बहुजनांना जागे करणारे अण्णा भाऊ साठे मराठी साहित्यातील कोहिनूर; रामदास आठवलेंकडून अभिवादन

बहुजनांचे प्रबोधन करुन त्यांना सामाजिक विषमता आणि भांडवलशाहीविरुद्ध लढण्यास समतेचा मार्ग दाखविणारे क्रांतिकारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यातील कोहिनूर होते, असे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले आहे.

बहुजनांना जागे करणारे अण्णा भाऊ साठे मराठी साहित्यातील कोहिनूर; रामदास आठवलेंकडून अभिवादन
Annabhau Sathe
Follow us
| Updated on: Jul 18, 2021 | 10:40 PM

मुंबई : शोषित दलित पीडित वर्गाच्या वेदना शब्दबद्ध करणारे, बहुजनांचे प्रबोधन करुन त्यांना सामाजिक विषमता आणि भांडवलशाहीविरुद्ध लढण्यास समतेचा मार्ग दाखविणारे क्रांतिकारी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मराठी साहित्यातील कोहिनूर होते, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. अण्णा भाऊ साठे यांच्या 52 व्या स्मृतिदिनी रामदास आठवले यांनी त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. (Annabhau Sathe is Kohinoor of Marathi literature : Ramdas Athawale)

साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे हे केवळ दीड दिवस शाळेत गेले. मात्र त्यांनी लिहिलेले साहित्य जगभरातील उच्च शिक्षितांना मानवी हक्काचे धडे शिकवीत आहे. अण्णा भाऊंनी लिहिलेली फकिरा कादंबरी, वारणेचा वाघ, अलगुज अशा अनेक कादंबऱ्या आणि पुस्तके प्रचंड गाजली. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भरीव योगदान दिले. दलितांचे जीवनमान लेखणीतून चित्रित केले. जग बदल घालुनी घाव, सांगून गेले आम्हा भीमराव असे आपल्या काव्यातून समस्त मातंग सह दलित जातींना संदेश देत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समतेच्या मार्गाने चालण्याचे अण्णा भाऊंनी समाजाला संगीतले आहे. बौद्ध मातंग सह दलितांमधील सर्व जातींनी एकत्र येण्याचा संकल्प अण्णा भाऊ साठेंच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करताना आपण केला पाहिजे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

अण्णाभाऊ साठे चरित्र प्रकाशन समितीकडे ठाकरे सरकारचे दुर्लक्ष?

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे चरित्र साहित्य प्रकाशित करण्याकरता स्थापन करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप मंडळाचे माजी अध्यक्ष व भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी केली आहे.

गोरखे म्हणाले की, अनेक महिने उलटून गेले तरी नव्याने स्थापन झालेल्या समितीची बैठक झाली नाही. तसेच नियुक्त सदस्यांना ओळखपत्र देण्याचे कामसुद्धा शिक्षण विभागाने केलेले नाही. फडणवीस सरकारच्या काळात त्यावेळचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी साठे यांचे साहित्य प्रकाशित करून ते शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवण्याचे काम केले होते.

त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ही समिती बरखास्त करून उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली जम्बो समिती स्थापन करण्यात आली. मात्र या समितीच्या कामकाजाकडे दुर्लक्ष होत आहे. प्रकाशन समितीची बैठक घेण्यास राज्य सरकार नकारात्मक भूमिकेत असल्याची टीका गोरखे यांनी केली आहे.

इतर बातम्या 

मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळीत दुर्घटना, मुख्यमंत्र्यांकडून शोक, मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत

चेंबूरमधील दुर्घटनेला महापालिकेचा निष्काळजीपणाच कारणीभूत; आशिष शेलार यांचा आरोप

मुंबई का तुंबली?; पाच तासात 200 मिमी पावसाची नोंद; वाचा सविस्तर

(Annabhau Sathe is Kohinoor of Marathi literature : Ramdas Athawale)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.