AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona effect | सरकारी कार्यालय नियमित सुरु राहणार : मुख्यमंत्री

गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाची ठिकाणं बंद करण्यात येत आहेत. सर्व सरकारी कार्यालय पुढील सात दिवस बंद ठेवण्यात येणार (Corona effect Govenment office Close) आहे.

Corona effect | सरकारी कार्यालय नियमित सुरु राहणार : मुख्यमंत्री
| Updated on: Mar 17, 2020 | 6:56 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Corona effect Govenment office Close) आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. यानुसार पुढील सात दिवस सरकारने कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात होतं. मात्र सरकारने अशाप्रकारे कोणाताही निर्णय घेतलेला नाही. सर्व सरकारी कार्यालय नियमित सुरु राहतील असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

सरकारी कार्यालयांना एक आठवड्यांची सुट्टी नाही – मुख्यमंत्री

मुंबईमध्ये जी बातमी फिरते की, सरकारी कार्यालयांना एक आठवड्यांची सुट्टी दिलेली नाही. मात्र, उपस्थितीबद्दल आम्ही विचार करतो आहोत. 50 टक्के उपस्थिती ठेऊन कामकाज चालू ठेवता येईल का? तोही विचार आम्ही करतोय. एकूणच गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने सरकार म्हणून आवश्यक पाऊलं उचलत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Maharashtra corona death | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, बाधिताच्या संपर्कात 9 जण

“आम्ही बस किंवा ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. मात्र, अनावश्यक प्रवास टाळा. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. गर्दी कमी झाली नाही तर नाईलाजाने आम्हाला कठोर पाऊले उचलावी लागतील. पण ती कठोर पाऊले उचलायची आमची इच्छा नाही. जनतेनं सहकार्य करावं,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले

Platform Ticket | रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट 10 वरुन 50 रुपये, गर्दी टाळण्यासाठी मोठा निर्णय

प्लॅटफॉर्म तिकीट महागलं 

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर (Corona effect on platform ticket) गर्दी होऊ नये यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांऐवजी तब्बल 50 रुपये करण्यात आलं आहे. फलाटावरील गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो, त्यामुळे तो टाळण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट तब्बल पाच पटीने वाढवण्यात आलं आहे.

मोठमोठ्या रेल्वे स्थानकांसाठी हा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये, लोकांनी अधिक एकत्र एका ठिकाणी जमू नये, जेणेकरून कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.