Ajit Pawar: त्या घोटाळा शब्दाचाही घोटाळा झाला असेल, फडणवीसांच्या घोटाळा यादीवर अजित पवारांची फटकेबाजी

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत घोटाळे आणि कारवायांवर मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांनीही  आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की वीज मंडळाला वस्त्रोद्योगाकडून देणी असलेली देणी देण्याच्या सूचना वित्त विभागाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Ajit Pawar: त्या घोटाळा शब्दाचाही घोटाळा झाला असेल, फडणवीसांच्या घोटाळा यादीवर अजित पवारांची फटकेबाजी
Ajit PawarImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 6:28 PM

मुंबईः राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Assembly Session) एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत घोटाळे (Scam) आणि कारवायांवर मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांनीही  आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले की वीज मंडळाला वस्त्रोद्योगाकडून देणी असलेली देणी देण्याच्या सूचना वित्त विभागाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आणि जी देणी महाविकास आघाडीकडून देण्यात आली आहेत ती खूप दिलदारपणे दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रा राज्यातील वीज औद्योगिक प्रकल्पांना परवडत नव्हते त्यामुळे अनेक प्रोजेक्ट हे महाराष्ट्रात न येता इतर राज्यात जात होते, त्याबद्दलही मंत्रीमंडळ विचार करत असल्याच त्यांनी सांगितले.

घोटाळा शब्दाचाही घोटाळा झाला असेल

अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घोटाळा या शब्दावर जोर देत काल फक्त घोटाळा, घोटाळा असच सांगत राहिले. त्यामुळे त्या घोटाळा शब्दाचाही घोटाळा झाला असेल अशी फटकेबाजी अजितदादा पवार यांनी केली. कालच्या भाषणात फडणवीस यांनी घोटाळ्यावरच दणका दिला होता असं अजित पवार यांनी सांगितल्यावर हश्या पिकाला.

मी स्वतः लक्ष घालणार

तर यावेळी त्यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलेल्या नोकरीभरतीचा मुद्दा मी जातीने लक्ष घालून तपासणार असल्याचे सांगितले. महाविकास आघाडी सरकारवर नेहमीच विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय करतात अशी टीका केली जाते मात्र हे महाविकास आघाडी असल्याचे सांगत त्यांनी मराठवाडी, विदर्भवर अन्याय होऊ देणार नाही असा शब्द अजित पवार यांनी दिला. हे सांगत असताना विरोधक गोबेल्स नीती कशी वापरता तेही सांगितले.

विरोधकांची गोबेल्स नीती

कारण महाविकास आघाडी कधी भेदभाव करत नाही मात्र विरोधकांना उद्देश्यून त्यांनी सांगितले की, तुम्ही जे खोटं आहे ते तुम्ही शंभर वेळा खरं असल्याचे सांगता म्हणून खोटंही खरं वाटतं असं सांगत त्यांनी विंदा करंदीरकरांची उंटावरचा शहाणा ही कविता सादर करत आपल्या भाषणाचा समारोप केला.

संबंधित बातम्या

Ajit Pawar : यातले तर आमचेच तिकडं गेलेत, भाजप आमदारांची डबल नावं टाकून यादी वाढवण्याची शक्कल अजित पवारांनी सभागृहात उघडी पाडली

केडीएमसीत कचऱ्यापासून 10 हजार मॅट्रिक टन खत निर्मिती, सोलापूर नाशिक पुण्यातून मागणी

Ajit Pawar : उत्तर महाराष्ट्राच्या एकाचा मुख्यमंत्रीपदाचा चान्स गेला, दुसरा तयार होत होता, फडणवीसांकडे बघत अजित पवारांकडून हसत हसत फिरकी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.