‘आधुनिक भारताचे चाणक्य’! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना अमृता फडणवीसांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाह यांना शुभेच्छा देताना अमृता फडणवीस यांनी त्यांचा उल्लेख 'आधुनिक भारताचे चाणक्य' असा केला आहे.

'आधुनिक भारताचे चाणक्य'! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना अमृता फडणवीसांकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने शाह यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या तर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी शाह यांना शुभेच्छा दिल्या आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही अमित शाहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमित शाहा यांच्यासोबतचा एक कौटुंबिक फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी शाह यांना ‘आधुनिक भारताचे चाणक्य’ अशी उपमा दिली आहे. (Amruta fadnavis birthday wish to Amit Shah)

‘आधुनिक भारताचे चाणक्य श्री अमित शाहजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी शाह यांना शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही अमृता फडणवीसांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचा ‘भारताचे पितामह’ असा उल्लेख केला होता. त्यावरुन अमृता फडणवीस चांगल्याच ट्रोल झाल्या होत्या.

दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘आमचे नेते, प्रेरणास्थान, निर्णयकुशलतेचे नायक, यशस्वी केंद्रीय गृहमंत्री असा उल्लेख करत फडणवीसांनी अमित शाह यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या.

अमृता फडणवीस आणि सोशल मीडिया!

अमृता फडणवीस या सोशल मीडियावर चांगल्याच अॅक्टिव असतात. महाविकास आघाडी सरकारच्या धोरणांवर त्यांनी अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. या टीकेला शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनीही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. तर काही कार्यकर्त्यांकडून अमृता यांना चांगलंच ट्रोल केलं जातं.

संबंधित बातम्या:

फिर क्या उखाडेगी बुलडोजर सरकार?; अमृता फडणवीसांनी ठाकरे सरकारला डिवचले

बऱ्याच गोष्टी सिद्ध करण्यासाठी प्रमाणपत्राचीच गरज लागते, अमृता फडणवीसांचा टोला

Amruta fadnavis birthday wish to Amit Shah

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI