ज्या क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग तिथे कन्टेन्टेंट झोन करा, चाचण्यांचे प्रमाण वाढवा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागारांचे निर्देश

ज्या क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग तिथे कन्टेन्टेंट झोन करा, चाचण्यांचे प्रमाण वाढवा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागारांचे निर्देश
दीपक म्हैसेकर

अमरावती : विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. फेब्रुवारी महिन्यात तर कोरोना संक्रमण अधिक झाल्याचे आढळून आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सदर जिल्ह्यातील ज्या भागात रुग्णसंख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेनमेंट झोन जाहीर करुन कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवा, असे आदेश मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले. (contentment Zone area where the corona is infected, increase the number of tests deepak Mhaisekar)

मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझिंग ही कोरोनाविरोधी त्रिसूत्री

नागरिकांनी मास्क लावणे, सोशल डिस्टन्स व सॅनिटायझिंग या कोरोना त्रिसुत्रीचे काटेकोर पालन होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी सांगितले.

अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम या पाचही जिल्ह्यांत वाढलेली कोरोना रुग्णसंख्या, आरोग्य व महसूल विभागाने प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेले नियोजन व प्रतिबंधात्मक उपाययोजना या संदर्भात म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

बाधित क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करा

अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुका, अमरावती महापालिका क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद आणि पांढरकवढा नगरपरिषद क्षेत्र आणि अकोला जिल्ह्यातील अकोट व मुर्तीजापूर तालुका आणि अकोला महापालिका क्षेत्र या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. या भागातील संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे सर्व क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करुन बाधित कुटूंबातील व्यक्तींची व कोरोनाचे लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तींची कोरोना चाचणी करावी, असं म्हैसेकर यांनी सांगितलं.

चाचण्यांचे प्रमाण वाढवावे

ज्या परिसरात अधिक रुग्ण संख्या आढळून येत आहे, त्याठिकाणी चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. कटेंनमेंट झोनसह जिल्ह्यात गर्दी टाळण्यासाठी महसूल व पोलीस विभागाव्दारे दंडात्मक कार्यवाहीसह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

कोणीही लसीकरणापासून सुटू नये.

आरोग्य कर्मचाऱ्यासह फ्रन्टलाईन कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण करावे, कोणीही लसीकरणापासून सुटू नये. पहिला डोज घेतल्यानंतर न चुकता दुसरा डोस देण्यात यावा. प्रत्येकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे. निगेटीव्ह रिपोर्ट आलेल्या व्यक्तींच्या हालचालीवर प्रतिबंध करा. गृहविलगीकरणात असणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या कुटूंबीयांची आरटीपीसीआर पुन्हा चाचणी त्यांच्यावर आरोग्य कर्मचाऱ्यातर्फे देखरेख ठेवा. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या घरावर फलक व बॅरीकेटींग करुन परिसरातील नागरीकांच्याही तपासणी करा. कोविड पॉझिटिव्ह आढळून आल्यावर तत्काळ कोविड रुग्णालयात भरती करा, असेही म्हैसेकर यांनी यावेळी सांगितले.

(contentment Zone area where the corona is infected, increase the number of tests deepak Mhaisekar)

हे ही वाचा :

नागपुरात कोरोना संसर्ग वाढला, महाविद्यालयातील प्राचार्यासह 16 जणांना कोरोना

‘सकाळी आयसोलेशन, रात्री सेलिब्रेशन’, नानाच्या नाना तऱ्हा; भाजपची पटोलेंवर टीका

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI