लोकल सुरू केल्यास फ्लॅटफार्मवरील गर्दी घातक ठरेल; मध्य रेल्वेचा राज्य सरकारला इशारा

लोकल सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेनेही राज्य सरकारला पत्रं लिहून काही मुद्द्यांकडे सरकारचं लक्ष वेधल्याचं मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितलं.

लोकल सुरू केल्यास फ्लॅटफार्मवरील गर्दी घातक ठरेल; मध्य रेल्वेचा राज्य सरकारला इशारा
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 3:34 PM

मुंबई: सर्वसामान्यांनाही लोकलच्या प्रवासाची परवानगी द्यावी म्हणून राज्य सरकारने रेल्वेकडे मागणी केली असून त्याला मध्य रेल्वेकडून उत्तर आलं आहे. लोकल सुरू केल्यास सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं कठिण होणार आहे. त्याशिाय लोकल सुरू केल्यास रेल्वे फलाटावर होणारी गर्दी घातक ठरेल, असा धोक्याचा इशारा मध्य रेल्वेने राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात दिला आहे. (central railway wrote maharashtra government to Reopen Mumbai local)

लोकल सुरू करण्याबाबत मध्य रेल्वेनेही राज्य सरकारला पत्रं लिहून काही मुद्द्यांकडे सरकारचं लक्ष वेधल्याचं मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितलं. या पत्रात मध्य रेल्वेने अडचणींचा पाढाच वाचला आहे. लोकल सुरू केल्यास सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं हे आव्हानच ठरणार आहे. सर्वांना प्रवासाची परवानगी देण्यापूर्वी प्रवासाची रुपरेखा ठरवावी लागणार असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. मध्य रेल्वेत लोकलच्या 1774 फेऱ्या करण्यात येत होत्या. कोरोना काळात आता या फेऱ्या 706 एवढ्या करण्यात आल्या आहेत. कोरोनापूर्वी दिवसाला 45 लाख प्रवासी प्रवास करत होते. एका ट्रेनमध्ये एका फेरीत साधारण 2,500 प्रवासी प्रवास करायचे. कोरोना काळात आता 700 प्रवासी प्रवास करत असून दिवसाला रोज 4 ते 5 लाक प्रवासी प्रवास करत असल्याचंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू केल्यास रेल्वे फ्लॅटफार्मवरील होणारी गर्दी घातक ठरेल, असं रेल्वेने या पत्रात नमूद केल्याचं सूत्रांनी सांगितलं. कोरोनापूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर 35 ते 40 लाख प्रवासी प्रवास करायचे. सर्व लाइनवर एकूण 80 लाख प्रवासी प्रवास करायचे. यातील 50 टक्के प्रवाशांनाही प्रवासाची परवानगी दिली तर सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल का? हा मोठा प्रश्न असल्याचा सवालही या पत्रातून करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. रेल्वेतील गर्दी टाळण्यासाठी सरकारी आणि खासगी कार्यालयातील कामाच्या वेळा बदलण्याची सूचनाही रेल्वेने पत्रातून केल्याचं समजतं. (central railway wrote maharashtra government to Reopen Mumbai local)

संबंधित बातम्या:

लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत सरकारच्या हालचाली, ठाकरे सरकार मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट देणार?

दिवाळीला गावी जाताय? मग एसटीनेच जा!, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीकडून हंगामी दरवाढ रद्द

(central railway wrote maharashtra government to Reopen Mumbai local)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.