AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Mayor: मुंबई महापालिकेचा महापौर उद्धव ठाकरेंचा? त्या ‘सुप्रीम’ निकालाने पारडे फिरणार? ॲड.असीम सरोदेंच्या त्या ट्विटची देशभर चर्चा

BMC Mayor Uddhav Thackeray Shivsena: मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होणार यावरून चर्चांचा महापूर आला आहे. मुख्यमंत्री दावोसला तर इकडं एकनाथ शिंदेंचे नगरसेवक ताज हॉटेलमध्ये आहेत. त्याचदरम्यान एका ट्विटने या दोन्ही पक्षांची झोप उडवली आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

BMC Mayor: मुंबई महापालिकेचा महापौर उद्धव ठाकरेंचा? त्या 'सुप्रीम' निकालाने पारडे फिरणार? ॲड.असीम सरोदेंच्या त्या ट्विटची देशभर चर्चा
मुंबईचा महापौर, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, शिवसेनाImage Credit source: गुगल
| Updated on: Jan 20, 2026 | 9:34 AM
Share

BMC Mayor Uddhav Thackeray Shivsena: मुंबई महापालिकेचा गड कोण सर करणार याचा खल संपलेला नाही. बीएमसीचा महापौर हा शिंदेसेनेचा असावा की भाजपचा यावरून रस्सीखेच सुरू आहे. शिंदे सेनेने तर त्यांचे नगरसेवक थेट ताज लँड हॉटेलमध्ये ठेवले आहेत. तिथून ते कोकण भवनात जातील. फोडाफोडीची शक्यता लक्षात घेत हा प्रकार सुरु असल्याचा दावा करण्यात येतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. तर इकडं एका ट्विटने अजून खळबळ उडवून दिली आहे. मुंबईचा महापौर हा उद्धव ठाकरेंचाच होईल असा दावा त्यांचे वकील असीम सरोदे यांनी ट्विट करत केला आहे. त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्या सुप्रीम निकालाने खरंच पारडं फिरणार?

भाजपचा मुंबईसह राज्यात झंझावात

भाजपचा मुंबईसह राज्यात झंझावात दिसून आला. अनेक महापालिकेत भाजप अगदी बहुमताच्या जवळ आहे. मुंबईत त्यांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिंदेसेनेची नितांत गरज आहे. या ठिकाणी शिंदेसेना ही महायुतीत किंगमेकर ठरली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे भाजपने महापौर पद शिंदेंच्या शिवसेनेसाठी सोडावं अशी आग्रही मागणी शिंदेसेनेकडून करण्यात येत आहे. तर भाजपला इतक्या वर्षानंतर पहिल्यांदाच महापौर करण्याची मोठी संधी आहे. त्यातून पेच निर्माण झालेला आहे. मुंबई महापालिकेत भाजपच्या खिशात 89 जागा तर शिंदे सेनेचे 29 नगरसेवक आहेत. बहुमतासाठी 114 हा मॅजिक फिगर आवश्यक आहे. पण मुख्यमंत्री राज्यात परतल्याशिवाय यावर अधिक भाष्य करणे दोन्ही पक्ष टाळत आहेत. या दोघांची महापौर पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच आता नवीन राजकीय भूकंपाची चर्चा सुरू आहे.

उद्धव ठाकरेंचा महापौर होणार?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील असीम सरोदेंच्या एका ट्विटची सध्या देशात चर्चा सुरू आहे. या ट्विटमध्ये त्यांनी जो तर्क दिला आहे, त्याकडे अनेकांचं लक्ष वेधलं गेलं आहे. या ट्विटनुसार, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण या पक्षचिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे.पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी पोहचणे कठीण आहे, असे ट्विट ॲड.असीम सरोदे यांनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला आहे. त्यानुसार मुंबईचा महापौर ठाकरेंचा होऊ शकतो.

मुंबई महापालिकेत राजकारण फिरणार

या ट्विटमध्ये ॲड.असीम सरोदे यांनी मुंबईतील महापौर घडामोडींवर मोठे भाष्य केले आहे. “आता लोकांचा नवीन प्रश्न – जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल.शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील.सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरु झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयाच कधीतरी संपवेल.” असा दावा सरोदे यांनी केला आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या