Sachin Vaze Case : सचिन वाझे प्रकरणातील ऑडी अखेर NIAच्या ताब्यात

NIAच्या हाती अजून एक अलिशान गाडी लागली आहे. सचिन वाझे वापरत असलेल्या ऑडी कारचा तपास NIAकडून गेल्या काही दिवसांपासून सुरु होता.

Sachin Vaze Case : सचिन वाझे प्रकरणातील ऑडी अखेर NIAच्या ताब्यात
सचिन वाझे प्रकरणातील ऑडी कार अखेर NIAकडून जप्त
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 2:01 PM

मुंबई : मुकेश अंबानींच्या घराजवळ मिळालेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी NIAच्या हाती अजून एक अलिशान गाडी लागली आहे. सचिन वाझे वापरत असलेल्या ऑडी कारचा तपास NIAकडून गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. NIA आज वसई परिसरातून ही कार जप्त केली आहे. NIA ने मंगळवारीच एक आऊटलॅंडर गाडीही नवी मुंबईच्या कामोठे परिसरातून जप्त केली आहे. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तपास सुरु असलेली MH 04 FZ 6561 नंबरची ऑडी आज NIAच्या हाती लागलीय.(Audi car in Sachin Waze case finally seized by NIA)

NIAने वसई परिसरातून ही कार जप्त केली आहे. ही कार कुणी वापरली? या संपूर्ण प्रकरणात ऑडी कारची भूमिका काय होती? याचा शोध सध्या NIAची टीम करत आहे. आज जप्त करण्यात आलेल्या ऑडी कारमध्ये आणखी काही पुरावे मिळू शकतील अशी अपेक्षा NIAला आहे.

मंगळवारी ‘आऊटलँडर’ जप्त

सचिन वाझे वापरत असलेली आऊटलँडर ही अलिशान गाडी NIA ने मंगळवारी ताब्यात घेतली आहे. नवी मुंबईतील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही आऊटलँडर गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. ही गाडी कामोठे परिसरातील एका सोसायटीमध्ये पार्क करण्यात आली होती. कामोठे परिसरातील एका सोसायटीमध्ये बऱ्याच दिवसांपासून ही गाडी पार्क करुन ठेवण्यात आली होती. बरेच दिवस गाडी पडून असल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी गाडीची माहिती पोलिसांना दिली. तपासानंतर या गाडीचा दुसरा मालक सचिन वाझे नावाचा व्यक्ती असल्याचं स्पष्ट झालं. NIAला याची माहिती मिळताच एक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. पुढील तपास केला जात आहे.

एकूण 7 गाड्या जप्त

NIAने आतापर्यंत सचिन वाझे यांच्याशी संबंधित 2 मर्सिडीज, 1 प्राडो, 1 ऑडी, इनोव्हा, स्कॉर्पिओसह एकूण 7 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत. NIA या 7 गाड्यांव्यतिरिक्त अजून एक आऊटलँडर आणि स्कोडा गाडीच्या शोधात असल्याची माहिती मिळतेय.

संबंधित बातम्या :

Sachin Vaze : सचिन वाझेच्या वापरातील अजून एक अलिशान ‘आऊटलँडर’ गाडी ताब्यात

सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; छातीत दुखायला लागल्याने रुग्णालयात नेण्याची वेळ

Audi car in Sachin Waze case finally seized by NIA

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.