मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 1 लाख 35 हजार लसींचे डोस उपलब्ध, लसीकरणाला पुन्हा सुरुवात

Covid Vaccine | मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर आज लस उपलब्ध असेल. सध्या मुंबईत 1 लाख 35 हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. मात्र, मुंबईच्या लसीकरणाचा वेग पाहता हे डोस फारतर दोन दिवस पुरतील. त्यानंतर पुन्हा काय करायचे, असा प्रश्न मुंबईतील आरोग्ययंत्रणांना पडला आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 1 लाख 35 हजार लसींचे डोस उपलब्ध, लसीकरणाला पुन्हा सुरुवात
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 9:54 AM

मुंबई: कोरोना लशींच्या तुटवड्यामुळे जवळपास तीन दिवस ठप्प असलेले मुंबईतील लसीकरण मोहीम सोमवारपासून पुन्हा एकदा सुरु झाली. लस घेण्यासाठी मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रांवर (Vaccination centres) मुंबईकरांनी गर्दी केली आहे. सकाळी सहापासून लोक लस घेण्यासाठी रांगेत उभे आहेत. अनेकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.

मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर आज लस उपलब्ध असेल. सध्या मुंबईत 1 लाख 35 हजार लसीचे डोस उपलब्ध झाले आहेत. मात्र, मुंबईच्या लसीकरणाचा वेग पाहता हे डोस फारतर दोन दिवस पुरतील. त्यानंतर पुन्हा काय करायचे, असा प्रश्न मुंबईतील आरोग्ययंत्रणांना पडला आहे.

दहिसरमध्ये पहाटे साडेतीन वाजल्यापासून रांगा

मुंबई आणि आजुबाजूच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून लसीकरण पूर्णपणे ठप्प होते. त्यामुळे सोमवारी लसी उपलब्ध झाल्यानंतर दहिसरमध्ये नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर एकच गर्दी केली. दहिसर पूर्व जंबो लसीकरण सेंटरमध्ये व्हॅक्सिनेशनसाठी नागरिकांनी पहाटे साडेतीन वाजल्यापासून रांगा लावल्या होत्या. या केंद्राच्या प्रवेशद्वारापासून बाहेर शंभर ते दीडशे मीटर लांब नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.

म्युकोरमायकोसिसच्या सक्रीय रुग्णांमध्ये घट, 436 रुग्णांना डिस्चार्ज

कोरोनाइतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिस (mucormycosis) आजार आता आटोक्यात येऊ लागला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून म्युकोरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या 804 रुग्णांपैकी 436 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत 212 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून यात मुंबईतील केवळ 70 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये केवळ 30 टक्के रुग्ण मुंबईचे आहेत. मुंबईत आतापर्यंत पालिका आणि खासगी रुग्णालयात म्युकर मायकोसिसचे 804 रुग्ण दाखल झाले. त्यातील 156 जणांचा म्युकर मायकोसिसमुळे मृत्यू झाला. तर सद्यस्थितीत केवळ 212 सक्रिय रुग्ण आहेत.

तसेच मुंबईत आतापर्यंत म्युकर मायकोसिसचे एकूण 232 रुग्ण आढळले. यात 47 जणांचा मृत्यू झाला. तर मुंबईत 115 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून केवळ 70 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत मुंबईबाहेरचे 532 रुग्ण दाखल झाले. यातील 109 जणांचा मृत्यू झाला. तर 321 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून तर 142 सक्रिय रुग्ण आहेत.

संबंधित बातम्या:

मुंबईत कोरोना लसीकरणाला वारंवार ब्रेक, तिसरी लाट कशी रोखणार?

पालिकेचे वरातीमागून घोडे, चौकशी अहवाल ठेवण्यासाठी बंदिस्त व्हेरिएबल सेगमेंटची खरेदी करणार; स्थायी समितीत मंजुरीसाठी प्रस्ताव

ओळखपत्रधारक पत्रकार, लसीचे 2 डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची मागणी

(Coronavirus vaccination in Mumbai)

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.