मुंबईत कोरोनाचे वाढते रुग्ण, पालिका रुग्णालयांत खाटा अपुऱ्या

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालिका रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडू लागल्या (BMC Hospital Bed Insufficient Corona Patient) आहेत.

मुंबईत कोरोनाचे वाढते रुग्ण, पालिका रुग्णालयांत खाटा अपुऱ्या

मुंबई : कोरोना विषाणूचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये (BMC Hospital Bed Insufficient Corona Patient) झपाट्याने वाढ होत आहे. एकट्या मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजार 945 वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पालिका रुग्णालयातील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने खासगी रुग्णालयातील 20 टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील खासगी रुग्णालयात कोरोनावर उपचार करण्यात येत असले तरी या रुग्णालयांचे दर सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला परवडणारे नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेने खासगी कोरोना रुग्णालयातील 20 टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या ठिकाणी रुग्णांवर मोफत उपचार केले जातील.

या सर्व उपचारांचा खर्च पालिका प्रशासन करणार असून त्यासाठी आरोग्य विमा योजनेनुसार दर देण्यात येणार आहेत. यानुसार खासगी रुग्णालयातील विलगीकरण कक्ष आणि अतिदक्षता विभागातील कोरोना रुग्णांसाठी असलेल्या खाटांच्या 20 टक्के खाटा पालिकेअंतर्गत असतील, असेही पालिकेने सांगितले आहे.

सद्यस्थिती ‘या’ खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार

 • नानावटी रुग्णालय
 • के. जे. सोमय्या रुग्णालय
 • फोर्टिस (मुलुंड) रुग्णालय
 • एल.एच. हिरानंदानी रुग्णालय
 • पी. डी. हिंदुजा रुग्णालय
 • ग्लोबल रुग्णालय
 • सैफी रुग्णालय
 • जसलोक रुग्णालय
 • वोक्हार्ट रुग्णालय
 • बॉम्बे रुग्णालय
 • पोद्दार रुग्णालय
 • लीलावती रुग्णालय
 • रहेजा रुग्णालय
 • भाटिया रुग्णालय

तर दुसरीकडे पालिकेतर्फे मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात 1,000 खाटांचे ‘कोविड-19’ रुग्णालय उभारण्यात येत आहे. हे रुग्णालय ऑक्सिजन आणि मॉनिटर यंत्रणांनी सुसज्ज असणार आहे. पुढील 15 दिवसांत हे रुग्णालय युद्धपातळीवर उभारले जाणार आहे.

त्याशिवाय ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली एमएमआरडीए संयुक्तपणे या 1000 खाटांच्या रुग्णालयाची निर्मिती करत आहे.

(BMC Hospital Bed Insufficient Corona Patient)

संबंधित बातम्या : 

भवानी पेठ, ढोले पाटील, शिवाजीनगर परिसराला कोरोनाचा विळखा, पुण्यात कोणत्या वॉर्डात किती रुग्ण?

वरळीनंतर धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट, कोरोनाबाधितांचा आकडा 500 च्या उंबरठ्यावर

मुंबईतही अवघ्या 15 दिवसात 1 हजार खाटांचं कोरोना रुग्णालय उभारणार, काम सुरु

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI