नो पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यास 10 हजार रुपयांचा दंड

नो पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यास आता मुंबई महापालिका (बीएमसी) एक हजार ते 10 हजार रुपयांचा दंड आकारणार आहे. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी कोणालाही विश्वासात न घेता हे धोरण जाहीर केले आहे.

नो पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यास 10 हजार रुपयांचा दंड

मुंबई : नो पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यास आता मुंबई महापालिका (बीएमसी) एक हजार ते 10 हजार रुपयांचा दंड आकारणार आहे. महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी कोणालाही विश्वासात न घेता हे धोरण जाहीर केले आहे. आयुक्तांनी जाहीर केलेल्या या धोरणाला विरोधी पक्षांसह सत्ताधाऱ्यांनीही जोरदार विरोध केला. मात्र आयुक्तांच्या या धोरणाला मंजुरी मिळालेली आहे. यामुळे यापुढे नो पार्किंगमध्ये गाडी उभी केल्यास 1 हजार ते 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

हा दंड ई चलन माध्यमातून वसूल केला जाईल. वाहनतळाच्या परिसरातील 1 किमी अंतरावर वाहने उभी केल्यास दहा हजारापर्यंतचा दंड आकारण्याचे पालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. पालिकेकडून अशा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत जेथे पार्किंग उपलब्ध असूनही लोक नो पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करतात. ही योजना 7 जुलै पासून संपूर्ण मुंबईत लागू होणार आहे.

पोस्टर आणि बॅनरच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरुकता करणार

मुंबईत 146 ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे. पण तरीही लोक नो पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करतात. महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आदेश दिले आहेत की, जिथे पार्किंगची सुविधा उपलब्ध आहे, तेथील एक किलोमीटर परिसरात जर कोणती गाडी नो पार्किंगमध्ये उभी असेल, तर त्या गाडीवर 10 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. या गोष्टीची माहिती देण्यासाठी महापालिका आता पोस्टर आणि बॅनरच्या माध्यमातून लोकांमध्ये जागरुकता करणार आहे.

माजी सैनिकांना कॉन्ट्रॅक्ट मिळणार

महापालिकेतर्फे माजी सैनिकांना हा कॉन्ट्रॅक्ट दिला जाणार आहे. अवैध पार्किंग यशस्वी करण्यासाठी अतिरिक्त टोईंग मशीन भाड्याने घेण्यात येणार आहेत.

Published On - 8:18 am, Sun, 30 June 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI