AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Deshmukh | ईडीने जप्त केलेली मालमत्ता परत करण्यासाठी अनिल देशमुखांच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका

अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांची पनवेल येथे प्रस्तावित विमानतळा शेजारी जमीन होती. ही जमीन ईडीने जप्त केली आहे. तसेच वरळी येथील फ्लॅटही जप्त केला आहे. ही जमीन आणि फ्लॅट ही मालमत्ता अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांच्या मालकीची नसून ती त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींची आहे.

Anil Deshmukh | ईडीने जप्त केलेली मालमत्ता परत करण्यासाठी अनिल देशमुखांच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सचिन वाझेच्या वकिलाकडून चांदिवाल आयोगासमोर उलटतपासणी
| Edited By: | Updated on: Dec 04, 2021 | 8:53 PM
Share

मुंबई : कथिक मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर, कार्यालयावर ईडीने छापेमारी केली होती. या छापेमारीनंतर देशमुख कुटुंबीयांची मालमत्ता ईडीने जप्त केली होती. ही मालमत्ता परत करावी ही मागणी करणारी याचिका देशमुख कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ईडीने अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे तर ऋषिकेश देशमुखने अटकपूर्व जामिनासाठी सेशन कोर्टात अर्ज केला आहे.

ईडीने जप्त केलेला फ्लॅट आणि जमिन कुटुंबीयांच्या मालकीचे

सुरुवातील सुरुवातीला ईडीने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्याचप्रमाणे मालमत्ता जप्त केली आहे. अनिल देशमुख यांच्या कुटुंबीयांची पनवेल येथे प्रस्तावित विमानतळा शेजारी जमीन होती. ही जमीन ईडीने जप्त केली आहे. तसेच वरळी येथील फ्लॅटही जप्त केला आहे. ही जमीन आणि फ्लॅट ही मालमत्ता अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांच्या मालकीची नसून ती त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींच्या मालकीचे आहे. या पार्श्वभूमीवर ही मालमत्ता परत करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

मालमत्ता मनी लाँड्रिंगच्या पैशातून घेतली का याबाबत चौकशी सुरुंय

ईडीच्या अधिकाऱ्यांनी पाच वेळा अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. तसेच दोन जणांना अटक केली. गृह विभागाचे सचिव कैलास गायकवाड यांचीही चौकशी करण्यात आली. अनिल देशमुख यांनी ईडी आणि सीबीआयच्या प्रकरणात हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली होती. ते सुप्रीम कोर्टात गेलेत तिथे त्यांची सीबीआय बाबतची याचिका फेटाळण्यात आली. ईडीने अनिल देशमुख याची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लाँड्रिंगच्या पैशातून ही मालमत्ता केल्याचा ईडीचा आरोप आहे. सुमारे साडे चार कोटी रुपये कुठून आणलेत. बार मालकांच्या पैशातून ही मालमत्ता केली आहे का ? याबाबत अनिल देशमुख यांच्याकडे चौकशी सुरू आहे. (Anil Deshmukh’s family files petition in High Court to return confiscated property)

इतर बातम्या

Breaking : राज्यात ओमिक्रॉनचा शिरकाव, कल्याण-डोंबिवलीत ओमिक्रॉनची लागण झालेला रुग्ण आढळला

Parambir singh : परमबीर सिंह, वाझेविरोधात पहिलं आरोपपत्र दाखल, जबाबात ACP चे मोठे खुलासे

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.