AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“तुम्ही हिंदुत्वाचा विचार काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवला”; शिंदे गटाच्या नेत्याने हिंदुत्वावरून ठाकरे गटाला निकालातच काढलं

तुम्हाला हिंदुत्व नको, बाळासाहेबांचा विचार नको आहेत. तर दुसरीकडे आता बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र आम्ही लावतो आहे तर तुम्ही नाकाने कांदे सोलायचे प्रकार करत आहात असा हल्लाबोल त्यांच्यावर करण्यात आला आहे.

तुम्ही हिंदुत्वाचा विचार काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवला; शिंदे गटाच्या नेत्याने हिंदुत्वावरून ठाकरे गटाला निकालातच काढलं
| Updated on: Jan 23, 2023 | 12:04 AM
Share

मुंबईः राज्यात पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून राजकीय युद्ध रंगली आहेत. त्यातच आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने मुंबईतही ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये तू तू मैं मैं ही दिसून आले. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या तैलचित्रावरून भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तुम्ही अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना स्वतःच्या पिताश्रींचे तैलचित्र लावू शकला नाही असे म्हणत त्यांनी तुम्ही टीका करत राहा आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

आमदार प्रवीण दरेकर यांनी टीका करताना म्हणाले की, मला वाटतं अजूनही सुधरायचं काही लक्षण दिसत नाही. गद्दार-गद्दार, खोके-बोके यांच्या पलिकडे शिंदेसाहेब कौसो मैल दूर निघून गेले आहे.

तुम्ही टीका करत राहा तुम्ही टोमणे मारत रहा आम्हाला महाराष्ट्राचा विकासाचा करायचा आहे अशी टीका ठाकरे गटावर करण्यात आली आहे.

तुम्ही अडीच वर्षात महाराष्ट्राचा वाटोळं केले आहे. पंचवीस वर्षात मुंबईची वाट लावली आहे. त्यामुळे आता आम्हाला विकास करायचा आहे. तुमच्या टीका टिपणीवर आम्ही लक्ष देत नाही असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री होते मात्र त्यांना आपल्याच पिताश्रींचे तैलचित्र लावता आले नाही. मी बोरवलीतून हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मैदानाचा उद्घाटन करून आलो आहे.

ते तुम्हाला का जमले नाही असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे. तुम्ही हिंदुत्वाचा विचार काँग्रेसच्या पायाशी गहाण ठेवलेला आहे.

त्यामुळे तुम्हाला हिंदुत्व नको, बाळासाहेबांचा विचार नको आहेत. तर दुसरीकडे आता बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र आम्ही लावतो आहे तर तुम्ही नाकाने कांदे सोलायचे प्रकार करत आहात असा हल्लाबोल त्यांच्यावर करण्यात आला आहे.

तर आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, तुम्ही आदर व्यक्त केला पाहिजे. अभिनंदन केले पाहिजे. सरकार कोणतेही असो मात्र आपल्या आजोबांचे तैलचित्र जर लावत असतील तर तुम्ही आनंद व्यक्त केला पाहिजे असा टोला त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

गद्दार शब्दावरून टीका करताना त्यांनी म्हटले आहे की, याच गद्दारांच्या हाताने तैलचित्र लावले गेले आहे, त्याच गद्दारांनी तुम्हाला सत्तेत बसवलं होते आणि त्याच गद्दारांनी शिवसेना वाढवली असल्याचेही त्यांनी सांगितले.

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.