भेंडीबाजार क्लस्टर डेव्हलपमेंटचा तिढा सुटला; 24 भूखंडांच्या बदल्यात पालिकेला मिळाली पर्यायी जागा

मोडकळीस आलेल्या इमारती, लहान गल्ल्या, परिसरातील बाजारपेठांमध्ये ग्राहक आणि व्यापाऱ्यांची होणारी गर्दी, वाहतूक कोंडी असे चित्र भेंडीबाजार परिसरात आहे. सैफी बुऱ्हानी अप्लिपमेंट ट्रस्टने भेंडीबाजरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी समूह पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. | Bhendi Bazaar cluster development project

भेंडीबाजार क्लस्टर डेव्हलपमेंटचा तिढा सुटला; 24 भूखंडांच्या बदल्यात पालिकेला मिळाली पर्यायी जागा
भेंडीबाजार

मुंबई: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या दक्षिण मुंबईतील बहुचर्चित भेंडीबाजार क्लस्टर डेव्हलपमेंटचा तिढा अखेर सुटला आहे. याठिकाणी असलेल्या 24 भूखंडांच्या मोबदल्यात मुंबई महानगरपालिकेला पर्यायी जागा आणि 21 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे तब्बल सात वर्षानंतर हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.

हा मुंबईतील पहिला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प आहे. या ठिकाणी असलेल्या पालिकेच्या 24 छोट्या भूखंडांच्या बदल्यात पालिकेला विकासकाकडून भुलेश्वर आणि मांडवी येथे पर्यायी जागा आणि ‘फरका’चे 21 कोटी रुपये मिळतील. याबाबतच्या प्रस्तावाला सुधार समितीने मंजूरी दिली आहे. यामुळे पर्यायी मिळालेल्या जागेवरील इमारतींच्या पुनर्विकासालाही गती मिळणार असल्याची माहिती सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी दिली.

मुंबईतील पहिला समूहविकास प्रकल्प

भेंडी बाजार हा मुंबईतील पहिला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प आहे. सात वर्षांपूर्वी या महत्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली. या ठिकाणी दोन इमारतीचीही उभ्या राहिल्या. मात्र, यानंतर हा प्रकल्प रखडला आहे. या प्रकल्पात पालिकेच्या 24 छोट्या भूखंडांवर पालिकेचे 424 भाडेकरू आहेत.हे भूखंड पालिकेचे असल्याने भेंडीबाजार क्लस्टर डेव्हलपमेंटलाही फटका बसत होता.त्यामुळे या भूखंडांच्या बदल्यात संबंधित सैफी बुऱ्हानी अप्लिपमेंट ट्रस्टने भुलेश्वर याठिकाणी पर्यायी जागा देण्याचे मान्य केले आहे.

मोडकळीस आलेल्या इमारती, लहान गल्ल्या, परिसरातील बाजारपेठांमध्ये ग्राहक आणि व्यापाऱ्यांची होणारी गर्दी, वाहतूक कोंडी असे चित्र भेंडीबाजार परिसरात आहे. सैफी बुऱ्हानी अप्लिपमेंट ट्रस्टने भेंडीबाजरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी समूह पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. पुनर्विकास प्रकल्पासाठी हे २४ भूखंड मिळावे यासाठी ट्रस्ट प्रयत्नशील होते. आता ट्रस्टने या भूखंडांच्या बदल्यात भुलेश्वर आणि मांडवी येथे पर्यायी जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. मूळ भूखंडांपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ही पर्यायी जागा आहे. या पर्यायी भूखंडांवर इमारती उभ्या आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. सुधार समिती सदस्यांनी या पर्यायी जागेची पाहणी केली होती.

इतर बातम्या:

भेंडीबाजार म्हटलं की सिल्व्हर ओकला आणि बेहरामपाडा म्हटलं की ‘मातोश्री’ला त्रास : आशिष शेलार

शरद पवारांना भेंडीबाजार झोंबला, आता त्यांना माझी लाज वाटणार नाही : प्रविण दरेकर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI