महाराष्ट्र सांभाळता आला नाही, आणि हे चालले बिहारला…; शिंदे गटाची खोचक टीका

आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरुन आता शिंदे गटाकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे. आधी घर सांभाळा मग बिहारचा दौरा करा अशी खोचक टीका त्यांच्यावर केली आहे.

महाराष्ट्र सांभाळता आला नाही, आणि हे चालले बिहारला...; शिंदे गटाची खोचक टीका
Follow us
| Updated on: Nov 23, 2022 | 7:33 PM

मुंबईः ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी बिहारचा एकदिवशीय दौरा केल्यानंतर त्यांच्यावर दोन्ही बाजूनी टीका केली जात आहे. एकीकडे त्यांच्या समर्थनाथ अनेकांनी हा दौरा भविष्याची नांदी असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे मुळच्या शिवसेनेच्या असलेल्या आणि आता शिंदे गटाकडे गेलेल्या खासदार भावना गवळी यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बिहार दौऱ्यावरून त्यांच्यावर टीका करताना त्या म्हणाल्या की, तुम्हाला राज्य सांभाळता आले नाही आणि तुम्ही बिहार दौरा का करता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्र तर तुम्हाला सांभाळता आलेला नाही.

आणि आपण बिहारमध्ये जात आहात. त्यावरूनच सगळं आलेलं आहे. पहिला आपले घर सांभाळा, ते घर काही तुम्हाला सांभाळता आलेले नाही.

आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता की, तुम्ही गद्दार आहात. पण तुम्हालाच आम्हाला सांभाळता आलेलं नाही. त्यामुळे खरे गद्दार तर तुम्ही आहात अशी खोचक टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

आमच्यावर गद्दार म्हणून टीका करताना हे तुम्हाला किती शोभणारं आहे असा विचार आता त्यांनीच केला पाहिजे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे.

आमदार आदित्य ठाकरे यांनी बिहार दौरा निश्चित केल्यानंतर शिंदे गटाकडून जोरदार त्यांच्यावर टीका करण्यात आली. तर भाजपनेही या संधीचा फायदा घेत, शिवसेना हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला.

लालू प्रसाद यादव यांनी तर हिंदूत्वाला विरोध केला होता आणि आता आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना का भेटायला जात आहेत असा सवाल त्यांनी उपस्थि केला आहे. त्यामुळे शिंदे गट विरोध ठाकरे गट असा आता सामना रंगणार असल्याचे दिसून येत आहे.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.