मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये जेन-झीसाठी 3 डबे आरक्षित होणार? रेल्वेमंत्र्यांकडे मागणी, सरकार काय निर्णय घेणार?
जेन-झी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. या नव्या पिढीसाठी रेल्वे डब्याचे तीन आरक्षित करण्याची मागणी भाजप नगरसेविकेने केली आहे.

दिल्लीच्या जंतर-मंतरवर जेन-झी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे देशभर पडसाद उमटले होते. विद्यार्थी आंदोलनामुळे मोदी सरकारलाही झुकावं लागलं होतं. देशभर पसरलेल्या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भारतात जेन-झी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आता या आंदोलकांनी नाराजी दूर करून आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक मोहन भागवत देखील तरुणांशी संवाद साधता दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील रात्री इन्स्टाग्रामवरून विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. आता भाजप नेतेही जेन-झी पुढे सरसावले आहेत. भाजपच्या नगरसेविका तेजस्वी घोसळकर यांनी जेन-झी पिढीसाठी महत्त्वाची मागणी केली आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी कॉलेजला जाणाऱ्या जेन-झी आणि जेन-अल्फा पिढीसाठी लोकलमधील 12 पैकी 3 डबे आरक्षित करण्याची मागणी केली आहे. हे डबे पहाटे 5 ते सकाळी 11 वाजेपर्यंत आरक्षित ठेवण्याची ठेवण्याची मागणी तेजस्वी घोसाळकर यांनी केली आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून मागणी केली आहे. त्यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन डबे आरक्षित करण्याची मागणी केली आहे.
मुंबईत सध्या लोकलचे दोन डबे महिलांसाठी आरक्षित आहेत. प्रथम श्रेणीसाठी काही डबे आरक्षित आहेत. मालवाहतुकीसाठी काही डबे आरक्षित आहेत. सध्या मुंबईच्या लोकल डब्यात खच्चून गर्दी असते. लोकलच्या सर्व डब्यात एकसारखीच गर्दी पाहायला मिळते. रेल्वे डब्यात गर्दीच्या वेळेत प्रवाशांना एका पायावर उभे राहून प्रवास करण्याची वेळ येते. लोकल गर्दीत आता विद्यार्थ्यांसाठी तीन डबे आरक्षित करण्याची मागणी पुढे आली आहे. त्यामुळे सरकार ही मागणी मान्य करणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तीन डबे आरक्षित करावे, ही मागणी भाजपच्या मुंबईतील वॉर्ड क्रमांक 2 च्या नगरसेविका आहेत. त्यांनी ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत घोसाळकर यांनी बाजी मारली होती.
