बीडमध्ये चाललंय काय? संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच घटना, अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप
Anjali Damania on Beed : बीडमध्ये चाललंय काय असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विचारला आहे. त्यांनी बीडमध्ये पालकमंत्री कुठे आहे, असा सवाल करत सध्या सुरू असलेल्या घटना थांबवण्याची विनंती केली.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची पुनरावृत्ती झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. बीडमध्ये चाललंय तरी काय? असा उद्विग्न सवाल करत त्यांनी पालकमंत्री अजितदादा कुठे आहे अशी विचारणा केली. सध्या बीडमध्ये जे काही प्रकार सुरू आहेत, ते लागलीच थांबवण्याचे आवाहन त्यांनी सर्वांना केले. त्यांनी जिल्ह्यातील एकापाठोपाठ सुरू असलेल्या राजकीय गुन्हेगारीवर आसूड उगारला.
आष्टी तालुक्यात पुनरावृत्ती
आज दोन्ही दिवस एका नंतर एक पुन्हा तशाच बातम्या येत असल्याचे आणि त्या अत्यंत धक्कादायक असल्याचे दमानिया म्हणाल्या. या घटनांवर काय बोलावं आता शब्दच सुचत नाहीत. आत्ताच पाच मिनिटांपूर्वी बीडमध्ये आष्टी तालुक्यात पुन्हा अशी एक अतिशय हलवून टाकणारी अशी घटना घडली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येसारखीच ही घटना घडल्याचे त्या म्हणाल्या. अवघ्या २३-२४ वर्षाच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह एका आरोग्य केंद्रात टाकण्यात आला. त्याच्या आई-वडिलांची स्थिती पाहवत नाही असे त्या म्हणाल्या.
एका ठिकाणी एक क्षीरसागर कुटुंब होतं त्यांच्याकडे तो ट्रक ड्रायव्हर म्हणून गेल्या चार वर्षांपासून काम करायचा. हा मुलगा दोन दिवसांपासून गायब होता. आत्ताच त्यांच्या घरच्यांशी बोलले आणि त्याच्या त्या पिक्चर्स बघून पुन्हा हलवून निघालोय आपण जसे संतोष देशमुख यांचे होते एक्झॅक्टली तशीच पिक्चर्स पुन्हा एकदा आली आहेत, असे त्या म्हणाल्या.
अजितदादांवर साधला निशाणा
यावेळी दमानिया यांनी अजितदादांवर निशाणा साधला. बीडच्या पालकमंत्री पदाचा ते काय करताय, असा सवाल त्यांनी केला. त्यांनी सांगावं की ही जी सगळी प्रकरणे आहेत ती, जे सगळ्यांचे प्राण गेले त्यांचे नाव तरी माहिती आहेत का, असा सवाल त्यांनी केला. पालकमंत्र्यांना त्याच्यावर काय कारवाई केली कोणाला निर्देश दिले. कोणालाही काम करायचं नाहीये आणि एकदा जाऊन आले बीडला त्याच्यानंतर आपण एक चकार शब्द त्यांच्याकडे ऐकलेला नाही असे दमानिया म्हणाल्या.
मुख्यमंत्र्यांनी आता तरी अधिवेशनात काहीतरी सांगावं, तिथे काहीतरी वेगळ्या प्रकारचा होऊ लढावा. तर आता हे सगळ्या हाताबाहेर गेलेले आहे. सगळे अधिकारी सिस्टिम बदलून टाका. काही सिस्टम त्यांची अगदी घाण सडवून टाकलेली सिस्टम आहे तिथे ती आता बदला, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
ही सगळी घाण करणारे हेच सगळे मंत्री संत्री आहेत. आमदार आहेत, असा घणाघात त्यांनी घातला. आत्ताच्या घटकाला हे जे मी तिसरं प्रकरण तुम्हाला सांगते ना हे पण नाही कराडचे सगळे साथीदार होते, असे त्या म्हणाल्या. एक पंकजा मुंडे सोडल्या तर सगळे नेते हे शरद पवारांच्या तालमीत मोठे झालेले आहेत. म्हणजे धनंजय मुंडे असो संदीप क्षीरसागर असो सुरेश धस असो आधीचे जयदत्त क्षीरसागर असो हे सगळेच्या सगळे लोक हे त्यांच्याच तालमीत वाढलेत, असा आरोप दमानिया यांनी केला.
बजरंग सोनावणे देखील असो हे सगळे राष्ट्रवादी शरद पवार गटात आधी होते त्यांच्याच तालमीत ते मोठे झाले आहेत आणि आत्ताच्या गट केला जर शरद पवार म्हणत असतील की बीडची स्थिती गंभीर आहेत ते या सगळ्या लोकांना मोठं करण्यामागे पवारांचा हातभार असल्याचा आरोप दमानिया यांनी केला.
