World Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल, पर्यटन दिनी मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट

पर्यटन विकास महामंडळाने खारघरमध्ये उभारलेल्या युथ होस्टेलचे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरुन ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले.

World Tourism Day | नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल, पर्यटन दिनी मुख्यमंत्र्यांचे गिफ्ट
Follow us
| Updated on: Sep 27, 2020 | 3:48 PM

नवी मुंबई : नाशिकमधील ग्रेप पार्क, खारघरमधील एमटीडीसीच्या युथ हॉस्टेलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून युथ हॉस्टेल पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. (CM Uddhav Thackeray inaugurated MTDC’s Kharghar Youth Hostel)

पर्यटन विकास महामंडळाने खारघरमध्ये उभारलेल्या युथ होस्टेलचे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरुन ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे खारघरमधील युथ हॉस्टेलमध्ये उपस्थित होते. युथ हॉस्टेलचे रविवारी दुपारी 12.30 वाजता उद्घाटन झाल्यानंतर ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.

अदिती तटकरे यांनी 4 सप्टेंबरला युथ हॉस्टेलची पाहणी केली होती. काही दिवसांतच खारघर युथ हॉस्टेल खुले केले जाईल, असे आश्वासन अदिती तटकरेंनी त्यावेळी दिले होते. राष्ट्रवादीचे पनवेल जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक सतीश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे नेते फारुक पटेल, खारघर शहर महिला अध्यक्षा राजश्री कदम हे नेते उपस्थित होते.

दरम्यान, नाशिकमध्ये एमटीडीसी ग्रेप पार्क आणि बोट क्लबचे उद्धाटनही यावेळी करण्यात आले. तत्कालीन पर्यटन मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून हे सत्यात उतरल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले.  (CM Uddhav Thackeray inaugurated MTDC’s Kharghar Youth Hostel)

संबंधित बातम्या :

एमटीडीसीचा अनोखा उपक्रम, पर्यटकांसमोर मोटोहोम कॅम्परवॅनचा नवा पर्याय 

सिंधुदुर्गही म्हणणार ‘वाह ताज’! ताज हॉटेल्स ग्रुपसोबत ठाकरे सरकारचा करार

(CM Uddhav Thackeray inaugurated MTDC’s Kharghar Youth Hostel)

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.