केडीएमसीत कचऱ्यापासून 10 हजार मॅट्रिक टन खत निर्मिती, सोलापूर नाशिक पुण्यातून मागणी

महापालिका क्षेत्रात तयार होणाऱ्या 350 मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर कल्याण पश्चिमेकडील बारावे आणि उंबर्डे या प्रकल्पात प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाते. कचरा ते खत ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 25 ते 30 दिवसांचा कालावधी लागत असून वर्षभरात महापालिकेकडे दहा हजार मेट्रिक टन खत निर्माण झालं आहे.

केडीएमसीत कचऱ्यापासून 10 हजार मॅट्रिक टन खत निर्मिती, सोलापूर नाशिक पुण्यातून मागणी
केडीएमसीत कचऱ्यापासून 10 हजार मॅट्रिक टन खत निर्मिती
Image Credit source: टीव्ही 9
अमजद खान

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 25, 2022 | 6:03 PM

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून ओला कचऱ्यापासून खत (Fertilizer) निर्मिती करण्याच्या प्रकल्प सुरू आहे. कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे आणि बारावे प्लांटवर गेल्या वर्षभरात सुमारे दहा हजार मेट्रिक टन खत निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या खताला नाशिक पुणे सोलापूर येथून मागणी (Demand) वाढली आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाज्या आणि फळे घेऊन येणाऱ्या टेम्पोमधून खत निर्यात केले जात आहे. कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेतर्फे कचरा समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात ओला सुका कचरा वर्गीकरण मोहीम देखील राबविण्यात येत आहे. (Production of 10 thousand metric tons of fertilizer from KDM waste)

शेतकऱ्यांना अल्पदरात खत उपलब्ध करुन दिले जाते

महापालिका क्षेत्रात तयार होणाऱ्या 350 मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर कल्याण पश्चिमेकडील बारावे आणि उंबर्डे या प्रकल्पात प्रक्रिया करून खत निर्मिती केली जाते. कचरा ते खत ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 25 ते 30 दिवसांचा कालावधी लागत असून वर्षभरात महापालिकेकडे दहा हजार मेट्रिक टन खत निर्माण झालं आहे. तयार झालेल्या या खताची विक्री करण्याचे परवानगी प्रक्रिया करणाऱ्या ठेकेदाराला देण्यात आली. शेतकऱ्यांना अतिशय अल्प दरात चांगल्या दर्जाचे खत उपलब्ध करून दिले जात असून मुंबईसह इतर शहरात सेंद्रिय खत उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांकडून देखील या खताची मागणी वाढली आहे.

पुणे, सोलापूर, नाशिकमधून खताला मोठी मागणी

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात दररोज भाज्या आणि फळभाज्या घेऊन येणाऱ्या टेम्पोमधून देखील जाताना खत नेले जात आहे. सोलापूर, पुणे, नगर, नाशिक, बारामती, मंगळवेढा या भागातून असलेली मागणी आता वाढली आहे.सामाजिक वनीकरण विभागाने 300 मॅट्रिक टन खताची मागणी नोंदवली असल्याचे केडीएमसी उपयुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले. (Production of 10 thousand metric tons of fertilizer from KDM waste)

इतर बातम्या

अंबरनाथमध्ये पालिकेचे गाळे व्यावसायिकांनी बळकावले, काही गाळ्यांमध्ये भरतोय चक्क जुगाराचा अड्डा

‘ती’ 14 गावे अखेर नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट होणार, एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें