AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून नाना पटोलेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टोला; म्हणाले…

Nana Patole on maharashtra karnataka border dispute : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागात सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. कागनोळी टोलनाक्याजवळ पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये बाताबाची झाली आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून नाना पटोलेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टोला; म्हणाले...
नाना पटोले
| Updated on: Dec 09, 2024 | 3:05 PM
Share

कर्नाटक सरकारचं हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. याच दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली. त्यानंतर महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर तणाव निर्माना झाला आहे. यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भाजप सरकार असताना तुम्ही का गप्प होते. आता कॉंग्रेसचं सरकार आहे म्हणून हे टीका करतात. ‘मोदी है तो मुमकीन हैं’ म्हणता मग सीमावाद का सोडवत नाहीत?, असा सवाल पटोलेंनी केलाय.

नार्वेकरांच्या बिनविरोध निवडीवर पटोले काय म्हणाले?

भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. यावर नाना पटोलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते का आले आम्हाला माहिती नाही, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. देशपातळीवर महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या कामकाजाच कौतुक देशभरात केलं जातं. आजची निवड, राहुल नार्वेकरांची आम्ही परंपरेनुसार केली आहे, असं नाना पटोले म्हणाले. विधिमंडळ परिसरात नाना पटोले माध्यमांशी बोलत होते.

विरोधी पक्षनेतेपदावर नाना पटोले काय म्हणाले?

कामकाज समितीची मिटींग आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यासमोर आम्ही काल भूमिका मांडली. विधानसभेच्या उपाध्यक्ष हा विरोधी पक्षचा व्हावा अशी आमची भूमिका आहे. जेव्हा महाराष्ट्रात विरोधी पक्षांचे केवळ 6-7 आमदार होते. तेव्हाही विरोधी पक्षेनेता मिळाला आहे. नागपुरच्या अधिवेशनात विरोधीपक्षनेता ठरला जाईल, असं पटोलेंनी म्हटलं आहे.

बहुमताची मस्ती या लोकांत आहे. अभिनंदनावर चर्चा व्हायला पाहिजे होती. मात्र सरकारला पाशवी बहुमताची मस्ती चढली आहे. मारकडवाडी असेल की महाराष्ट्रातील अनेक गावांत ग्रामसभेचे ठराव घेणं सुरू आहे. लोकांना या प्रक्रियेवर संशय आहे, असं नाना पटोले म्हणालेत. प्रेमाचा विषय नाही. आम्ही दोघंही एकाच वेळी, एकाच भागातून आम्ही सदस्य आहोत. माझी आणि फडणवीसांची मैत्री जगजाहीर आहे, असं म्हणत नाना पटोलेंनी फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.