गणेश नाईक यांना न्यायालयाचा दिलासा, काय आहे महिलेचं प्रकरण?

गणेश नाईक यांच्या विरोधात त्यांच्याच परिचयाच्या एका महिलेने रिव्हाल्व्हर दाखवत धमकी देणे आणि बलात्कार केल्याचे दोन गुन्हे दाखल केले होते.

गणेश नाईक यांना न्यायालयाचा दिलासा, काय आहे महिलेचं प्रकरण?
गणेश नाईक
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 5:37 PM

मुंबई – नवी मुंबईचे भाजपा  नेते गणेश नाईक यांना  मुंबई उच्च न्यायालयातून मोठा दिलासा मिळाला आहे. नाईक यांच्या  विरोधातला नवी मुंबईतील दोन गुन्हे  प्रकरणं तीन महिन्यांत निकाली काढण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने  संबंधित दंडाधिकारी न्यायालयाला  निर्देश दिली होते. आता त्यांची  याचिका निकाली काढली आहे. गणेश नाईक यांच्या  विरोधात लिव्ह इनमध्ये  राहणा-या एका महिलेनं बलात्काराचे आरोप केले होते.  त्यात पुरावे उपलब्ध नसल्याचं सांगत  नवी मुंबई पोलिसांनी  या प्रकरणी ‘ए समरी’ रिपोर्ट कोर्टात सादर केली आहे. त्याचबरोबर नाईक यांच्या विरोधात  राजकीय वैमनश्यातून तक्रार  दाखल झाल्याचा  गणेश नाईक  यांच्या वतीने दावा करण्यात आला. हा  दावा मुंबई  उच्च न्यायालयानं ग्राह्य धरला आहे.

गणेश नाईक यांच्या विरोधात  त्यांच्याच परिचयाच्या एका महिलेने रिव्हाल्व्हर दाखवत धमकी देणे आणि बलात्कार केल्याचे दोन गुन्हे दाखल केले होते. मात्र या दोन्ही गुन्ह्यात मुंबई हायकोर्टाने गणेश नाईक यांना दिलासा देत त्यांची याचिका निकाली काढली आहे.

एवढंच नव्हे तर गणेश नाईक यांच्या विरोधात दोन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्हया बाबतचे खटले तीन महिन्यांत निकाली काढण्याचा निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दंडाधिकारी कोर्टाला दिले.

पोलिसांनी या प्रकरणात ए समरी रिपोर्ट दाखल केली. ही तक्रार राजकीय हेतूने प्रेरित होऊन करण्यात आली असल्याचा दावा गणेश नाईक यांचे वकील अशोक मुंडरगी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केला.

मुंबई उच्च न्यायालयात  न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर गणेश नाईकांनी गुन्हा रद्द करण्यासाठी  केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यात आली.

सध्या भाजपाचे विद्यमान आमदार आणि माजी  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्या विरोधात त्यांच्या परिचयाची  एका महिलेने बलात्कार आणि नंतर  धमकावल्याचे तक्रार केली होती. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.

तक्रारदार महिला आणि गणेश नाईक हे दोघेही वर्ष  1995 ते 2017 पर्यंत लिव्ह इन रिलेशन मध्ये  होते.  त्यामुळे प्रथम दर्शनी याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने  गणेश नाईक यांना अटकपूर्व जामीन दिला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.