AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रालय परिसरातच नवाब मलिकांचा पुतळा जाळला, अनेकांची धरपकड, भाजयुमोचं आंदोलन पेटलं

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केल्यानंतर भाजप कार्यकर्ते मलिकांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. (bjum agitation against nawab malik at front of mantralaya, mumbai)

मंत्रालय परिसरातच नवाब मलिकांचा पुतळा जाळला, अनेकांची धरपकड, भाजयुमोचं आंदोलन पेटलं
bjum agitation
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 5:17 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाच टार्गेट केल्यानंतर भाजप कार्यकर्ते मलिकांविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी आज मंत्रालय परिसरात जोरदार आंदोलन करत मलिक यांचा पुतळा जाळला. त्यामुळे पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याने या परिसरातील वातावरण तापले होते. यावेळी पोलिसांनी भाजयुमोच्या अनेक कार्यकर्त्यांची धरपकड केली.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज अचानक मंत्रालयावर धडक दिली. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असून त्याचा निषेध करण्यासाठी ही निदर्शने करण्यात येत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. भाजयुमोचे नेते विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वात ही आंदोलने करण्यात आली. यावेळी नवाब मलिक हाय हायच्या घोषणा देत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

मलिक यांचा पुतळा जाळला

यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणा देतानाच नवाब मलिक यांचा पुतळाही जाळला. त्यावेळी आंदोलक अधिकच आक्रमक झाले होते. पोलिसांनीच घटनास्थळी धाव घेऊन या आंदोलकांना पांगवले. त्यामुळे आणखीनच गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांनी विक्रांत पाटील यांच्यासह आंदोलकांना पोलसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर आंदोलन अधिकच चिघळलं. आंदोलकांनीही स्वत: अटक करून घेतल्याने पोलिसांचीही तारांबळ उडाली होती.

औरंगाबादेतही पुतळा फुंकला

दरम्यान, औरंगाबादमध्येही भाजप कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात जोरदार निदर्शने करत मलिक यांचा पुतळा जाळला. शहरातील क्रांती चौक परिसरात हे आंदोलन सुरु असल्यामुळे शेकडो कार्यकर्त्यांचा जमाव याठिकाणी गोळा झाला होता. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

मलिकांचे आरोप

दरम्यान, नवाब मलिक यांनीच आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मलिकांनीच गुन्हेगारांना अभय दिल्याचा आरोप मलिक यांनी केला. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली. तेव्हा दहशतवाद संपेल, काळा पैसा बंद होईल, असे म्हटले गेले. नोटबंदीनंतर संपूर्ण देशात 2000 आणि 500 च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. पण 8 ऑक्टोबर 2017 पर्यंत महाराष्ट्रात एकदाही बनावट नोटा पकडल्या गेल्या नाहीत. कारण फडणवीसांच्या संरक्षणात बनावट नोटांचा धंदा सुरु होता. 8 ऑक्टोबर 2027 रोजी 14 कोटी 56 लाखांच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. बनावट नोटांचं नेक्सस दाऊद, बांग्लादेश आणि पाकिस्तानपर्यंत आहे, असा दावा मलिक यांनी केला आहे.

संबंधित बातम्या:

भेटीगाठी केल्या, कामाला आल्या, उदयनराजे भोसले जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोध!

RIYAZ BHATI: दाऊद ते परमवीर सिंग, वाझेपर्यंत कनेक्शन, कोण आहे रियाझ भाटी?

प्रत्येक प्रवाशावर 1 रुपया कर आकारला जातो, महिन्याचे 21 कोटी, पडळकरांनी भ्रष्टाचारात थेट ‘मातोश्री’ला ओढलं

(bjum agitation against nawab malik at front of mantralaya, mumbai)

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.