अंबानींना धमकी देणारं ते पत्र गुजराती माणसानं लिहिलं? वाचा राज ठाकरेंची थिअरी

धमकी देणारा माणूस आदराने कसा बोलू शकतो? साहेब तुमची वाट लावतो बघा, असं तो कशाला बोलेल? | Raj Thackeray Ambani bomb threat

अंबानींना धमकी देणारं ते पत्र गुजराती माणसानं लिहिलं? वाचा राज ठाकरेंची थिअरी
एखादा गुजराती माणूस जसं हिंदी बोलतो, तशी भाषा या पत्रात असल्याचे लक्षात येईल.
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 12:48 PM

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट कल्पनेपेक्षा अधिक व्यापक आहे. या सगळ्याची कसून चौकशी झाली तर फटाक्याची माळ लागेल, अनेकजण तुरुंगात जातील, असा दावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. यावेळी त्यांनी अंबानी यांच्या घराबाहेरील गाडीत स्फोटकांसोबत सापडलेल्या पत्राविषयी एक थिअरीही मांडली. (Raj Thackeray on Ambani bomb threat and Sachin Vaze case)

राज ठाकरे यांनी या पत्राच्या सत्यतेविषयीच शंका उपस्थित केली. नीता भाभी आणि मुकेश भैया तुमच्याखाली आम्हाला बॉम्ब फोडायचाय, असे या पत्रात म्हटले आहे. धमकी देणारा माणूस आदराने कसा बोलू शकतो? साहेब तुमची वाट लावतो बघा, असं तो कशाला बोलेल? या पत्राचा टोन बघितला तर एखादा गुजराती माणूस जसं हिंदी बोलतो, तशी भाषा या पत्रात असल्याचे लक्षात येईल, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

या पत्रात गुडनाईची स्पेलिंग Goodnit अशी लिहली आहे. पत्र लिहिताना त्याने ‘नीट’ (पेग) लावली असणार. पण अशाप्रकराचं धाडस पोलीस करु शकत नाहीत, असेही राज यांनी म्हटले.

काय लिहलं होतं त्या पत्रात?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर पार्क केलेल्या गाडीत स्फोटकांच्या बॅगसोबत एक पत्रही पोलिसांनी मिळाले. या पत्रातून मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देण्यात आली आहे. ‘डियर नीता भाभी और मुकेश भैय्या और फॅमिली.. ये तो सिर्फ ट्रेलर है अगली बार ये सामान पुरा हो क्या आयेगा तुम्हारे फॅमिली को उडाने….संभल जाना…’, असा मजकूर या पत्रात असल्याची माहिती समोर आली होती.

‘उद्धव ठाकरे आणि अंबानींचे मधूर संबंध, मग पोलीस खंडणी कशाला वसूल करतील?’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मधूर संबंध सर्वश्रूत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला अंबानी व्यासपीठावर उपस्थित होते. मग असे असताना पोलीस अंबानी यांच्याकडे पैसे मागायची हिंमत कशी करू शकतील? अंबानी यांच्या घराखाली कोणाला सांगितल्याशिवाय एखादा पोलीस अधिकारी बॉम्ब कसा ठेवेल? कोणाच्या सूचना असल्याशिवाय पोलीस असं धाडस करणार नाहीत, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

‘अंबानींच्या सुरक्षेत इस्रायली लोकं, मध्य प्रदेशचे पोलीस’

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त असतो. या सुरक्षाकड्यात इस्रायली लोकांचाही समावेश आहे. याशिवाय, मध्य प्रदेशचे पोलीसही अंबानी यांच्या दिमतीला आहेत. ते याठिकाणी का आहेत, हे कोडे अद्याप मला उलगडलेले नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. संबंधित बातम्या:

वाझे हा मुख्यमंत्र्यांच्या जवळचा, केंद्राने चौकशी केल्यास फटाक्यांची माळ लागेल : राज ठाकरे

परमबीर सिंगची बदली का केली, चौकशी का केली नाही? राज ठाकरेंचा सवाल

सचिन वाझेंचा मुक्काम ‘वर्षा’वर होता, नारायण राणेंचा गौप्यस्फोट!

(Raj Thackeray on Ambani bomb threat and Sachin Vaze case)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.