AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, मागासवर्ग आयोगाची शिफारस

मुंबई : मराठा समाजाला इतर मागास वर्ग अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या, अशी शिफारस मागासवर्ग आयोगाने केली आहे. आतापर्यंत मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याची शिफारस मागासवर्ग आयोगाने केल्याची माहिती समोर येत आहे. अहवाल आला, आता पुढील प्रक्रिया काय? आरक्षणासाठी समाजिक, आर्थिक मागासलेपण सिद्ध होणं ही प्रमुख […]

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या, मागासवर्ग आयोगाची शिफारस
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM
Share

मुंबई : मराठा समाजाला इतर मागास वर्ग अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या, अशी शिफारस मागासवर्ग आयोगाने केली आहे. आतापर्यंत मराठा समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण दिले जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याची शिफारस मागासवर्ग आयोगाने केल्याची माहिती समोर येत आहे.

अहवाल आला, आता पुढील प्रक्रिया काय?

आरक्षणासाठी समाजिक, आर्थिक मागासलेपण सिद्ध होणं ही प्रमुख गरज आहे. मागासवर्ग आयोगाने नेमकं तेच तपासून आपला अहवाल सादर केला आहे. हा अहवाल आता सचिवांकडे सोपवला आहे. तो अहवाल राज्य सरकारमार्फत 19 नोव्हेंबरला हायकोर्टात सादर केला जाईल. शिवाय हा अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल. तिथे तो अहवाल स्वीकारणे/नाकारणे यावर निर्णय होईल. मग राज्य सरकार अधिवेशनात हा अहवाल मांडेल. त्याबाबत सरकार कायदा करु शकतं

हायकोर्टात मराठा आरक्षणाला जे आव्हान देण्यात आलं होतं, ते मागासलेपण सिद्ध झालेलं नसल्यामुळेच करण्यात आलं. हायकोर्ट यावर काय निर्णय देतं यावर सर्व आरक्षणाचं भवितव्य अवलंबून असेल.

आरक्षणासाठी संवाद यात्रा सुरु

मराठा आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारकडे सादर झालाय. आता आरक्षणासाठी मराठा समाज अधिक आक्रमक झालाय. आरक्षणाच्या मागणीसाठी आजपासून मराठा संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यातील एसएसपीएमएस कॉलेजमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून यात्रेला सुरुवात करण्यात आली. आजपासून सुरू होणारी यात्रा 26 तारखेला विधानभवनावर धडकणार आहे.

संवाद यात्रेचा उद्देश काय?

जनसंवाद यात्रेतून मराठा समाजातील प्रत्येक समुहाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं जाणार आहे. आरक्षणासाठी तरुणांच्या आत्महत्या असो, किंवा इतर सामाजिक प्रश्न, सर्व गोष्टींची यातून जाणिव करुन दिली जाणार आहे. त्यामुळे पुणे आणि औरंगाबादमधून ही संवाद यात्रा निघणार आहे.

मुंबईत आझाद मैदानावर उपोषण

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावरही बेमुदत उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आज 15 वा दिवस असल्यामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणकर्त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यासही नकार दिलाय. ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि इतर मागण्याही मान्य व्हाव्यात, यासाठी हे उपोषण सुरु आहे.

संबंधित बातम्या :

मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला, पुढे काय?  

मराठा आरक्षण : मागासवर्ग आयोगावर 13 कोटी 26 लाखांचा खर्च 

मराठा आरक्षण: उपोषणकर्ते सचिन पाटील यांची प्रकृती बिघडली 

‘त्याच दिवशी’ फडणवीस म्हणाले होते, ‘हे आरक्षण घटनाविरोधी, कोर्टात टिकणार नाही’ 

मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...