सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर संप मिटणार?; कर्मचारी संघटना आणि अनिल परब यांच्यात चर्चा सुरू

राज्य सरकारने पगारवाढीचा निर्णय जाहीर केल्यानंतरही एसटी कामगारांचा संप अजून मिटलेला नाही. हा संप मिटावा म्हणून आज पुन्हा एकदा चर्चेची फैरी सुरू झाली आहे.

सातवा वेतन आयोग लागू झाल्यावर संप मिटणार?; कर्मचारी संघटना आणि अनिल परब यांच्यात चर्चा सुरू
वेतनवाढ दिल्यानंतरही कामगार संपावर ठाम असतील तर दिलेल्या पगारवाढीचाही विचार करावा लागेल; अनिल परब यांचा इशारा

मुंबई: राज्य सरकारने पगारवाढीचा निर्णय जाहीर केल्यानंतरही एसटी कामगारांचा संप अजून मिटलेला नाही. हा संप मिटावा म्हणून आज पुन्हा एकदा चर्चेची फैरी सुरू झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि कामगार संघटनांमध्ये ही चर्चा सुरू झाली आहे. एसटी कामगारांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मुद्द्यावर या बैठकीत चर्चा सुरू आहे. त्यामुळे सातवा वेतन आयोगाबाबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संप मिटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांची एसटी कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समिती सोबत बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला स्टेट ट्रान्सपोर्ट संघटना, इंटक, कामगार सेना आणि कास्ट ट्राईब संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत. अनिल परब यांनी आवाहन केल्यानंतर संयुक्त कृती समिती चर्चेसाठी तयार झाली आहे. मुंबई सेंट्रल येथील एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयात बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत फक्त सातवा वेतन आयोग लागू करण्यावर चर्चा होत आहे. या चर्चेत विलीनीकरणाचा मुद्दा नसल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे विलीनीकरणाऐवजी सातवा वेतन आयोग लागू करण्याचा प्रश्न निकाली निघाल्यास कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

सदावर्तेंनी न्यायालयीन प्रक्रियेची वेळ कमी करावी

दरम्यान, परब यांनी पुन्हा एकदा कामगारांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. एसटी डबघाईला आली आहे, तिला खाईत लोटू नका असंही परिवहन मंत्री म्हणालेत. आम्ही गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, गुणरत्न सदावर्ते या सर्वांशी चर्चा केली आहे, मात्र सदावर्ते विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यांनी कोर्टात लढावं, आमचं काही म्हणणं नाही असंही परब म्हणालेत. न्यायलयीन प्रक्रियेचा वेळ सदावर्ते कमी करु शकतात का? असा सवालही परबांनी केलाय. एसटी कर्मचाऱ्यांनी हट्ट न करता कामावर हजर व्हावं, असं आवाहन परब यांनी केलं आहे.

वेठीस धरू नका

अजूनही एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी त्या समितीसमोर मांडव्यात. आम्ही उच्च न्यायालय विलीनीकरणार जो निर्णय देईल, तो मान्य करणार आहोत. त्यामुळे यापुढे संप करून जनतेला वेठीला धरू नका, असे आवाहन त्यांनी केली. आंदोलकाचे नेतृत्व सध्या अॅड. गुणरत्न सदावर्ते करत आहेत. त्याबद्दल ते म्हणाले की, माझा संबंध हा कर्मचाऱ्यांशी आहे. त्यांची लिडरशीप कुणी करायची, हा त्यांचा प्रश्न आहे, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

भाजपने कोणत्याही परिस्थितीत सरकार पाडायचं ठरवलंय, पण त्यांना यश येणार नाही; भुजबळांचा टोला

एसटी कर्मचाऱ्यांची सकाळपर्यंत वाट पाहून कठोर निर्णय, परिवहन मंत्री परबांचा इशारा; तुटेपर्यंत ताणू नका, असे आवाहन

‘गृहपाठ न केल्यानं तोंडघशी पडावं लागलं’, एसटी कर्मचारी आंदोलनावरुन राजू शेटींचा सदाभाऊंना टोला

Published On - 6:04 pm, Fri, 26 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI