मुंबई जिंकण्यासाठी भाजपचा हळदी कुंकवावर भर; सत्तेची हळद लागणार का?

मुंबई महापालिका राखण्यासाठी एकीकडे शिवसेनेने गुजराती मतदारांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. (bmc election: bjp organised haldi kunku program in goregaon)

मुंबई जिंकण्यासाठी भाजपचा हळदी कुंकवावर भर; सत्तेची हळद लागणार का?

मुंबई: मुंबई महापालिका राखण्यासाठी एकीकडे शिवसेनेने गुजराती मतदारांचे मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे काँग्रेसने स्वबळाचा नारा देत मुंबईत जनतेच्या समस्यांवरून मोर्चे काढून मोर्चेबांधणी सुरू केली आहे, तर भाजपने महिलांचे हळदीकुंकू समारंभ आयोजित करून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या लगीनघाईत भाजपला सत्तेची हळद लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (bmc election: bjp organised haldi kunku program in goregaon)

मुंबईत गोरेगावमधील प्रभाग क्रमांक 52मध्ये भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत महिलांचा हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. भाजपच्या नगरसेविका प्रीती साटम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी जमलेल्या महिलांना हळदीकुकूं देतानाच त्यांना भेट वस्तूही देण्यात आला. तर महिला वर्गाकडून चित्रा वाघ यांना त्यांची तस्वीर भेट देण्यात आली.

सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

या कार्यक्रमाला महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. त्यामुळे कार्यक्रमाला तोबा गर्दी झाली होती. काही महिलांनी तोंडाला मास्क लावले होते. तर काही अर्ध्याहून अधिक महिला मास्कशिवाय आल्या होत्या. हॉल पूर्णपणे भरून गेल्याने सोशल डिस्टन्सिंगचेही तीन तेरा वाजले होते. मात्र, कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. कार्यक्रमाला आलेल्या महिलांनी चित्रा वाघ यांच्यासोबत सेल्फीही घेतले.

मोर्चेबांधणी सुरू

मुंबईत महापालिका निवडणुका होऊ घातल्या आहेत. राज्यातील सत्ता हातातून गेल्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेची सत्ता राखण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सत्तेऐवजी पालिकेतील बळ वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर मागच्या वर्षी अवघ्या काही जागांनी पालिकेची सत्ता गमवावी लागलेल्या भाजपने पालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी सर्वस्व झोकून देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच महिलांचे हळदीकुकूं समारंभ, स्थानिक प्रश्नांवर मोर्चे काढणं, आंदोलन करणं आदी कार्यक्रम भाजपने हाती घेतले आहेत. महापालिकेची सत्ता काबीज करता यावी म्हणून भाजपने आधीच आमदार मंगलप्रभात लोढा यांची मुंबईच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. तर त्यांच्यासोबत अतुल भातखळकरांसारख्या आक्रमक आमदाराचं बळ उभं केलं आहे. तर, दुसरीकडे भाजपच्या गुजरातील व्होटबँकला सुरुंग लावण्याचं काम शिवसेनेने सुरू केला आहे. शिवसेनेने गुजराती मेळावे घेऊन भाजपची डोकेदुखी वाढवली आहे. त्यामुळे गुजराती मतदार शिवसेनेकडे जाणार की भाजपकडे हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहेच. पण सत्तेच्या या साठमारीत भाजपला सत्तेची हळद लागणार की नाही? हे येणारा काळातच दिसून येणार आहे. (bmc election: bjp organised haldi kunku program in goregaon)

मुंबई महापालिका संख्याबळ

>> एकूण जागा: 227 >> बहुमताचा आकडा: 114 >> शिवसेना: 97 >> भाजप: 83 >> काँग्रेस: 29 >> राष्ट्रवादी काँग्रेस: 8 >> समाजवादी पार्टी: 6 >> एमआयएम: 2 >> मनसे: 1 >> अभासे: 1  (bmc election: bjp organised haldi kunku program in goregaon)

संबंधित बातम्या:

जेव्हा तुकाराम मुंडे म्हणतात, ‘हे खरं यश आहे!’

राजकारणाचा ‘नगरी पॅटर्न’, राम शिंदेंना विखेंचा झटका, पवारांसोबत आतून युती, ‘खास’ माणसासाठी पक्ष टांगणीला?

LIVE | सोलापुरात लॉकडाऊनमध्ये बंद झालेल्या एसटीच्या 90 टक्के फेऱ्या सुरू

(bmc election: bjp organised haldi kunku program in goregaon)

Published On - 10:45 am, Tue, 9 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI