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी