Corona Update | नवी मुंबई, नागपूर, जळगावात कोरोना नियमांचा फज्जा, कुठे विनामास्क तर कुठे सोशल डिस्टन्सिंगला हरताळ!

गेल्या आठवड्याभरापासून पुन्हा (Without Mask And Violating Social Distancing Rule) एकदा राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

Corona Update | नवी मुंबई, नागपूर, जळगावात कोरोना नियमांचा फज्जा, कुठे विनामास्क तर कुठे सोशल डिस्टन्सिंगला हरताळ!
Violating Social Distancing Rule
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 12:45 PM

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. गेल्या आठवड्याभरापासून पुन्हा (Without Mask And Violating Social Distancing Rule) एकदा राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. मात्र, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात बेफिकरी दिसून येत आहे. कुठे नागरीक विनामास्क फिरत आहेत, तर कुठे सोशल डिस्टन्सिंगला फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे (Without Mask And Violating Social Distancing Rule).

एपीएमसी भाजीपला मार्केटमध्ये तुफान गर्दी

मुंबई एपीएमसी भाजीपला मार्केटमध्ये सकाळपासून तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. मार्केटमध्ये कुठल्याही प्रकारच्या सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात नाहीये. तसेच, मास्क पण वापरले जात नाहीत. कॅमेरा बघून व्यपारी आणि कामगार आणि ग्राहक मास्क वापरतात, अशी वस्तूस्थिती आहे.

एपीएमसी बाजारात तुफान गर्दी

एपीएमसी बाजारात तुफान गर्दी

ज्या एपीएमसी मार्केटमुळे नवी मुंबई परिसरात कोरोना रुग्ण वाढले होते. तसंच चित्र पुन्हा एकदा दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून एपीएमसी मार्केट हाय लाईट होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. एपीएमसी मार्केटमध्ये दिवसात लाख लोक ये-जा करतात . त्यामुळे नवी मुंबईत कोरोना पुन्हा धुडगूस घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या शर्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, दुसरीकडे एपीएमसी मार्केटच्या पाचही बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली जात आहे. या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्यात येत नाही आणि तोंडाला मास्कही लावले जात नाही. त्यामुळे अल्प कालावधीतच कोरोना रुग्ण दुपट्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या देण्यात आलेली शिथिलता आणि करोना संसर्ग कमी होत गेल्याने नागरिकांमध्ये वाढलेली बेशिस्त आणि त्यात एपीएमसी बाजारात नियमांची होणारी पायमल्ली यामुळे करोना रुग्णांत वाढ होत असल्याचं बोलले जात आहे.

नागपुरात सीताबर्डी मुख्य बाजारपेठेत नागरिकांनी चिक्कार गर्दी

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळं जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येते की काय याची चिंता आरोग्य विभाग आणि प्रशासनाला लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने नियम कडक करत अनेक निर्बंध लावले आहेत. मात्र, नागरिकांना याचं काहीच गांभीर्य नसल्याचं दिसून येत आहे.

सीताबर्डी मुख्य बाजारपेठेत चिक्कार गर्दी

सीताबर्डी मुख्य बाजारपेठेत चिक्कार गर्दी

रविवारी नागपूरच्या सीताबर्डी मुख्य बाजारपेठेत नागरिकांनी चिक्कार गर्दी केली होती. या गर्दीत अनेकांनी मास्क घातलं नव्हतं. सोशल डिस्टन्सिंगचा तर पत्ताच नव्हता. त्यामुळे एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नागरीक मात्र बिनधास्त असल्याचं दिसून येत आहे.

प्रशासन आपल्या पद्धतीने रोज नागरिकांना आवाहन करुन नियम पाळण्याचे आवाहन करत आहे. मात्र, नागरिकांना याचं गांभीर्य वाटत नसल्याचं या गर्दीवरुन दिसून येतं. बाजारात हजारोंच्या संख्येनं लोकांची गर्दी असताना मात्र मनपा प्रशासनाची बघ्याची भूमिका घेतली.

अमरावतीच्या बाजारात, मॉलमध्ये सकाळपासून गर्दी

अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती शहर आणि अचलपूर नगरपालिका क्षेत्र या ठिकाणी आठवडाभराचा लॉकडाऊन लावला आहे. आज रात्री आठ वाजता पासून लॉकडाऊनला सुरुवात होणार आहे. पुढील आठवड्यात आठवडाभर अत्यावश्यक सेवा वगळता सगळ्या बाजारपेठ बंद राहणार असल्याने अमरावतीचे नागरिक आज सकाळपासूनच खरेदी करण्यासाठी बाजारपेठमध्ये गर्दी करत आहेत.

एरवी दहा वाजता उघडणारा डी-मार्ट आज सकाळी सात वाजता उघडण्यात आला आणि सकाळी सात वाजता पासूनच अमरावती करांनी खरेदीसाठी डी-मार्टमध्ये रांग लागली. तर, शहरातील सगळ्यात मोठी बाजारपेठ इतवारामध्ये देखील अमरावतीकर यांची खरेदीसाठी गर्दी झाली.

नाशिकच्या फुल बाजारात गर्दी

नाशिकच्या फुल बाजारात नाशिककरांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला नाशिककरांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. नागरिकांना सोशल डिस्टनसिंग आणि मास्कचा विसर पडल्याचं चित्र नाशकात आहे. शहरात कोरोना चा वाढता आकडा लक्षात घेता आजपासून विना मास्क आढळल्यास 1000 रुपये दंड

जळगावात दररोज शेकडोंच्या संख्येने नवे पॉझिटीव्ह रुग्ण, तरीही नागरीक बेफिकीर

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरु आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने नवे पॉझिटीव्ह रुग्ण समोर येत आहेत. एवढी विपरीत परिस्थिती असताना जळगावकर मात्र, स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत बेफिकीर असल्याचे पाहायला मिळत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे.

जळगाव शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित फळे आणि भाजीपाला मार्केट आहे. याठिकाणी दररोज पहाटे 5 वाजेपासून मालाचा जाहीर लिलाव केला जातो. या मार्केटमध्ये दीडशेहून अधिक नोंदणीकृत व्यापारी आणि आडते आहेत. जळगावसह राज्यातील इतर जिल्हे आणि परराज्यातून याठिकाणी फळे तसेच भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत लिलाव सुरु असतो.

जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना मार्केटमध्ये दररोज शेतकरी, व्यापारी, आडते तसेच माल घेणारे किरकोळ विक्रेते यांची हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होते. अनेक व्यापारी तसेच ग्राहक तोंडावर मास्क देखील बांधत नाहीत. मालाचा लिलाव करताना व्यापारी आणि शेतकरी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखत नाहीत. सर्वात धोक्याची बाब म्हणजे, याठिकाणी जर कुणी कोरोनाबाधित व्यक्ती असली तर त्यामुळे संसर्ग बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय येथून फळे आणि भाजीपाला घराघरात जातो. अशाने कोरोनाचा फैलाव रोखणे कठीण होऊ शकते (Without Mask And Violating Social Distancing Rule).

बीडमध्ये सामूहिक विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी

सामूहिक विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी

सामूहिक विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी

एकीकडे राज्यात कोरोनाचे संकट घोंगावत असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे सामूहिक विवाह सोहळ्यात हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे, राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार प्रकाश सोळंके यांची प्रमुख उपस्थिती होती. या विवाह सोहळ्यात मास्क सोशल डिस्टन्सिंगचा अक्षरशः फज्जा उडालेला पाहायला मिळाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने या सामूहिक विवाह सोहळ्याला परवानगी नाकारली असताना मिरवणूक आणि विवाहसोहळ्याला गर्दी जमली होती, त्यामुळे 25 जणांविरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Without Mask And Violating Social Distancing Rule

संबंधित बातम्या :

कोरोनाचा संसर्ग वाढला; अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, उदय सामंत यांचेही दौरे रद्द

छत्रपती संभाजीराजेंच्या उपस्थितीत बीडमध्ये सामूहिक विवाह सोहळा, 25 जणांवर गुन्हा

अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे? सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम : संदीप देशपांडे

मंत्री छगन भुजबळ यांना कोरोना, राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.