हेलिकॉप्टरने जाऊन शेती का करतात?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं नेमकं कारण….
CM Eknath Shinde on Farming in Daregoan Satara : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी विरोधकांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हेलिकॉप्टरमधून जाऊन शेती करण्यावरून विरोधक टीका करतात. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर...

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असले तरी त्यांना शेतीची आवड आहे. साताऱ्यातील दरेगाव या त्यांच्या मूळगावी ते वारंवार जातात. लोकसभा निवडणूक संपल्यानंतरही एकनाथ शिंदे गावी गेले होते. शेतात जात त्यांनी पाहणी केली होती. मात्र एकनाथ शिंदे हे हेलकॉप्टरने जात शेती करतात, अशी टीका विरोधक करत असतात. याला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलं आहे. मी गावी जातो, शेती करतो. मात्र लोक म्हणतात की मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जाऊन शेती करतात… मी मुख्यमंत्री असल्याने माझा एक एक मिनिट महत्त्वाचा आहे. शेती करण्यासाठी गावी गाडीने गेलो. तर दहा तास लागतील. एवढ्या वेळात मी 1000 फाईल साइन करतो. त्यामुळे मी कोणाकडे लक्ष देत नाही मी माझं काम करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ठाकरेंना टोला
महाराष्ट्राला बांबूची गरज आहे. त्यामुळे 2022 ला बांबू लावलेले… जेव्हा गरज पडली तर बांबू लावावे लागतात. ही मस्करी यासाठी सुरू आहे. आमदार गोवाटीला आमच्या सोबत होते. त्यावेळेला भाजप आणि शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळेला आम्ही बांबू लावले. नसता तर आज आमची बैठकी या ठिकाणी होत नसती, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढलाय.
महाराष्ट्रामध्ये सगळेच काम बंद होती. एक विचारधाराचं सरकार नव्हतं. दुसरी सरकार होती. तेव्हा आम्ही विचार करत होतो, राज्याचा विचार करत करू नका. दोन वर्ष करुणा वेळेला वाट पाहावी लागली. 2022 ला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची सरकार आलं. शिवसेना भाजप बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच सरकार आलं. बंद झालेले सगळे प्रोजेक्ट पुन्हा सुरू झाले, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
निवडणूक निकालावर भाष्य
कांद्यामुळे निवडणुकीमध्ये आम्हाला कांद्याने रडवलं मराठवाड्या सोयाबीन आणि कापसामुळे आम्हाला त्रास झाला. नरेंद्र मोदी यांनी साठ वर्षात जी कामे झाली नाही. ती काम करून दाखवली. मात्र काही लोकांपर्यंत ती निगेटिव्हिटी पोहोचली. त्यामुळे आम्हाला नुकसान झालं महाराष्ट्रातही त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. संविधान बदलणार ते फक्त 400 जाईल यासाठी गडबड केली. एकही दिन सुट्टी न घेणारा पंतप्रधान मोदी आहेत आणि त्यात महाराष्ट्राचे योगदान असावा असं वाटतं, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिलीय.