LIVE | मुंबई-आग्रा महामार्गावर दारु घेऊन जाणार ट्रक पलटी, बॉक्स लुटण्यासाठी तळीरामांची गर्दी

| Updated on: Feb 10, 2021 | 12:45 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रासह सर्व बातम्या एकाच ठिकाणी

LIVE | मुंबई-आग्रा महामार्गावर दारु घेऊन जाणार ट्रक पलटी, बॉक्स लुटण्यासाठी तळीरामांची गर्दी

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रासह सर्व बातम्या एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 09 Feb 2021 09:13 PM (IST)

    मुंबई-आग्रा महामार्गावर दारु घेऊन जाणार ट्रक पलटी, बॉक्स लुटण्यासाठी तळीरामांची गर्दी

    मुंबई- आग्रा महामार्गावरील उमराने गावाजवळ दारु घेऊन जाणारा ट्रक पलटी, समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने अपघात झाला. हा ट्रक पलटी झालेल्या दारूचे बॉक्स लुटण्यासाठी तळीरामांनी केली गर्दी

  • 09 Feb 2021 09:11 PM (IST)

    नाशकात तीन तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंच निवड स्थगित

    नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंच निवड स्थगित, सिन्नर पाठोपाठ निफाड आणि चांदवड तालुक्यातील सरपंच आणि उपसरपंच निवडीला स्थगिती, 16 फेब्रुवारीपर्यंत निवड न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश, निफाड तालुक्यातील करंजगाव ग्रामपंचायतीच्या आरक्षणाविरोधात केली याचिका दाखल

  • 09 Feb 2021 06:20 PM (IST)

    हेरिटेज वॉकसाठी इंग्लंडमधील मंत्र्यांचं शिष्टमंडळ मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात दाखल

    इंग्लंडमधील मंत्र्यांचं शिष्टमंडळ हेरिटेज वॉकसाठी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेदेखील महापालिकेच्या मुख्यालयात उपस्थित.

  • 09 Feb 2021 04:49 PM (IST)

    Taloja MIDC Fire | तळोजातील आग पाच तासांपासून धुमसतीच

    पनवेल : तळोजा येथील आगीवर अद्याप नियंत्रण नाही, आग विझविण्याचे प्रयत्न सुरुच, 6 ते 7 फायर ब्रिगेड टीम घटनास्थळी, आग मोठ्या स्वरुपात असल्याने आगीच्या जवळ जाता येत नाही, आगीवर अद्याप नियत्रंण आणण्यात अपयश, दुपारी साडेबारापासून आग धुमसती

  • 09 Feb 2021 04:19 PM (IST)

    भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अडचणी वाढल्या

    सोलापूर:  भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या अडचणी वाढल्या

    खासदारांचा बनावट जातीचा दाखला तयार करणाऱ्या शिवसिद्ध बुळा यास पोलिसांनी केली अटक

    जात पडताळणी समितीने खासदारांचा जातीचा दाखला ठरवला होता अवैध

    सोलापूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता

  • 09 Feb 2021 03:10 PM (IST)

    शिवसेना नेते आनंदराव अडसूळ ईडी कार्यालयात हजर, ईडीकडून चौकशीची शक्यता

    मुंबई : शिवसेनेचे नेते आणि अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूल हे सक्तवसुली संचालनालयात पोहोचले आहेत. येथे ईडीकडून त्यांची चौकशी होणार असून त्यामुळे ते ईडीच्या कार्यालयात हजार झाल्याचे सांगण्यात येत आहे. आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप वडनेराचे विद्यमान आमदार रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर अडसूळ यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे.

  • 09 Feb 2021 02:40 PM (IST)

    आतातरी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्या, प्रतिक पाटलांचे आवाहन

    सांगली : नवीन आलेल्या कृषि कायद्याला राष्ट्रवादीचा विरोध आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचं ऐकलं नाही. त्यामुळे आता शेतकरी दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. सरकराने आतातरी शेतकऱ्यांच्या मागण्या जाणून घ्याव्यात असे आवाहन जयंत जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांनी केले.

  • 09 Feb 2021 02:30 PM (IST)

    पुणे-नगर महामार्गावरील लोणीकंद येथे गोळीबार, आरोपी फरार

    पुणे-नगर महामार्गावरील लोणीकंद येथे गोळीबार

    सचिन शिंदे या तरुणावर करण्यात आला गोळीबार, शिंदे यांची पकृती गंभीर

    दोन राऊंड फायर करुन गोळीबार करणारे आरोपी फरार

    शिंदे यांच्यावर खा,गी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल

    पुणे जिल्ह्यातील एका महिन्यात गोळीबाराची तिसरी घटना

  • 09 Feb 2021 01:11 PM (IST)

    राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    सोलापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    शरद पवार उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे येणार

    कृषीभूषण नानासाहेब काळे यांनी विकसित केलेल्या किंगबेरी या नव्या द्राक्ष वाणाचं पवार यांच्या हस्ते लोकार्पण होणार

  • 09 Feb 2021 12:34 PM (IST)

    नाना पटोले आणि उदयनराजे भोसले यांची दिल्लीत अचानक भेट

    नवी दिल्ली - काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप खासदार उदयनराजे यांची 10 जनपथजवळ अचानक भेट झाली. यावेळी उदयनराजे यांनी नाना पटोले यांना शुभेच्छा दिल्या

    Udayanraje Bhonsale_Nana Patole

    Udayanraje Bhonsale_Nana Patole

  • 09 Feb 2021 12:27 PM (IST)

    नाना पटोले आणि नितीन राऊत एकाचवेळी सोनिया गांधींच्या भेटीला

    नाना पटोले आणि नितीन राऊत एकाचवेळी सोनिया गांधींच्या भेटीला आल्याने चर्चेला उधाण, नितीन राऊत यांचं महत्व कमी न करता खाते बदल होण्याची शक्यता, नाना पटोले यांना मंत्रिपद मिळण्याची चिन्हं, मंत्रिपदाबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, नाना पटोलेंची माहिती

  • 09 Feb 2021 12:08 PM (IST)

    ठाणे खंडणीविरोधी पथकाकडून गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक

    ठाणे खंडणीविरोधी पथकाकडून गँगस्टर एजाज लकडावाला याला अटक

    लकडावाला याला 12 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

    कल्याणच्या एका व्यवसायका कडून मागितली होती डेड कोटी खंडणी

    दीड वर्षांपूर्वी घडला होता खंडणीचा प्रकार

    कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता

    या प्रकरणाचा तपास ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाकडे होता

    ठाणे खंडणीविरोधी पथकप्रमुख राज कुमार कोथमिरे यांची माहिती

  • 09 Feb 2021 11:38 AM (IST)

    शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाषण लाईव्ह

    गुलाम नबी आझाद कधीही निवृत्त होणार नाहीत.

    त्यांचे महाराष्ट्राशी विशेष नाते आहे.

    आझाद यांनी इंदिरा गांधी ते नरेंद्र मोदी पर्यंतच्या कार्यकाळावर आधारित त्यांचे चरित्र लिहावे

    संपूर्ण देश ओळखतो असे नेते फार कमी आहेत. त्यातलेच एक गुलाम नबी आझाद हे आहेत.

  • 09 Feb 2021 10:59 AM (IST)

    PM Modi Live Rajya Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या जम्मू काश्मीरमधील राज्यसभा खासदारांना शुभेच्छा दिल्या. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. काँग्रेसचे बडे नेते खासदार गुलाम नबी आझाद यांचा 15 फेब्रुवारीला राज्यसभेचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. गुलाम नबी आझाद यांनी खासदार आणि विरोधी पक्षनेते म्हणून दर्जेदार काम केलं. त्यांचं काम नव्या खासदारांसाठी प्रेरणा देणारं आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • 09 Feb 2021 10:53 AM (IST)

    खासदार शरद पवार यांचे भाषण लाईव्ह

    राज्यसभेत शरद पवार बोलत आहेत.

    राज्यसभेच्या चार सदस्यांचा कार्यकाळ संपतो आहे.

    गुलाम नबी आझाद यांच्यात चांगले संघटन कौशल्य आहे.

    1982 हे वर्ष आढवणीत राहणारे आहे.

    या वर्षी गुलाम नबी आझाद यांनी वाशिममधून निवडणूक लढवली.

    येथे ते निवडून येऊ नयेत म्हणून आम्ही पूर्ण प्रयत्न केले. कारण मी तेव्हा विरोधी बाकावर होतो.

    आम्ही विरोधात प्रचार करुनही आझाद तेथून निवडून आले.

    वाशिममध्ये शिक्षण, आरोग्य, विकास या गोष्टीवर आझाद यांनी काम केलं.

    काश्मीरमधून आलेले आझाद यांनी वाशिमच्या विकासात लक्ष घातलं.

    आझाद यांना सर्व सरकारी समित्यांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.  ते कदाचित एकमेव असे नेते असावेत.

    आझाद यांनी विरोधीपक्षनेता या पदाची गरीमा वाढवली.

    संसदीय कार्यमंत्री असताना त्यांचे विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध असायचे. ते विरोध पक्षाच्या नेत्यांशी आपुलकीने वागत.

    विरोधकांचा एवढा विश्वास संपादन करणारे आझाद हे एकमेव सदस्य असावेत.

    आझाद यांना पुन्हा संसदेत येण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा करतो.

    आझाद यांनी दिलेल्या योगदानाबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

  • 09 Feb 2021 10:49 AM (IST)

    नरेंद्र मोदी यांचे भाषण LIVE

    राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी हे चांगले वक्ते आहेत.

    राज्यसभेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी करताना भावूक झाले.

    गुलाम नबी आझाद यांच्या अनुभवामुळे मी त्यांचा आदर करतो

    त्यांनी देशाला दिलेल्या योगदानाबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

    गुलाम नबी यांना मी निवृत्त होऊ देणार नाही.

    त्यांनी आम्हाला कायम सल्ला द्यावा.

  • 09 Feb 2021 10:21 AM (IST)

    शिवसंग्रामला मोठा धक्का, 150 कार्यकर्त्यांसह विनोद हातांगळे राष्ट्रवादीत

    बीड: शिवसंग्रामला मोठा धक्का

    150 कार्यकर्त्यांसह विनोद हातांगळे राष्ट्रवादीत

    आमदार संदीप क्षीरसागरांच्या उपस्थीतीत राष्ट्रवादीत प्रवेश

    नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसंग्रामला मोठा धक्का

  • 09 Feb 2021 10:07 AM (IST)

    नवी मुंबईतील खारघरमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार

    नवी मुंबईतील खारघरमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार दोन तरुणांनी शीतपेयामध्ये दारू पाजून केला बलात्कार एका आरोपीला पकडण्यात यश, एक आरोपी फरार दोन्ही आरोपी तरुणीच्या ओळखीचे

  • 09 Feb 2021 10:05 AM (IST)

    सोलापुरात लॉकडाऊनमध्ये बंद झालेल्या एसटीच्या 90 टक्के फेऱ्या सुरू

    सोलापूर : लॉकडाऊनमध्ये बंद झालेल्या एसटीच्या 90 टक्के फेऱ्या सुरू

    उर्वरित फेऱ्या पुढील काही दिवसात लवकरच सुरू होणार

    परिवहन महामंडळाकडून बससेवा सुरु केल्यानंतर सुरुवातीला प्रवाशांकडून होता अल्प प्रतिसाद

    कोरोना माहामारीच्या आधी सोलापूर आगारातून जवळपास पाचशे पायऱ्या होत्या सुरू

    आता पुन्हा 400 गाड्यांच्या फेऱ्या सुरू

    पूर्ण क्षमतेने बस धावत नसल्यामुळे आगाराचे दिवसाकाठचे 3 लाखांचे उत्पन्न घटले

  • 09 Feb 2021 09:28 AM (IST)

    26 जानेवारी दिल्ली ट्रॅक्टर रॅली हिंसाचार प्रकरण, मुख्य आरोपी दीप सिद्धूला अटक

    26 जानेवारी रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या दंगलीमध्ये मुख्य आरोपी असलेल्या अभिनेता दीप सिद्धू ला अटक करण्यात आली आहे. सिद्धूची माहिती देणाऱ्यासाठी पोलिसांनी एक लाख रुपयांचे पक्षीस जाहीर केले होते. सिद्धूला आज अटक करण्यात आली आहे.

  • 09 Feb 2021 09:20 AM (IST)

    भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावरच हल्ला, हल्ल्यात जागीच मृत्यू

    नाशिक - भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या युवकावरच हल्ला

    हल्ल्यात युवकाचा जागीच मृत्यू

    नाशिकच्या द्वारका परिसरात घडलेल्या घटनेनं खळबळ

    लहान मुलांच्या भांडणाचं पर्यावसान युवकाच्या हत्येमध्ये

  • 09 Feb 2021 09:18 AM (IST)

    पिंपरी चिंचवड पालिकेतील स्थायी सदस्यपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी, 18 फेब्रुवारीला होणार नियुक्ती

    पुणे : पिंपरी चिंचवड पालिकेतील स्थायी सदस्यपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी, 18 फेब्रुवारीच्या सभेत होणार नवीन नियुक्ती

    पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीच्या आठ सदस्यांची मुदत 28 फेब्रुवारीला संपुष्टात येत आहे

    त्यांच्या जागी नवीन आठ सदस्यांची नियुक्ती 18 फेब्रुवारीच्या महासभेत केली जाणार

    त्यात भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेना आणि अपक्ष आघाडीच्या एका सदस्यांचा समावेश आहे.

    या पंचवार्षिकमधील हे शेवटचे वर्ष असल्याने स्थायी समिती सदस्यपदी वर्णी लागण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

  • 09 Feb 2021 08:27 AM (IST)

    नाशिकमधील सरपंचपदाच्या निवडणुकी 12 आणि 15 फेब्रुवारी रोजी होणार

    नाशिक : जिल्ह्यातील सरपंचपदाच्या निवडणुका 12 आणि 15 फेब्रुवारी रोजी होणार

    619 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

    सिन्नर तालुका वगळता इतर तालुक्यांच्या निवडणुका दोन टप्प्यात पार पडणार

    नोडल ऑफिसर म्हणून तहसीलदार बघणार काम

    यंदा सदस्यांमधून सरपंच निवडले जाणार असल्याने सरपंचपद निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष

  • 09 Feb 2021 08:13 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेबाबत आज निर्णय

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेबाबत आज निर्णय होणार

    परीक्षा कोणत्या पद्धतीने आणि कधी घ्यावी, यावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार

    विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्रथम सत्राचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असून अद्याप परीक्षेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.

    परीक्षा मंडळाच्या बैठकीला कुलगुरू, प्र-कुलगुरू, परीक्षा संचालक आणि अधिष्ठाता उपस्थित राहणार

    परीक्षा पद्धती कशी असावी, याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार

    मागील एका महिन्यापासूनची विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आज संपणार आहे

  • 09 Feb 2021 08:09 AM (IST)

    पुणे जिल्हा परिषदेला कोरोनाचा फटका, अर्थसंकल्पात 50 कोटींची घट होणार?

    पुणे जिल्हा परिषदेला कोरोनाचा चांगलाच फटका बसला आहे.

    पुणे जिल्हा परिषदेला राज्य सरकारकडून पाचशे कोटी येणे बाकी आहे.

    राज्य सरकारकडील मुद्रांक शुल्क अनुदानाची 515 कोटी करुपयांची थकबाकी मागील वर्षभरापासून अद्याप मिळू शकलेली नाही.

    याचा परिणाम आगामी अर्थसंकल्पाला बसणार असून, अर्थसंकल्पात सुमारे 50 कोटींची घट होण्याची शक्यता आहे.

    यासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहले आहे.

  • 09 Feb 2021 07:53 AM (IST)

    तूर डाळीचा भाव वाढला, सामान्यांना झळ बसणार

    नागपूर : दरवर्षीच्या तुलनेत नागपूरच्या कळमना मार्केटमध्ये 25 टक्क्यानी आवक कमी झाल्याने तूड डाळीच्या दरात वाढ गावरान तुरीचे उत्पादन कमी झाले तसेच म्यानमार सारख्या देशातून तुरीची आयातही कमी झाल्याने दरवाढ

    5 हजार 500 ते 5 हजार 600 क्विंटल वरून 6 हजार 800 पर्यंत पोहचले भाव

  • 09 Feb 2021 07:42 AM (IST)

    अहमदनगरमध्ये जिल्हा बँकेच्या संचालकपदाची निवडणूक बिनविरोध होणार

    अहमदनगर : जिल्हा बँकेच्या संचालकपदाची निवडणूक बिनविरोध होणार जामखेडचे जगन्नाथ राळेभात यांची संचालकपदी निवड होणार राळेभात माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामुळे बिनविरोध निवड होणार सुजय विखे आणि रोहित पवारांच्या ऐनवेळी छुप्या युती मुळे माजी मंत्री राम शिंदे बॅकफूटला रोहित पवारांच्या सांगण्यावरून राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले यांचा निवडणूक अर्ज मागे आगामी कर्जत-जमखेडच्या नगरपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन रोहित पवारांचा बिनविरोध निवडीचा निर्णय

  • 09 Feb 2021 07:39 AM (IST)

    जीएसटी विरोधात 26 फेब्रुवारीला व्यापाऱ्यांचा भारत बंद

    जीएसटी ही एक अनुत्तीर्ण करपद्धती असल्याचा व्यापारांचा आरोप जीएसीटमुळे व्यापाऱ्यांना त्रास होतो त्यामुळे त्यामुळे कर पद्धती साधी आणि सोपी करण्याच्या मागणी कडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी घेण्यात आला निर्णय नागपुरात सुरू असलेल्या अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात घेण्यात आला निर्णय

  • 09 Feb 2021 06:54 AM (IST)

    गुरूवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद, शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता

    गुरूवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दोखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु होण्याची शक्यता आहे. वडगाव, चतुःश्रृंगी, वारजे जलकेंद्र परीसर येथील विद्युत आणि तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम असल्या कारणामुळे पाणीपुरवठा बंद रहाणार आहे.

  • 09 Feb 2021 06:21 AM (IST)

    ठाणे-घोडबंदर रोडवर गॅस टँकरचा मोठा अपघात, टँकरचालक सुखरुप

    मुंबईला लागून असलेला ठाणे घोडबंदर रोडवर गॅस टँकरचा मोठा अपघात झाला. या अपघातामुळे मध्यरात्री काही तास ठाणे-घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची 1 गाडी आणि वाहतूक पोलिसांची 1 रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी पोहोचली होती. सुदैवाने अपघातात टँकर चालक सुखरूप वाचला आहे.

Published On - Feb 09,2021 9:13 PM

Follow us
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.