दीपिका, अर्जुन रामपाल झाला, आता शाहरुख NCB चं पुढचं टार्गेट, नवाब मलिकांची गौप्यस्फोटांची मालिका

बॉलिवूडला बदनाम करण्याचं काम सुरु असून आता पुढचं टार्गेट शाहरुख खान आहे, असा दावाही नवाब मलिक यांनी केला. शाहरुख खानला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे. शाहरुख खानला अडकवण्यात आलं, असं मलिक म्हणाले.

दीपिका, अर्जुन रामपाल झाला, आता शाहरुख NCB चं पुढचं टार्गेट, नवाब मलिकांची गौप्यस्फोटांची मालिका
अर्जुन रामपाल, नवाब मलिक, शाहरुख खान, रिया चक्रवर्ती


मुंबई : क्रूझ पार्टीवरील धाडसत्रावरुन थेट नार्कोटिक कंट्रोल ब्युरो अर्थात NCB ला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करणारे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. “कुठल्या अधिकाऱ्याला कस्टममधून इथे बसवलं, कुणाच्या बोलण्यावरुन धाडी सुरु आहेत, लोकांमध्ये भीती निर्माण कोण करत आहेत, भाजपचे कोणते नेते मध्यस्थी करत आहेत, हे सगळे बाहेर काढणार” असं नवाब मलिक म्हणाले.

बॉलिवूडला बदनाम करण्याचं काम सुरु असून आता पुढचं टार्गेट शाहरुख खान आहे, असा दावाही नवाब मलिक यांनी केला. शाहरुख खानला जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे. शाहरुख खानला अडकवण्यात आलं, असं मलिक म्हणाले.

भाजप आणि NCB हे दोघे मिळून बॉलिवूडला बदनाम करत आहेत, असा हल्लाबोलही नवाब मलिक यांनी केला.

पुढचं टार्गेट कोण?

NCB पब्लिसिटीसाठी लोकांना बोलावत आहेत. रिया चक्रवर्ती असेल, दीपिका पादुकोण असेल, ती भारती नावाची बाई असेल,अर्जुन रामपाल असेल, किती लोकांना बोलवून दिवसभर मीडियामध्ये बातमी चालवण्यात आली, शाहरुख खान हा पुढचा टार्गेट आहे. एक महिन्यापासून सांगण्यात येत होतं, पुन्हा त्याच्या मुलाला गोवण्यात आलं, अडकवण्यात आलं, हे सगळं फर्जीवाडा आहे, असा दावा मलिकांनी केला.

मनिष भानुशाली भाजपचा कार्यकर्ता

भाजपच्या आशिष शेलारांना माझ्यावर टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र मनिष भानुशाली (आर्यन खानला घेऊन जाणारा) सांगतो भाजपचा कार्यकर्ता. हा बऱ्याचशा मंत्र्यासोबत दिसत आहे. लोकांना मीडियाला बाईट देताना दिसताहेत. कायद्याचं राज्य नाही. मनिष भानुशाली भाजपचा कार्यकर्ता आहे. एक दोन ग्रॅमच्या केसेस करत आहेत. सेलिब्रिटींवर आरोप करुन पब्लिसिटीसाठी हे करत आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

विरोधी सरकारांना त्रास देण्याचा प्रयत्न

भाजपकडून विरोधी सरकारांना त्रास देण्याचं काम सुरु आहे. पश्चिम बंगालसारखी परिस्थिती निर्माण केली जाते. महाराष्ट्रात मविआ सरकार ताकदीन भाजपाला उत्तर देऊ, असं नवाब मलिकांनी ठणकावून सांगितलं.

VIDEO :

संबंधित बातम्या  

काल पत्रकारांचे प्रश्न टाळले, आता व्हॉटस अप ग्रुपच सोडला? समीर वानखेडेंचं चाललंय काय?  

कोण आहे मनिष भानुशाली? राष्ट्रवादीचे गंभीर आरोप, Nawab Malik म्हणतात…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI