AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : कोरोनाची धास्ती! ‘कॉमन मॅन’लाही मास्क घातला

वरळी सीफेसवरील आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनच्या (Common Man Statue Mask) पुतळ्यालाही मास्क घालण्यात आला आहे.

Corona : कोरोनाची धास्ती! 'कॉमन मॅन'लाही मास्क घातला
| Updated on: Mar 31, 2020 | 4:22 PM
Share

मुंबई : मुंबईत सध्या कोरोनाबाधितांची संख्या 100 च्या  (Common Man Statue Mask) जवळ येऊन पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच राहावं असं आवाहन वारंवार प्रशासनाकडून केलं जात आहे. तसेच, घरातून बाहेर निघताना नेहमी तोंडाला मास्क लावावा अशा सुचनाही केल्या जात आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी वरळी सीफेसवरील आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनच्या (Common Man Statue Mask) पुतळ्यालाही मास्क घालण्यात आला आहे.

कष्टकरी लोकांचं शहर ही मुंबईची खरी (Corona Virus) ओळख आहे. आर. के. लक्ष्मण यांचा ‘कॉमन मॅन’ हा मुंबईचा खराखुरा प्रतिनिधी आणि कष्टकऱ्याचा सख्खा मित्र. खूपसा वैतागलेला, पिचलेला, पण माणुसकीची ओवी न विसरलेला हा कॉमन मॅन म्हणजे लोकशाहीचं, लोकशक्तीचं प्रतीक. खूप पाहिलं आहे याने. राजकीय घडामोडी, सामाजिक परिवर्तन, महागाई, दंगली, सिनेमे, संगीत, कला, नाटकं, कामगार चळवळी आणि आता हे करोना विषाणूचं थैमान.

‘खाया पिया कुछ नहीं, ग्लास तोडा बारा आना’ ही मुंबईची जुनी म्हण. बिचाऱ्या कॉमन मॅनचा काय दोष? पण मास्कने त्याच्यादेखील मुसक्या आवळल्या आहेत. वरळी सीफेसवरील (Common Man Statue Mask) या कॉमन मॅनचा पुतळा, भले तोंडाला मास्क लावलेला असेल, पण त्याची लढण्याची रग तसूभरही कमी झालेली नाही. हेच या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कोरोनाचं संकट वाढतेच

कोरोना विषाणूनेने सध्या जगभरात हाहा:कार माजवला आहे. जगातील सर्वच देश सध्या या जागतिक जीवघेण्या संकटाला तोंड देत आहेत. आपल्या देशातही तिच परिस्थिती आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांचा आकडा कमी असला, तरी कोरोनाचं संकट कायम आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांपैकी सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात आहे आणि त्यातही (Common Man Statue Mask) सर्वाधिक हे आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत आहेत.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 97 पुणे – 34 पिंपरी चिंचवड – 12 सांगली – 25 नागपूर –  16 कल्याण – 9 नवी मुंबई – 8 अहमदनगर – 8 ठाणे – 5 वसई विरार – 4 यवतमाळ – 4 पनवेल – 2 सातारा – 2 कोल्हापूर – 2 बुलडाणा – 3 पालघर- 1 उल्हासनगर – 1 गोंदिया – 1 औरंगाबाद – 1 सिंधुदुर्ग – 1 रत्नागिरी – 1 जळगाव- 1 नाशिक – 1 इतर राज्य (गुजरात) – 01

एकूण 239

कोरोनामुळे महाराष्ट्रात कुठे किती मृत्यू?

मुंबई – 64 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 17 मार्च मुंबई – 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 22 मार्च *मुंबई – फिलिपाईन्सच्या 68 वर्षीय वृद्धाचा मृत्यू– 23 मार्च (कोरोना निगेटिव्ह, मृत्यूचं कारण अन्य)* मुंबई – 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू (1) – 23 मार्च मुंबई – एकाचा मृत्यू (1) -25 मार्च नवी मुंबई – वाशीतील 65 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च मुंबई – 63 वर्षीय महिलेचा मृत्यू (1)– 26 मार्च बुलडाणा – 45 वर्षीय पुरुषाचा मृत्यू – 28 मार्च मुंबई – 40 वर्षीय महिलेचा मृत्यू – 28 मार्च

संबंधित बातम्या :

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 237 वर, मुंबई शंभरीच्या उंबरठ्यावर, धाकधूक वाढली

शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, राज्यात दररोज 10 लाख लिटर दूधाची खरेदी करणार

सोलापूरच्या पालकमंत्रिपदावरुन वळसे पाटलांची उचलबांगडी, जितेंद्र आव्हाडांना जबाबदारी

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात, अजित पवारांचा मोठा निर्णय

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.