AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र यावेत का? अमित ठाकरे यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया

अमित ठाकरे यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी एका महत्त्वाच्या प्रश्नावर रोखठोक उत्तर दिलं. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावंडांनी राजकारणात एकत्र यावं का? असा प्रश्न अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र यावेत का? अमित ठाकरे यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया
उद्धव ठाकरे, राज ठाकरे दोन्ही भाऊ एकत्र यावेत का? अमित ठाकरे यांची EXCLUSIVE प्रतिक्रिया
| Updated on: Oct 30, 2024 | 9:59 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही भावांनी राजकारणात एकत्र यावं, अशी आशा नेहमी त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जाते. तसेच ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत किंवा न येण्याबाबतच्या चर्चा नेहमी राजकीय वर्तुळात होत असतात. विधानसभा निवडणुकीत दोन्ही भावंडांनी काही मतदारसंघांमध्ये आपापल्या उमेदवारांच्या विरोधात उमेदवार दिले आहेत. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आज यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यांना पक्षाकडून माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पण या ठिकाणी ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. याच गोष्टीचा धागा पकडत अमित ठाकरे यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावंडांनी एकत्र यावं, असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमित ठाकरे यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली. ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘रोखठोक’ या विशेष कार्यक्रमात अमित ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर भूमिका मांडली.

“दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, असं मला अनेकदा वाटलं. 2014 ला खरंच तसे प्रयत्न देखील झाले होते. पण 2017 ला मी आजारी असताना त्यांनी जे 6 नगरसेवक पळवले ते मला आवडलं नाही. आता जे बोलत आहेत, आजारी असताना खोके देवून 40 आमदारांना पळवलं वगैरे. मी पण तेव्हा आजारी होतो. माझं आजारपण काय होतं ते प्रत्येकाला माहिती आहे. मी 2017 नंतर ते दरवाजे बंद केले”, असं अमित ठाकरे म्हणाले.

राज्यातील पक्षफुटीच्या घटनांना भाजप जबाबदार आहे का?

महाराष्ट्रातील पक्ष फुटीच्या घटनांवर भाजप जबाबदार आहे असं आपल्याला वाटत नाही का? असा प्रश्न अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापुरता मला भाजप जबाबदार वाटत नाही. कारण सर्व 40 आमदार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे होते. त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांबाबत बोलताना कसं वाटलं असेल? हा मी विचारदेखील करु शकत नाही”, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली.

भाजपसोबतच जायला का आवडेल?

“राज ठाकरे एवढंच म्हणाले होते की, मला महायुतीबरोबर जायला आवडेल. कारण त्यांचे संघाच्या लोकांबरोबर, भाजपच्या लोकांबरोबर संबंध होते. भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन हयात असताना राज ठाकरे यांचे भाजपसोबत चांगले संबंध आहेत. भाजपसोबत जुने संबंध आहेत. आमचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील. आमचे 100 आमदार निवडून येतील. राज ठाकरे यांनी सांगूनच टाकलं आहे की, युती आणि आघाडी यांच्यात निवड करायची असेल तर आम्ही युती निवडू. कारण त्यांचे जुने संबंध आहेत. भाजप नेते नैतिकता पाळतात. महायुतीत मनसे हा पहिला पक्ष असेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे असतील ते निवडणुकीनंतर आपण बघू”, अशी भूमिका अमित ठाकरे यांनी मांडली.

‘राज ठाकरे यांच्या हाती एकहाती सत्ता द्या’

“मनसे सत्तेत शंभर टक्के असेल. राज ठाकरे यांच्या हाती एकहाती सत्ता द्या. एक माणूस कंट्रोलमध्ये आणा. ते म्हणजे राज ठाकरे. तुम्हाला कळेल की, काय होऊ शकते, असं आवाहन अमित ठाकरे यांनी केलं. आमच्या सर्वात जास्त जागा येतील हा माझा विश्वास आहे. पण आज जी राजकीय खिचडी झाली आहे त्यामुळे कुणाच्या किती जागा येतील ते आता सांगता येणार नाही”, असं अमित ठाकरे म्हणाले.

राजकारणात झालेल्या खिचडीला सुरुवात कधी झाली?

दरम्यान, राजकारणात झालेल्या खिचडीला सुरुवात कधी झाली? या प्रश्नावर अमित ठाकरे यांनी उत्तर दिलं. “२०१९ साली महाविकास आघाडी झाली तो मोठा ब्लेंडर होता. ते अशा विचारांसोबत गेले ज्यांचे एकमेकांसोबत विचारच जुळले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागितली आणि निवडणुकीनंतर वेगळ्या लोकांसोबत गेले”, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.